जाय.! गुन्ह्यातलं साहित्य वापर बिन्धास्त.! अकोले पोलिसांचा फंडा, एपीआय बदला, पीआय द्या.! आमदार म्हणजे त्यांचा कर्दनकाळ नव्हे.! सु-काळ होय.!


सार्वभौम (अकोले) :- 

               खरंतर, समाजात डॉक्टरांना देवाचे स्थान आहे. जे आम्ही देखील मान्य करतो. मात्र, सगळेच डॉक्टर देव नाहीत यावर देखील आम्ही ठाम आहोत. कारण, डॉ. गणेश नवले यांनी याच निर्दयी पणाचे दर्शन घडविले आहे. लॉकडाऊन होण्यापुर्वी त्यांनी त्यांचा एक गाळा भाड्याने दिला होता. मात्र, एक महिन्यात लॉकडाऊन झाले आणि पुढे कोरोनाचे रुग्ण वाढले आणि या मानसाची नियत फिरली. दिलेला गाळा खाली झाला ते येथे कोरोनाचे पेशन्ट ठेवता येतील आणि याच्याकडून महिन्याला पाच हजार घेण्यापेक्षा कोविडच्या पेशन्टकडून लाखो रुपये उकळता येतील. अशा भावनेतून याने लॉकडाऊनमध्ये गाळा भाडेकरु याच्याकडून एक रुपया कमी न करता 15 हजार रुपये उकळले. गाळा खाली झाला पाहिजे म्हणून भर लॉकडाऊन म्हणजे जेव्हा कुत्र देखील रस्त्यावर फिरकत नव्हते तेव्हा या महाशयांनी शंभर रुपयांचा स्टॅम्प करुन करारनामा मागितला. सरकारी कार्यालये बंद आहे. नंतर करार करू असे सांगून देखील या डॉक्टरने कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता लॉकडाऊनमध्ये भाडे उकळुन लॉकडाऊन उठते कोठे नाहीतर. संबंधित भाडेकरुस न सांगता त्याचे साहित्या गुंडाळुन भाडेकरुच्या दुकानात आणून ठेवले. म्हणजे, गुन्ह्यातील गाळा, त्यात मुद्देमाल गुन्ह्यातला, वरुन लॉकडाऊनमध्येे भाडं खाल्लं, त्यात भाडेकरुला न सांगता त्याचे लाखो रुपयांचे साहित्य कचर्‍यासारखे भरुन दुसर्‍याच्या दुकानात बेभरोशे ठेवले, त्यात काही वस्तू हडप केल्या. वरुन पोलिसांकडे जाऊन नौटंकी आणि त्यात पोलिसांचा त्याला त्याचे कौतुक. जर या तळतळीत मनाचे काही असेल तर नि:शब्द तक्रारदाराचा जीव जावो.! इतका मानसिक त्रास पोलीस आणि डॉक्टरने दिला आहे. 

आता जर याच ठिकाणी एखादा प्रमोद वाघ, अविनाश शिळीमकर, अभय परमार, विनोद तायडे यांच्यासारखे अधिकारी असते तर त्यांनी तत्काळ त्यावर कारवाई केली असती. नक्कीच या तक्रारीत द्वेष असेल. पण, पोलीस निरीक्षकाच्या जागी सहायक पोलीस निरीक्षक यांची भरती केली तर त्यांना कायद्याचे फार नाही ज्ञान असते असे काही नाही. घुगे यांची ही पहिलीच पोष्टींग आहे. त्यात त्यांना एखादे छोटे पोलीस ठाणे द्यायचे तर पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्यांना तोफेच्या तोंडी का बांधले हे अद्याप समजले नाही. त्यात पाटील यांना माहित आहे. अकोले आणि राजूर येथे कोणीही दिले तरी येथे आमदारांना त्याबाबत फार नाही माहिती नाही. त्यामुळे, धकून जाते. अवघ्या 22 कर्मचार्‍यांवर अकोले पोलीस ठाणे जीव काढते आहे. यांच्यापेक्षा भिंगार, नगर तालुका, सोनई हे पोलीस ठाणे सरस आहे. जसे डॉ. किरण लहामटे आमदार झाले. तेव्हापासून हे तिसरे अधिकारी आहेत. याच पोलीस ठाण्यात लाचलुचपतचे दोन ट्रॅप झाले आहेत. चौघे कर्मचारी चोरीला सहाय्य केले म्हणून निलंबीत आहेत. याच पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचार्‍यांच्या विरोधात असल्याचे सिद्ध झाल्याने नुकतेच दोघांची बदली करण्यात आली आहे. इतकं सगळं होऊन देखील येथे एखाद्या खमक्या अधिकार्‍याची गरज असताना छोट्या पोलीस ठाण्याचा अधिकारी मोठ्या पोलीस ठाण्यात आणून बसविणे हे कशाचा द्योतक आहे? हे जनतेला कळले पाहिजे.  

खरंतर डॉ. किरण लहामटे म्हणतात की, मी भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आहे. मग येथे सगळा भ्रष्टाचारच सुरू आहे. साहेब.! भर लॉकडाऊनमध्ये गांजा घरपोच मिळत होता. तुम्हाला वाईट वाटेल, परंतु एका दुचाकी ट्रिपलशील तरुणांनी तुमच्या गाडीला कट मारला म्हणून तुम्ही त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात बसून ठेवले. पण, तालुक्यात भर दिवसा वाळुच्या गाड्या तुमच्या गाडीला ओव्हरटेक करुन जातात. याबाबत तुम्ही ब्र शब्द देखील काढत नाहीत. रेशनचा घोटाळा कोणाच्या काळात झाला? कोविड सेंटरमध्ये प्रशासनाकडून काय-काय घोटाळे चालु आहे? पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार देखील तुमच्याच काळातले, म्हणजे मांडलं तर फार काही आहे. मग, हे कर्दनकाळ वैगरे शब्दांना कशासाठी लाजवता? हेच कळत नाही. अकोल्यात राजूर वगळता मटका, जुगार, दारु, गांजा, वाळु, गोतस्करी, रेशन, राजुरच्या जंगलातून होणारी लाकडांची तस्करी हे सगळं अगदी बिनधास्त आणि बिनदिक्कत सुरू आहे. आला आशिर्वाद कोणाचा आहे? जनतेच्या समोर तुम्ही अधिकार्‍यांना गोलीगत शब्दांचे हार घालतात. मग, त्यांच्याकडून कोणतीच का कारवाई होत नाही? काय सांगायचय साहेब.! फक्त झाकली मुठ सव्वा लाखाची.! 

एकंतर, सगळा सावळा गोंधळ सुरू असताना न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा प्रश्न उभा राहतो. आमदार व्यक्ती म्हणून चांगले आहेत. मात्र, त्यांचे मार्गदर्शन फार विचित्र आहे. ज्या-त्या कार्यकर्त्याला साहेबांनी न्याय दिला तर त्यांचे भविष्य उज्वल आहे. पण हे आपण सांगण्यात काय अर्थ, त्यांची एक तारी धुन अर्थात एकला चलो रे.! ही भुमिका त्यांच्या कर्तुत्वाचा आलेख खाली आणत आहे. जर आमच्यासारख्या व्यक्तींना त्यांनी आणलेले अधिकारी न्याय देत असतील, म्हणजे कायदेशीर असून देखील सहकार्य करीत नसतील तर सामान्य माणूस दिवसभर पोलीस ठाण्याच्या कोपर्‍यात बसून राहिला तर त्याचे आश्चर्य काय? जनतेने 2019 मध्ये परिवर्तन पाहिले. मात्र, त्याचे तोटे देखील आज पहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधी यांचे काही कार्यकर्ते वेगवेळ्या कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करीत असल्याचे दिसते आहे. एव्हाना साहेबांच्या नावाखाली कोणी किती मलिदा जमा करतय हे समोर येत आहे. फक्त त्यात कोणाकोणाचे हात बरबटले आहेत. हे साहेबांनी तपासून पाहिले पाहिजे. अन्यथा भ्रष्ट्राचारी आणि अवैध धंद्यावाल्यांचा कर्दनकाळ म्हणार्‍या आमदारांनी आजवर त्यांच्या कार्यकर्त्यांनीच अडचणीत आणले आहे. आता यापुढे त्यांनी आणलेल्या अधिकार्‍यांनी त्यांना अडचणीत आणू नये. हीच अपेक्षा आहे. 

मला अजुही चांगले आठवते आहे. नगर शहरात नेप्ती परिसरात पोलिसांनी एक छापा मारला होता. दुकानात फार नाही नव्हते. पण, दारुचे काही बॅक्स मिळून आले होते. तेव्हा तोफखना पोलीस ठाण्याचे तत्कालिक पोलीस निरीक्षक यांनी संबंधित हॉटेलमधून त्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तळणारे भजे देखील जप्त केले गेले होते. त्यामुळे, खुर्च्या, टेबल आणि अन्य वस्तू तर बाजुलाच राहिल्या. यावर न्यायालय देखील खुश झाले होते. म्हणजे अधिकारी असावेत तर असे, ज्यांनी कायद्याच्या प्रत्येक अधिकारांचा विनियोग करता आला पाहिजे. मात्र, आपले नवोदीत मिथुन दादा घुगे यांनी गुन्ह्यातील मुद्देमालच गाळा मालकाच्या स्वाधिन केल्याचे समोर येऊ लागले आहे. म्हणजे, त्यांनी जेव्हा देवठाण, विरगाव शिवारात जुगारावर छापा टाकला त्यात जनतेने त्यांचे कौतुक केले. मात्र, त्यांनी बाकी पळून गेलेले आरोपी का सोडून दिले? तेव्हा मात्र, त्यांनी गुन्ह्यात मुद्देमाल मोठा दिसावा म्हणून त्यांनी जुगार खेळणार्‍यांच्या दुचाकी जप्त केल्या होत्या. आता या गुन्ह्यातील मुद्देमाल गाळा मालकाला का देऊ वाटतो. याचा गौडबंगाल काय?

दरम्यान, जेव्हा या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त का केला नाही. असे अर्जाची चौकशी करणार्‍या आहेर पोलीस कर्मचार्‍यास विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित माल हा डॉ. गणेश नवले यानेच विकत घेतला आहे. तर दुसरीकडे गणेश नवले याची रेकॉर्डींग आहे की, तो समोरच्याला म्हणतो. तू पोलिसांना सांग की, संबंधित मुद्देमाल हा मी (म्हणजे भाडेकरुने) विकत घेतला आहे, असे सांग. मग नवलेंच्या गाळ्यात जे काही कपाट आहे. त्यात सर्व साहित्य हे भिशी चालकाचे आहे. त्यात भिशीच्या शंभर पेक्षा जास्त पावत्या देखील आहे. आहेर यांना विचारले की, ते कपाट त्यांचे आहे तर त्यात भिशीचे साहित्य कसे? तर आहेर यांनी उत्तर दिले की, कपाट खोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे, त्याला मी कसा हात लावू.! म्हणजे एखाद्या ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यात स्पॉट पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांने तेथे कोणत्याही गोष्ठींची तपासणी करायची नाही. कपाट खोलुन पहायाचे नाही. मग, पोलिसांनी तेथे जायचे तरी कशाला? सगळ्याच गोेष्टी जर मिलीभगत असतील तर केवळ कागदी घोडे नाचवून अर्ज निकाली काढण्याची घाई करण्यात अर्थ तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतो. आता याबाबत पोलीस महानिरीक्षक, पोलीस संचालक आणि गृहमंत्री महा. राज्य यांच्याकडे यातील काही गोष्टींची तक्रार ई-मेल द्वारे करण्यात आली आहे. त्याचे सखोल वृत्त क्रमश: भाग 2 मध्ये..

तळतळीचे कारण काय?

डॉ. नवले यांच्याकडून जेव्हा कार्यालय भाड्याने घेतले तेव्हा लगेच 15 दिवसात लॉकडाऊन लागले. कार्यालयात 60 ते 70 हजारांचे काम केले होते. लॉकडाऊन सुरू असताना देखील डॉ. नवले कधी भाड्याला एक दिवसही थांबले नाही. भाड्याबाबत कधी वाद झालाही नाही. मात्र, कोरोनात कोविड सेंटर उभारायचे म्हणून वारंवार अडून पाहणत आले. या दरम्यान, दु:खद बाब अशी की, नवले यांनी व्हाटसॅपवर गाळा खाली करण्यास मेसेज टाकले. मात्र, या दरम्यान, भाडेकरुच्या कुटुंबातील 15 जण कोरोनाचे पॉझिटीव्ह होते. तर त्यात आजी आजोबा आणि एक बहिन असे तिघे मयत झाले होते. तर 12 जणांवर नाशिक, संगमनेर, अकोले तालुक्यात उपचार सुरू होते. अशात त्याच्या सख्या दाजींना ब्रेन स्ट्रेक (पॅरलेसेस) झाला. ही सगळी संकटे अगदी अवघ्या काही तासात निर्माण होत होती. त्यामुळे, अक्षरश: तक्रारदार हा कुटुंबातील कर्ता असल्याने गाळा खाली करणे जमले नाही. लाखो रुपये कोरोनाचे बिल भरूनही गाळ्याचा एक रुपये देखील ठेवलेला नाही. दुर्दैवाने नवले यांनी तक्रारदाराला न सांगता गाळा खाली केला. पण, त्यांचे दुर्दैव असे की, तोवर कोरोनाची लाट निघून गेली होती. आमचे साहित्य दुसर्‍याच्या गाळ्यात बेवारस ठेवले, मात्र आजही तो गाळा तसाच पडून आहे. तर पोलिसांच्या आशिर्वादाने तो गुन्ह्यातील मुद्देमाल, दोन केबिन, दोन टेबल, सोफा, काही खुर्च्या, टिपॉट, आणि या सर्वांना साक्ष असणारे परमपुज्य अगस्ति महाराजांचा फोटो. माणूस म्हणून तुम्ही विचार करु शकले नाही तर खरच यांना माणूस म्हणवं का?

क्रमश: भाग ३