संगमनेरात लाचखोर मंडल अधिकारी आणि त्याचा पित्या अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात.! दोघांना अटक, आठ हजार घेताना रंगेहाथ पकडले.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे एका तक्रारदार यांनी त्यांचे चुलत्यास शेतजमीन विक्रि केली होती. त्याचे विक्री दस्तमध्ये चुकीचे क्षेत्र नमुद झाले होते व सदर दस्त आधारे शेतीचा फेर नोंद झाला होता. तक्रारदार यांनी सदर फेर रद्द करणेकरिता अर्ज दिला होता. यातील मंडल अधिकारी यांचेकडून खरेदीचा फेर मंजूर होने प्रलंबित होते. यातील लोकसेवक यांनी खरेदीचा फेर मंजूर करते वेळेस रद्द लेखा प्रमाणे खरेदी नोंद रद्द करण्याचे काम करून देण्यासाठी मंडल अधिकारी बाळासाहेब कचरु जाधव याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात तडजोडी अंती आठ हजार देणे निच्छित झाले होते. यासाठी जाधव याचा हस्तक मनोज ज्ञानेश्वर मंडलिक याचा देखील यात सामावेश होता. त्यामुळे, नगरच्या लाचलुचपत विभागाने या दोघांना आठ हजार घेताना रंगेहाथ पकडले आहे. ही धडाकेबाज कारवाई समनापूर येथे सोमवार दि. 12 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समनापूर येथे एका तक्रारदाराच्या खरेदी खतात चुकूण एक नोंद झाली होती. त्यामुळे, ती चुकीची नोंद लागली होती. ती नोंद न करण्यासाठी लाचखोर जाधव याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार म्हणाले की, आहो तात्या हा प्रकार चुकून झाला आहे. त्यात पैसे कशासाठी द्यायचे? मात्र, ऐकतील ते तात्या कसले? त्यांनी 10 हजार रुपयांसाठी आणखी एक दलाल मध्यस्ती घातला. त्यामुळे, पुन्हा या पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, तक्रारदार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट नगरचे अधिकारी हरिष खेडकर यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी थेट संगमनेर गाठले.
दरम्यान, तक्रारदार हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, जसे लाचलुचपत विभागाने सापळा लावला तसे 10 हजार मागणी होती, त्यापैकी तडजोडी अंती आठ हजार देणे ठरले. यावेळी मंडलिक आणि जाधव यांच्या मागणीनुसार जे काही घडले, त्यानुसार सापळा रचून या दोघांना खेडकर यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आज दुपारी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोणी आहेत का? यांनी यापुर्वी कोणाकडे अशा प्रकारची मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे? अशा प्रकारची पुढील कारवाई सुरू झाली आहे.
एकंदर संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. पोलीस खात्यात अधिकार्यांपासून ते कर्मचार्यांपर्यंत लाचलुचपतचे छापे आपल्याला पहायला मिळाले आहेत. येथील हाप्तेखोरीवर अनेकदा धिकार्यांकडे तक्रारी झाल्याचे पहायला मिळत आहेत. महसुलमध्ये देखील किती मोठमोठे ट्रॅप होताना दिसत आहे. इतकेच काय! गेल्या दोन आठवड्या वन खात्याचा अधिकारी विशाल बोर्हाडे याच लाचलुचपत खात्याने ताब्यात घेतला होता. म्हणजे, या वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक ट्रॅप हे संगमनेर तालुक्यात झाले आहे. म्हणजे, गुन्हेगारी, लाचखोरी, अवैध व्यवसाय आणि कोविड देखील सर्वाधिक संगमनेरात दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
ही कारवाई नाशिक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे पोलीस कर्मचारी विजय गांगूल, रविंद्र निमशे, हरुण शेख अशा टिमने ही कारवाई केली.
- सुशांत पावसे