लग्न ठरलं, प्रि वेडींग शुट झाली अन नवरदेव म्हणतो माझे दुसर्या मुलीवर प्रेम आहे.! लग्न मोडलं, मग हिने त्याच्यासह ठोकला 6 जणांवर गुन्हा.!
अकोले शहरातील महालक्ष्मी कॉलनीतील एका उच्चशिक्षित मुलीचे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे लग्न ठरले होते. मात्र, हुंडा देण्या घेण्याहून त्यांच्यात ताळमेळ बसला नाही, मात्र मुलीने त्यांना हुंड्यास साफ नकार दिला. या दरम्यान मुलगा आणि मुलगी या दोघांची मने जुळली आणि त्यांनी लग्नाच्या अगोदरच निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मस्त प्रि वेडींग शुट केली. म्हणजे आख्खा पिक्चर क्लेअर असताना हुंड्याच्या गडबडीत मुलाचे जुने प्रेम उफाळून आले. त्याने या मुलीस सांगितले की, माझे दुसर्या मुलीवर प्रेम आहे. त्यामुळे, हो-ना करता-करता हे लग्न मोडून गेलं आणि रागवलेल्या मुलीने नवर्या मुलासह त्याचे आई वडील आणि मध्यस्ती अशा सहा जणांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर येथून मुलीस पाहण्यासाठी पाहुणे आले होते. त्यानंतर मुलगा आणि मुलगी यांच्यात एकमेकांना पाहण्याची पसंती झाली. दरम्यानच्या काळात यांच्यातील कौटुंबिक सलोखा चांगला झाला आणि नवर्या मुलाकडून मुलीच्या घरच्यांकडे हुंड्यासाठी सहा तोळे सोने हे वेगवेगळ्या स्वरुपात देण्याचे ठरले होते. हा सर्व कौटुंबिक व्यक्ती आणि मध्यस्ती यांच्यात चाललेला व्यावहार होता. अर्थात यात मुलामुलीस काही एक घेणेदेणे नव्हते. त्यामुळे, त्यांच्यात लग्न करण्याचे निच्छीत झाले आणि त्यांनी त्यांचा पुढील उपक्रम सुरु केले.
लग्न निच्छीत झाल्यामुळे, यांनी एका फोटोग्राफरच्या मदतीने निसर्गरम्य ठिकाणी प्रि वेडींग शुट केली. हे काम पुर्ण झाल्यानंतर अगदी काही दिवसात मुलाकडून अधिकच्या हुंड्याची मागणी होऊ लागली. मात्र, माझ्या पालकांकडून कोणताही अधिकचा हुंडा मिळणार नाही अशा प्रकारे मुलीने ठणकावून सांगितले. त्यानंतर मुलाच्या घरच्यांही हे लग्न मोडले असे फोनवर सांगितले. यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली मात्र त्यांनी लग्न मोडल्याचे सांगून संपर्क तोडून टाकला.
दरम्यान, मुलगा सप्तक याने देखील मुलीस सांगितले की, माझे दुसर्या मुलीसोबत प्रेम संबंध आहे. त्यामुळे, मी लग्न करु शकत काही. जर दुसरीकडे होते तर इकडे कशाला उचातपती करत होता? असा प्रश्न केला असता त्याने शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केला. सप्तक याने मुलीस धमकी दिली की, लग्न जरी मोडले आहे, तरी तुझी प्रि वेडींग शुट माझ्याकडे आहे. त्यामुळे, मी तुझे दुसरीकडे लग्न होऊ देणार नाही असा दम दिला. त्यानंतर संतापलेल्या मुलीने दि. 8 जुलै 2021 रोजी रात्री थेट पोलीस ठाणे गाठले आणि सप्तक गजानन मुंडलिक, गजानन चांगदेव मुंडलिक, रेणुका गजानन मुंडलिक, साक्षि गजानन मुंडलिक (सर्व. रा. बेलापूर रोड, श्रीरामपूर, जि. अ.नगर) सिद्धी राज शहाणे, बाळासाहेब भास्कर शहाणे (रा. पाथर्डी, जि. अ.नगर) अशा सहा जणांवर फसवणुक आणि हुंडा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जनहितार्थ :-
आता एक मात्र नक्की. की, कोणाचे लग्न जमविण्यात किंवा मध्यस्ती करण्यात योग्यता राहिला नाही. आजकाल शब्द पाळणारे आणि तितक्याच शुद्ध चारित्र्याचे लोक फार कमी राहीले आहेत. एखादा व्यक्ती एखाद्याचे लग्न ठरविताना दोन्ही व्यक्ती कशा आहेत किंवा त्यांच्या मनात काय शिजते हे डोकावून पाहु शकत नाही. मात्र, दोन कुटुंब एक व्हावे, कोणाचेतरी भले व्हावे हाच नाद (छंद) काही लोकांना असतो. यात अपवाद असतीलही जे माहित असून झाकून ठेवतात. मात्र, जे शुद्ध हेतूपोटी मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा आयुष्यभराचा धड असतो. त्यामुळे, जर तुम्ही कोणाचे लग्न ठरवत असाल किंवा व्यावहारात कोणाच्या मध्यस्ती करीत असाल तर तो धंदा बंद करावा. हाच यामागील संदेश संमजावा.