मेंढ्या चारण्यासाठी गेली आणि जंगलात तिच्यावर बलात्कार झाला, बालिका सहा महिन्यांची गरोदर.! त्याच्यावर गुन्हा दाखल.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                        मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. जेव्हा ही बालिका गरोदर राहिली, त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. ही घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव शिवारात सहा महिन्यांपुर्वी घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र नामदेव कांदळकर (रा. जोर्वेकर वस्ती, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या एक वर्षापासून एक 16 वर्षीची बालिका आपल्या कुटुंबाची उपजिविका भागविण्यासाठी शेळ्या-मेंढ्या घेऊन त्या चारण्यासाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरात असणार्‍या कराचे डोंगरावर तसेच त्या जवळच असणार्‍या वनविभागात जात होती. तिच्यावर आरोपी कांदळकर याची नेहमी नजर राहत होती. मात्र, एका व्यक्ती म्हणून त्याची तिच्यावर वाईट नजर आहे. हे पीडित बालिकेच्या लक्षात आले नाही. या दरम्यान, आरोपी याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, एक वर्षापासून ते दि. 8 जून 2021 रोजी पर्यंत वेळोवेळी या बालिकेला गाठवून आरोपी कांदळकर याने तिच्यावर अत्याचार केले आहेत. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी मेंढ्या चारण्यासाठी कराच्या डोंगराजवळ गेले होते. तेव्हा आरोपी याने तिला शरिर संबंध ठेवण्यास प्रेरित करुन बलात्कार केला. घडलेला प्रकार जर कोणाला सांगशील तर तुला मारुन टाकेल. अशी धमकी देऊन निघून गेला. दरम्यान जेव्हा पीडित मुलीचे आई-वडिल हे मेंढ्या चारण्यासाठी बाहेरगावी गेले असता याने तोच डाव साधला आणि त्याने पीडित मुलीस एकटे पाहून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.

दरम्यान, त्याने धमकी दिल्यामुळे मुलगी काही बोलली नाही. मात्र, जेव्हा शरिर संबंध झाल्यानंतर पाच ते सहा महिने निघून गेले. त्यानंतर पीडित मुलीचे पोट दुखू लागले होते. त्यामुळे, तिला घरच्यांनी डॉक्टरांकडे नेले. यात डॉक्टांनी सांगितले की, ती सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपुर्वी जो काही प्रकार घडला तो मुलीने पालकांना कथन केला. त्यानंतर मुलीला घेऊन तिच्या पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर आरोपी राजेंद्र कांदळकर याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी सानप करीत आहेत.

दरम्यान, संगमनेरात महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते असले तरी त्यात फारशी शिक्षा लागत नाही. त्यामुळे, काही होत नाही या अविर्भावातून अशा प्रकारची गुन्हागारी वाढत आहे. तर, शिक्षा होत नाही म्हणून फार गुंतागुंतीचेच गुन्हा आजकाल दाखल होत आहे. बाकी, महिला तक्रार देण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे, याकडे स्थानिक समाजसेवक आणि संस्था यांनी लक्ष देणे गरजेेेेचे वाढू लागले आहे.