आमदारांनी जनतेची दिशाभुल केली.! राष्ट्रवादीला या सात गोष्टींचा विसर.! पहा जरा पटतय का? भावनिक जनता आणि भोळा आमदार.!
![]() |
न्याय मागाल तर बुक्का.! |
सार्वभौम (अकोले) :-
बस झाले आता पिचड पर्व, तीच गुल आणि तीच काडी, हे कोठेतरी थांबले पाहिजे, असे म्हणत अकोले तालुक्यात मोठ्या अपेक्षेने जनतेने डॉ. किरण लहामटे यांना निवडणुन दिले होते. मात्र, झाले काय? जनतेचा सगळा भ्रमनिराश झाला. 24 ऑक्टोबर 2019 ते 21 जुलै 2021 असा हा 1 वर्ष 7 महिने व 27 दिवस अश्वासन पुर्तीचा प्रवास निरर्थक ठरल्याचे जाणवू लागले आहे. कारण, हे तेच डॉक्टर आहे. त्यांनी तोलार खिंड फोडण्याचे वचन दिले होते. हे तेच डॉक्टर आहे, ज्यांनी तरुणांच्या मतांसाठी एमआयडीसीचे अमिष दाखविले होते. हे तेच लहामटे आहेत ज्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न तालुक्याला दाखविले होते. हे तेच किरणजी आहेत, ज्यांनी अकोले तालुक्यातून रेल्वे जाण्याचे दिवास्वप्न पाहून जनतेला झोपी लावले आहे. यांच्या काळात कधी तालुका शांत राहिला नाही, साधं अकोले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची पोष्टींग असताना येथे सहायक पोलीस निरीक्षक आणून बसविला जातो, यांच्याच काळात तालुक्याचा कामधेनु बदनाम होऊन आज लेबर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे, साहेब.! लोकं म्हणतात की, डॉक्टरांनी नेमकं केलं तरी काय? घेण्या न देण्याचे पॉझिटीव्ह झाले आणि उगच पळत फिरले. त्याचे इनपुट आणि आऊटपूट काय? त्यामुळे, खरोखर तुम्ही जनतेची दिशाभूल केली असे आरोप आता होऊ लागले आहेत.
गेली 40 वर्षे पिचडांनी काय केलं? या प्रश्नाचे उत्तर मागण्यात सगळा तालुका एकवटला होता. त्या 40 वर्षात त्यांनी काय केलं हे त्यांनी तोडकं मोडकं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून कोणाचे समाधान झाले तर कोणाचे नाही. मात्र, डॉ. लहामटे यांच्या काळात गेल्या दोन वर्षात उल्लेखनिय काम काय झाले? याचे उत्तर त्यांनी आता मीडियासमोर येऊन दिले पाहिजे. ते देखील जनतेला खुश करणार्या गप्पा गोष्टींनी आणि केवळ पिचडांच्या विरोधात बोलुन नव्हे तर जनतेला गुणात्मक दृष्ट्या काय उपायोजना केल्या त्याबाबत त्यांनी उत्तरे दिली पाहिजे. तसेच आमदार निधी आणि सरकारी यंत्रणा या व्यतिरिक्त देखील निलेश लंके यांच्याप्रमाणे काही उत्तरदायित्व असते तसे काय केले का? यावर देखील त्यांनी उजाळा केला पाहिजे.
खरंतर पिचड साहेबांनी आजवर तोलारखिंडींवर राजकारण केले. त्यांच्याच पायावर पाय देऊन डॉक्टरांनी तोलार खिंडीवर राजकीय घाव घातला. निवडणुका संपल्या आणि मोठ्या दिमाखात आठवण येईल तेव्हा तोलार खिंडत जाऊन वारंवार फोटोसेशन केले. त्यावर उपायोजना काय? तर शुन्य, म्हणजे जेव्हा अजित दादा अकोल्यात आले तेव्हा देखील त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते. उठ-सुट पिचडांनी तोलारखिंडीचे राजकारण केले, आता तो प्रश्न आम्ही मार्गी लावू, दादांच्या आमदाराने देखील तोच प्रश्न प्रलंबित ठेऊन पुढील निवडणुकीत त्याचे राजकारण करतील याची शास्वती आता आली आहे. त्यामुळे, तोलारखिंड फुटेल आणि मुंबई जवळ होईल हे दिवास्वप्न साहेबांनी दाखविले आहे. म्हणजे, पुर्वी लहान मुलांच्या दोन्ही कानांवर हात ठेऊन त्याला वर उचलायचे आणि म्हटले जायचे. दिसली का मुंबई? काना दुखल्याने तो जीवाच्या आकांताने ओरडायचा आणि म्हणायचा. हा, हो.! दिसली बाबा एकदाची मुंबई.! आता पाहिले खाली घे. अशाच पद्धतीने राष्ट्रवादीने अकोले तालुक्याला मुंबईचे दर्शन घडविले आहे.
पुढे प्रश्न आला एमआयडीसीचा. या पिचडांनी केलं काय? नुसती धरणं बांधून ठेवली, तालुक्याचे तरुण शेजारी रोजगार शोधायला जातात, त्यामुळे, मला निवडून दिले तर मी अकोल्यात एमआयडीसी बांधतो, असे नाही झाले तर मी नावाचा डॉक्टर नाही. नंतर झालं काय? तालुक्यातील तरुणांना डॉक्टांनी रोजगार दिला. मात्र, तो कसा? तर सोशल मीडियावर त्यांची बाजू मांडणे, आरे ला कारे प्रतीउत्तर देणे, गुणवत्ता आणि वैचारिक पातळी सोडून बोलत पिचडांवर भाष्य करणे, हाच स्वयंपुर्ण रोजगार होय. वाचायला थोडं कटु वाटेल, पण डॉक्टरांनी जीतका आव आणला होता. तितकी कामे केली का? याचे आत्मचिंतन जनतेने केले पाहिजे. तुम्ही म्हणाल की, लॉकडाऊनचा काळ सुरू होता. तर ते साफ खोटं आहे. प्रस्ताव करून मंत्रायलयात सादर करणे आणि त्याचा पाठपुरावा करुन मंजुरी मिळून घेणे हे साहेबांचे काम होते. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते आणि बांधकामे सुरू होती. अकोल्यात कोणते मुख्य रस्ते मार्गी लागले? सगळ्या गोष्टी भावना आणि रेटून बोलण्याने होत नसतात साहेब.! त्याला कृती आणि कर्तुत्वाची देखील जोड असावी लागते.
आज फार जड अंत:करणाने सांगावेसे वाटते की, अकोले तालुक्यातून रेल्वे जाणार हे एकल्यानंतर एक इतिहास घडेल. असे वाटले होते. डॉ. किरण लहामटे यांनी व्हीसी (व्हिडिओ, कॉन्फरन्सी) सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रेल्वे स्टेशन बाबत मागणी केली होती. दादांनी देखील बच्चे खुश केेल्याप्रमाणे हो म्हणत चालढकल केली आणि तालुक्यात दादांच्या आणि डॉ. किरण लहामटे यांच्या नावे सोशल मीडियावर अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले होते. वास्तवात झाले काय? उलट सिन्नरहुन थेट आणि पुढे साकुर नारायणगाव असा आडवळणी मार्ग आपल्या डोळ्यासमोरुन निघून गेला. अकोले तालुक्याला फक्त रेल्वेचा भोंगा ऐकण्याचे भाग्य तालुक्याला कोणामुळे लाभले? याचे जनतेने आत्मचिंत केले पाहिजे. आज तालुक्याचे सुरेश नवले, महेश नवले, सुशांत आरोटे, शांताराम संगारे, प्रमोद मंडलीक, शुभम आंबरे यांच्यासह अनेक सुपुत्र रेल्वेसाठी आंदोलन करीत स्थानबद्ध झाले आहेत. (याबाबत भाग 2 उद्या)
साहेबांना एकदा कोणीतरी विचारले पाहिजे. तालुक्यातील लोक कोरोनात किड्या मुंगीप्रमाणे मेले. ऑक्सिजन नाही म्हणून तुमच्या जनतेने जीव सोडले. तालुक्यातील भूमिपुत्र ऑक्सिजन टँक पाहत अन्य तालुक्याच्या सिमा पायाखाली घालत होते अक्षरश: भिक मागत होते. तेव्हा तुम्ही एक टूम आणली होती. ती म्हणजे ऑक्सिजन प्लॅन्ट, जेव्हा तालुक्यात सहाशे पेशन्ट निघत होते. तेव्हापासून हा प्लॅन्ट येणार होता. तुमच्या बरोबरीने रोहित पवार यांनी दिडशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणले आणि वाटले देखील, अगदी शेजारी ना. थोरात साहेबांनी ऑक्सिजन प्लॅन्टचा घाट घातला नाही, त्यांनी देखील काळाची गरज ओळखून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन वाटून देखील दिले. आज तालुक्यात फक्त 6 ते 7 रुग्ण रोज मिळत आहे. तरी देखील आपला प्लॅन्ट ऊभा नाही. कालच तज्ञांनी कोरोनाची तीसरी लाट तोंडावर आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, जनतेने मरायची तयारी ठेवावी का? असे आवाहन तुमचे विरोधक करीत आहे. त्यावर तुम्ही काय निर्णय घेणार आहात का? तुम्हाला सांगायला दु:ख वाटते की, जेव्हा राज्य शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयांची यादी जाहिर झाली. त्यात फक्त कर्जत आणि श्रीरामपूर अशा दोन ठिकाणी त्यांना मंजूरी मिळाली आहे. अकोले तालुक्याला पुन्हे ठेंगा मिळाला आहे.
खरंतर डॉक्टर आमदार झाले, मात्र त्यांना प्रशासनाने अगदी बोटावर खेळविले. हो साहेब असे म्हणून वारंवार वेळ मारुन नेली. खरंतर प्रत्येकाला विश्वासात घेतले असते तर प्रशासनाने त्यांना मुजार केला असता. मात्र, ते देखील त्यांच्या मागेपुढे उघड-उघड नाराजी व्यक्त करीत आहेत. आता साधी एक गोष्ट पहा. अकोले पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाचे पद आहे. मात्र, तेथे सहायक पोलीस निरीक्षक आणून बसविले आहे. त्यांनी यापुर्वी एकाही तालुक्यात इन्चार्ज म्हणून काम केलेले नाही. त्यामुळे, अकोले तालुक्यात आमदारांना काही कळत नाही. त्यामुळे, जनतेच्या माथी काहीही मारले तरी चालते. हे वरिष्ठांनी समजून घेतले आहे. तालुक्यात जसे डॉक्टर आमदार झाले आहे. तेव्हापासून बीडीओ लाच लुचपतमध्ये गेले. दोन पोलिसांवर ट्रॅप पडला, सहा पोलीस निलंबित झाले. 42 कर्मचार्यांचे पोलीस ठाणे असून फक्त 22 पोलीस कर्मचारी या पोलीस ठार्यात कार्यरत आहे. माग, कसा कायदा आणि सुव्यवस्था नांदेल? आमदार साहेब तुम्हाला विधानसभेचा अनुभव नाही. त्यामुळे, तुमच्याकडून तालुक्याच्या गरजा पुर्ण होत नाही. मग तुमच्या प्रशासकीय अज्ञानामुळे तालुक्याचे नुकसान का करुन घ्यावे? त्यामुळे, राजूर सारखे पोलीस ठाणे एपीआय चालवितात मग अकोले देखील अनुभव नसनारे अधिकारी कसे चालवतील? जसे शरद पवार साहेबांनी 26 जानेवारी 1993 किल्लारी भुकंपात उत्तम प्रशासन हताळले त्यानंतर पुन्हा जेव्हा-जेव्हा राज्यावर नैसर्गीक आपत्त्या आल्या. तेव्हा-तेव्हा त्यांच्या अनुभवांचा वापर झाला. त्यामुळे, अनुभव फार काही मायने ठेवतात. खरंतर आरविंद जोंधळ यांनी राजकारणी लोकांना आश्रय दिला नसेल. मात्र, त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर येथे एकही गुन्हा कायम तपासावर ठेवला नाही. (यावर भाग 3 स्वतंत्र वाचा)
एकंदर डॉ. किरण लहामटे हे आमदार झाल्यापासून त्यांनी जी काही आश्वासनांची खैरात मांडली होती. खरोखर पुर्ण झाली का? याचे आत्मचिंतन त्यांच्या चाहत्यांनी केले पाहिजे. भावना वागळ्या आणि वास्तवत: खरोखर जनतेसाठी कामे झाली का? कारण, जाहिरात घेऊन शांत बसण्यापेक्षा वास्तव जनतेपुढे आणण्यात रोखठोक सार्वभौमने नेहमी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, या आणि अशा अनेक बाबी तालुक्याला अगदी पडत्या काळात मिळाल्या नाहीत. येणार्या काळात देखील अशा चुका होऊ नये असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे, आमदार साहेब.! देर ही सही दुरूस्त जरुरी हैं.!
भाग 2 क्रमश: