पंन्नास हजार दे.! नाहीतर तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करील.! हनीट्रॅपमधील सपना शिंदेसह संगमनेरच्या अन्य तीन महिलांवर लुटमारीचा गुन्हा.! अकोल्याच्या तरुणाची फिर्याद.!

  


सार्वभौम (संगमनेर) :- 

           फेसबुक येथे मैत्री करुन मी तुला चहा पाजते असे म्हणून संगमनेर येथील स्टेट बँक कॉलनी येथे एका तरुणास भेटण्यासाठी बोलविले होते. मात्र, तेथे एका बंद खोलीत नेऊन त्यास मारहाण करत त्यांच्या ताब्यातील मोबाईल आणि एक हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर कसारा दुमाला रोडवर पुन्हा मारहाण करुन पंन्नास हजार रुपये दे अन्यथा तुझ्यावर छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करील असे म्हणत धमकी दिली. ही घटना दि. 6 जून 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सनपा शिंदे, राणी व सुनिता मावशी अशा तिघींवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्या अकोल्याच्या हनीट्रॅपमध्ये अटक असणार्‍या सपना शिंदे (रा. संगमनेर) हीने 6 जून रोजी अकोले तालुक्यातील एका व्यक्तीशी फेसबुकवर संपर्क साधला होता. त्यानंतर तीने विचारले की, तुम्ही संगमनेरला कधी येणार आहे? त्यानंतर यांच्यात संभाषण सुरू झाले. दरम्यान, या व्यक्तीने एक नवी गाडी घेतली आणि ते फोटो सोशल मीडियावर टाकले होते. तेव्हा सपना हिने त्यांच्याकडे पेढे मागितले. तुम्ही संगमनेरला आले की, पेढे नक्की द्या असे म्हणत या व्यक्तीस भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा या व्यक्तीला संगमनेर येथे काम निघाले तेव्हा त्यांनी सपना शिंदे हिला कॉल केला. त्यानंतर ही दोघे स्टेट बँक कॉलनी येथे गेले.

दरम्यान, तेथे एकच खोली होती. त्यात सपना शिंदे हिच्यासह राणी आणि सुनिता मावशी अशा तिघी एकत्र आल्या. सुनिता हिने या महोदयांचा पाहुणचार म्हणून चहा ठेवायला सुरूवात केली तोच शिंदे हिने दरवाजावर पडदा टाकला. घरात एकटा पुरुष भेटल्यानंतर या तिघींनी त्यांना धरले आणि बेडवर लोटून दिले. काही क्षणात तिघींनी इतकी मारहाण सुरू केली. की, यास काही सुचेनासे झाले. त्यावेळी या महिलांनी त्यांच्या खिशातील 1 हजार रुपये काढून घेतले. तर, मोबाईल काढून घेत तो गुप्तांग ठिकाणी दडवून ठेवला. आता, हा व्यक्ती मोबाईल घेण्यासाठी अशा ठिकाणी हात देखील घालु शकत नव्हता. त्यामुळे, विनंती आणि याचना सोडून त्याच्याकडे  काहीच शिल्लक राहिले नव्हते. 

आता पैसा गेला, मोबाईल गेला किमान मार तरी का खावा? म्हणून त्याने यांच्यापुढे हात जोडले. कारण, त्या महिला असल्यामुळे त्यांच्यासमोर प्रतिकार करणे शक्य नव्हते. त्यांनी मारहाण करुन अंगातील शर्ट फाडून टाकला होता. तेव्हा सपना शिंदे म्हणाली की, तू आत्ताच्या आत्ता मला 50 हजार रुपये दे. अन्यथा मी तुझ्यावर पोलीस ठाण्यात जाऊन विनयभंगाची केस दाखल करते. असे म्हणत पुन्हा तिघींनी मारहण सुरू केली. भाड्या, तुला लाज नाही वाटली का? तू इथपर्यंत आमच्या मागे आला. असे म्हणून त्यांनी गचांडी धरुन त्यांचे हाल-बेहाल केले. महिला म्हणून हे त्यांच्यासमोर काहीच करु शकत नव्हते. त्यामुळे, एक चुक झाल्याने त्याची शिक्षा भोगण्यापलिकडे कोणताही मार्ग नव्हता. त्यावेळी स्वत:चा जीव वाचीवण्यासाठी यांनी काही क्षणात घराच्या बाहेर पळ काढला. मात्र, गुंतली गाय फटके खाय अशी त्यांची गत झाली होती. कारण, ते बाहेर आले खरे.! परंतु त्यांचा त्या महिलेकडे होता. तो मोबाईल घेण्यासाठी ते अर्धा तास त्या घराच्या काही अंतरावर संबंधित महिला बाहेर येण्याची वाट पाहत होते.

अर्ध्या तासानंतर राणी आणि सपना शिंदे ही घराच्या बाहेर आली. त्यांनी त्यांची स्कुटी काढली आणि दोघी अकोले बायपासकडे निघाल्या. त्या रायतेवडीकडे निघाल्या असता कासार दुमाला पुलाजवळ या व्यक्तीने त्यांच्या गाडीला यांची गाडी आडवी लावली. तुम्हाला जिकडे जायते तिकडे जा. मात्र, माझा मोबाईल मला परत करा. त्यावेळी या दोघींनी अश्लिल शिवीगाळ सुरू केली. आम्ही प्रेस रिपोर्टर आहोत. तुमची बातमी लावून तुम्हाला जेलमध्ये घालु असे म्हणत त्यांनी धमकी दिली. मात्र, हे महाशय त्यांच्या धमक्यांना घाबरले नाही. त्यांनी मोबाईल आणि यांना काढून घेतलेल्या पैशाची मागणी केली. हा व्यक्ती फारच हट्टी ग्रहक असल्यामुळे, मुख्य आरोपी सपना शिंदे हिने एका अन्य व्यक्तीला फोन केला. तोच काही वेळात एक अलिशान गाडी तेथे पोहचली.

दरम्यान, हा सर्व प्रकार भर रस्त्यावर सुरू होता. तेव्हा देखील त्या महिलांनी या व्यक्तीस भर दिवसा चार चौघांसमोर रस्त्यात मारहाण केली. संबंधित महिलांनी तेथे जमा झालेल्या व्यक्तींना सांगितले की, हा व्यक्ती आमची छेडछाड काढत आहे. त्यामुळे, लोक देखील त्यांच्याकडे त्याच नाजरेने पाहत होते. त्यावेळी, हा व्यक्ती म्हणाला की, मी एक शेतकरी असून या महिलांनी मला मारहाण करुन लुटले आहे. माझा मोबाईल देखील यांच्याकडे आहे. जेव्हा जनतेला खरा प्रकार लक्षात आला तेव्हा या महिलांनी तेथे आलेल्या अलिशान गाडीतून पळ काढला. तर सपनी शिंदे ही स्कुटीहून सिन्नरकडे भरधाव वेगाने पळुन गेली. त्यानंतर हा व्यक्ती प्रचंड घाबरलेला होता. ते घरी आले. घडला प्रकार त्यांच्या कुटुंबास सांगितला. याच दरम्यान त्यांच्या घरात कोविडचे रुग्ण निघाले होते. त्यामुळे, त्यांची आज गुरुवार दि. 15 रोजी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.