आरे बाप रे.! पुन्हा हनीट्रॅप.! दुसर्‍या टोळीवर गुन्हा दाखल.! नको ते फोटो काढून व्हायरल करायची धमकी.!

सार्वभौम (अहमदनगर) :- 

              नगर शहर व नगर तालुक्यानंतर अकोले व संगमनेर येथे हनीट्रॅपचे प्रकार समोर आले होते. एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या पाठोपाठ जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा टोळ्या कार्यरत असल्याचे उघड होऊ लागले आहे. त्यामुळे, असाच हनीट्रॅपचा प्रकार नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे घडला आहे. मिसकॉल देऊन एका शेतकर्‍याला प्रेमाची भूरळ पाडली आणि नंतर घरी बोलावून त्याच्याशी चाळे करीत फोटो काढले. इतकेच काय.! घरात अचानक बनावट नवरा येतो आणि दोघांना राईट हॅण्ड पकडतो असे भासवून या शेतकर्‍याला बेदम मारहाण देखील होते. त्यानंतर त्याच शेतकर्‍याच्या मोबाईलवर नंतर त्याच्या गुटरगुचे फोटो पडतात आणि तेथून सुरू होतो ब्लॅकमेलींगचा प्रकार. दोन लाख रुपये दे अन्यथा तुझे फोटो सोशल मीडियावर शेअर करु असे म्हणून धमकी दिली जाते. एव्हाने पाच लाख रुपयांना लुटले देखील जाते. परंतु, जेव्हा अशा हनीट्रॅपमध्ये बाकी लोक निर्धास्तपणे पुढे येतात. तसे हा फसलेला शेतकरी राजा येतो आणि थेट घडला प्रकार पोलिसांना सांगतो. त्यानंतर पोलीस थेट गुन्हा दाखल करतात. यात तक्रारदार हे पुढे येऊ लागले आहेत. हेच सर्वात मोठी कौतुकाची बाब आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यात एक शेतकरी आपल्या नियमीत कामात व्यस्त होता. त्याच वेळी अचानक मोबाईलवर एक फोन आला आणि त्यांनी बोलता बोलता यांना आपल्या जाळ्यात ओढले. नंतर व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग सुरू झाली. हाय, बाय, हॅलो. हाऊ आर यु नंतर प्रकरण पुढे सरकले आणि थेट भेटायची बोलणी ठरली. हे महाशह पुढाचा मागचा विचार न करता त्या मॅडम म्हणतील तसे मोहात पडत गेले. त्या जेथे भेटायचे म्हणतील तसे भेटणे निच्छित झाले. त्यानंतर नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे भेट घेण्याचे ठरले आणि 16 जून 2021 रोजी यांच्या हनीट्रॅपचा पहिला प्लॅनिंग सक्सेस झाला.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी हा व्यक्ती संबंधित महिलेला भेटण्यासाठी वडगाव गुप्ता येथील घराचा शोध घेत-घेत निच्छित स्थळी पोहचला. त्यानंतर नियोजनबद्ध त्याच्यावर सापळा लावून त्याच्याशी अंगलट करून नको ते फोटो काढण्यात आले. आजचा एक दिवस त्याला आयुष्यभर पश्चिाताप करणारा ठरणार आहे. याची जरा देखील चुनूक त्याला लागली नाही. अंधळ्या व्यक्तीप्रमाणे हे सर्व मायाजाल त्याच्याभोवती फिरले आणि हे सर्व सुरू असताना अचानक संबंधित महिलेने बनावट उभा केलेला पती तेथे येऊन टपकला. माझ्या घरात ते ही माझ्या बायको सोबत असे प्रकार करणारा हा व्यक्ती कोण? असे प्रश्न करीत त्याने संबंधित शेतकर्‍यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मात्र, गुतली गाय फाटके खाय.! या पलिकडे पीडित व्यक्तीला पर्याय काय होता? त्यामुळे, त्याने गुपचूप मार खाऊन घेतला. यावेळी त्याच्या खिशातील पाच हजार रुपये देखील काढून घेण्यात आले.

दरम्यान, हे गृहस्थ घरी गेल्यानंतर काही काळाने ते कशात दंग होते याचे सर्व फोटो त्यांना मिळाले. दोन लाख रुपये दे अन्यथा हे सर्व सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी देण्यात आली. आता मात्र, मुक्या सारखी गत झाली होती. हाक ना बोंब, पर्याय काय? हे कळत नव्हते. त्यानंतर पीडित व्यक्तीला पाथर्डी येथील काही व्यक्तींनी मध्यस्ती केली. दोन लाख रुपये देऊन घडला प्रकार या कानाच्या त्या कानाला माहित होणार नाही. त्यामुळे, हे सर्व मिटवून घेऊ. परंतु, पुढे मागे देतो म्हणत आज जवळजवळ एक महिना उलटून गेला. हा प्रकार कोणाला सांगावा? कसा सांगावा? आब्रुचे काय होईल? लोक काय म्हणतील? समाजात कसे जायचे? पैसे कोठून व कसे आणायचे? दोन लाख दिले तरी हे प्रकारण थांबेल का? माझ्यावर ते लोक खोटा गुन्हा दाखल करतील, मग काय करायचे? असे नाना प्रश्न मनात थौमान घालत होते. 

दरम्यान याच वेळी अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यात हनीट्रॅपचे दोन गुन्हा दाखल झाले आणि हा शेतकरी पुत्र पुढे आला. जे होईल ते होईल. जीव गेला तरी बेहत्तर पण पैसे द्यायचे नाही. आज मी गुतलो आहे उद्या येणार्‍या पीढी गुतेेल, तरुण गुततील, व्यापारी, शेतकरी आणि ज्यांच्यात हिंमत नाही ते लोक हे सर्व निमुटपणे सहन करतील. त्यामुळे, झाली बदनामी तरी चालेल. परंतु माझ्याप्रमाणे बाकी लोक त्याचे बळी पडायला नको. म्हणून हा धाडशी व्यक्ती पुढे आला. त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना घडला प्रकार सांगितला आणि साहेबांनी देखील त्यास धिर देऊन एका महिलेसह तिघांवर जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करुन घेतला. अशा प्रकारे जर कोणी हनीट्रॅपचा बळी ठरलेला असाल तर त्यांनी मनात शंका-कुशंका न आणता पुढे आले पाहिजे. त्यांचे नाव गोपनिय ठेवले जाईल. असे आवाहन आठरे यांनी केले आहे.