जिल्हा बँकेने विश्वास जिंकला.! अकोल्यात बँकेची 95 टक्के वसुली.! आपण जिल्ह्यात द्वितीय स्थानी - गायकर पाटील


- सुशांत अरोटे

सार्वभौम (अकोले) :- 

              कोरोनाचे काडूकाळ दिवस सुरू असताना देखील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची सन 2020-21 या हंगामातील 30 जुन 2021 अखेर अकोले तालुक्यात विक्रमी 94.93 टक्के कर्ज वसुली झाली आहे. त्यामुळे, अकोले तालुका जिल्ह्यात द्वितीय स्थानी अकोले तालुका असून बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासदांचे तसेच ठेवीदार हे खरोखर कौतुकास पात्र असल्याची मत बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम पाटील गायकर यांनी व्यक्त केले. जून अखेरचा लेखाजोखा त्यांनी तपासल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. तर वसुलीसाठी आणखी एक महिना अवधी मिळाला असून कदाचित शंभर टक्के वसुली होण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्यात जिल्हा बँकेच्या एकूण 21 शाखा आहेत. त्यापैकी 11 शाखांची 100 टक्के वसुली झालेली आहे. तसेच तालुक्यातील एकूण 86 विविध कार्यकारी संस्था असून त्यापैकी 67 विविध कार्यकारी संस्थांची बँक पातळीवर 100 टक्के वसुली झालेली आहे. तर रेडे, विठे, चितळवेढे, कळस खुर्द, अंबड, हिवरगांव व बहिरवाडी या विविध कार्यकारी संस्थांची मेंबर पातळीवर 100 टक्के वसुली केली असल्याची माहिती गायकर साहेब यांनी दिली आहे.

कर्ज वसुलीसाठी बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर साहेब व अमित भांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी बाळासाहेब कोटकर, वसुली अधिकारी भांडकोळी, कार्यालयीन अधीक्षक कैलासराव देशमुख, सर्व शाखेंचे शाखाधिकारी व बँक कर्मचारी तसेच सेवा संस्थांचे सचिव व सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. जिल्ह्यात उल्लेखनीय वसुली केलेल्यांमध्ये अकोले तालुक्याचा जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आहे. जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर व अमित भांगरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेत नेहमी किंग मेकरची भुमिका बजावणारे ना. बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा बँकेच्या वसुली संदर्भात पुन्हा बाजी मारली आहे. जिल्ह्यात संगमनेेर तालुक्याच सर्वाधिक म्हणजे 98.93 टक्के वसुली झाली असून ते अव्वल स्थानी आहेत. त्यांनी 183 कोटी कर्जवाटप केले होते, त्यातील 180 च्या दरम्यान वसुली झाली आहे. त्यानंतर अकोले दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यामुळे, व्यवहार आणि कारभार यातील किती चोख व पारदर्शी असावा याचे हे उत्तम उदा. संगमनेरने दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व शाखेंचे शाखाधिकारी, बँक कर्मचारी, सेवा संस्थांचे सचिव व सेवा संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ यांचे महसुलमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. अद्याप वसुलीसाठी एक महिना अवधी असून आज 99 टक्क्यावर असणारे संगमनेर उद्या 100 टक्के वसुलीत येण्याची शक्यता आहे. 


कोरोंना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आर्थिक अडचणी असताना देखील वसुलास पात्र असलेल्या 175 कोटी 68 लाख रु पैकी 166 कोटी 78 लाख रु वसुल झालेले आहेत. तसेच 532 कोटी 10 लाखांचे ठेवीचे उद्दिष्ट असतानाही प्रत्यक्ष ठेवी 575 कोटी 32 लाख रु ठेवी जमा आहेत. बँकेचे संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी सभासदांच्या तसेच ठेवीदाराना विश्वासास पात्र ठरले आहे.

- सी.डी गायकर पाटील

मा.चेअरमन/विद्यामान संचालक 


अकोले तालुक्यात सिताराम पाटील गायकर यांनी त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे. गायकर साहेब यांनी कधी कोणाच्या टिकेला स्थान दिले नाही. मात्र, त्यांच्या कर्तुत्वातून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. इतक्या कठीण काळात देखील 95 टक्के वसूली होते. म्हणजे त्यासाठी विश्वास असावा लागतो. गायकर पाटील यांच्यावर कोणी कितीही आरोप केले तरी जिल्ह्यात आणि राज्यात तथा बारामतीत त्यांचे कर्तुत्वाची ओळख आहे. त्यामुळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी ते स्वत:च्या खाद्यावर घेऊन जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील यात तिळमात्र शंका नाही. त्याला प्रमाण म्हणून हे जिल्हा बँकेतील काम आहे. संपुर्ण तालुका व शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. कारण, या व्यक्तीने राजकारण नव्हे तर जनतेच्या कल्याणाचे समाजकारण केले आहे.

- विकासराव शेटे पाटील (कर्जदार शेतकरी)