भर रस्त्यात महिला तलाठी लज्जीत.! मला तुमचा व्हिडिओ काढायचा आहे असे म्हणत उपसरपंचाचे अश्लिल चाळे.! संगमनेरात गुन्हा दाखल.!
- संकेत सामेरे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील एका महीला तलाठी यांची उपसरपंचाने छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महसूल कर्मचारी तथा पीडित तलाठी महिलेला रस्त्यात अडवून त्यांच्या दुचाकी वाहनाची चावी काढून घेत तुम्हाला फार इगो आहे. तुमच्या कार्यालयावर भाड्याचे टटू ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्या तोंडाचे मास्क काढून टाखा मी तुमचा व्हिडीओ बनवतो असे म्हणत पिडीत महिलेच्या हातातील कागदपत्रे या उपसरपंचाने रस्त्यावर उधळून दिले. हा व्यक्ती इथेच खांबला नाही. तर त्याने पीडितेस अश्लील शिवीगाळ करत धमकावले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना सोमवार दि. 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर पिडीत महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत उपसरपंचाविरुद्ध विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा या अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गणेश साहेबराव शिंदे ( रा. संगमनेर खुर्द ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणुन अनेक राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला. परंतु, पिडीत महिलेने कुठल्याही दबावाला बळी न पडता ही फिर्याद दिली. खरंतर, एका महिला महसूल कर्मचाऱ्याची छेड काढली जाते. पण, कुठलेच महसूल कर्मचारी पुढे येत नाही. महसुलचे अधिकारी येत नाही. संघटना पाठीशी उभी राहत नाही ही किती मोठी दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे, आशा घटना घडल्यावर अनेक जण दबाव टाखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या घटना पुढे येत नाही. तर महसुल मंत्र्यांच्या तालुक्यातच कार्यकर्त्यांकडुन महसुल कर्मचारी महिलांची छेड काढली जाते. त्यामुळे, महसुलमंत्र्यांच्या तालुक्यातच महसुल कर्मचारी महिला सुरक्षीत आहेत का?असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात भेडसावत आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिलेने आपल्या कार्यालयात दिवसभर काम केले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तहसिल कार्यलयात वाळु संदर्भात रिपोर्ट करण्याचे काम असल्याने त्यांनी ऑफिस बंद केले व त्यांच्या मोटारसायकलवर तहसीलच्या दिशेने निघाल्या. पण, आॅफिसपासुन हाकेच्या अंतरावर जात नाही तेच आरोपी गणेश शिंदे यांनी मोठ्याने आवाज देऊन त्यांना थांबवले. त्यावेळी पिडीत महीलेने आपली दुचाकी थांबवत त्या गाडीवर बसवून राहिल्या. आरोपी गणेश शिंदे हा जवळ आला व पिडीत महिलेला म्हणाला की माझी वारस नोंदीचे काम का होत नाही? त्यावेळेस पिडीत महिला म्हणाली की, तुमचे वारस नोंदीचे काम माझ्यापातळीवर पुर्ण झालेले आहे व त्याकामी मी सर्कलकडे ठराव पाठवला आहे. तो ठराव मंजुर होताच मी लगेचच फेरफार देते असे सांगुन देखील आरोपी गणेश शिंदे यांनी पिडीत महिलेच्या दुचाकीची चावी काढली. त्याची ही मजल पाहुन त्या उत्तरल्या की, माझ्या गाडीची चावी का काढली? मला तहसील कार्यलयात वाळुचा रिपोर्ट देण्यासाठी जायचे आहे. असे बोलताच आरोपी गणेश शिंदे याने चावी देण्यास नकार दिला. त्यावेळी पिडीत महिलेच्या जवळील असलेल्या पिशवीतील कागदे हिसकावून घेत त्याने सर्व कागदपत्रे फेकुन दिली. तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत त्याने दमदाटी केली. त्यानंतर या पुरुषापुढे हताश झालेल्या या पीडित महिलेने गाडी स्टँडवर लावली आणि त्याने जमिनीवर फेकलेली सर्व कागदपत्रे गोळा केली.
त्यानंतर पीडित महिलेने आरोपी गणेश शिंदे यांच्या हातातुन चावी हिसकावून घेत गाडी चालु केली. त्यावेळेस आरोपी गणेश शिंदे म्हणाला की, तुम्हाला फार इगो आहे. तुम्ही हॉपीस मध्ये भाड्याचे ट्टू ठेवले आहे. तुमच्या तोंडाचे मास्क काढून टाका तुमचा व्हिडीओ काढतो. असे म्हणुन आरोपी गणेश शिंदे पीडित महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करत होता. आरोपी शिंदे याने पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ करत धमकी दिली व चावी हिसकावून घेत असताना हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तेथुन चालता झाला. त्यानंतर पीडित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार कथन केला. या वरून आरोपी गणेश शिंदे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.
दरम्यान, आरोपी गणेश शिंदे हा उपसरपंच आहेत तर तो काँग्रेसचे कार्यकर्ता आहे. सद्या महसुलमंत्री संगमनेरचे असून देखील त्यांचेच कार्यकर्ते महसुल कर्मचारी महिलांची छेड काढत आहे. त्यांच्या कामात अडथळा आणत आहे. ही किती शर्मेची बाब आहे. ऐवढेच काय.! संगमनेरमध्ये कौठे, मंगळापूर, बोटा, घारगाव येथे महसुलच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण देखील झाली आहे. याच संगमनेरमध्ये पोलिसांवर देखील हल्ले झाले आहे. त्यामुळे संगमनेरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे कार्यकर्ते वाळुचा व्यवसाय करत आहेत तर दुसरीकडे महिलेशी अश्लील वर्तवणुक करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनवरून साहेबांच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहे. जेव्हा गणेश शिंदे यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांचे अनेक वादग्रस्त कारनामे असल्याची चर्चा सद्या जोर धरु लागले आहे.