..अखेर अगस्ति कारखाण्याच्या सर्व संचालकांचे वैतागून राजिनामे, पिचड साहेबांनीही हात जोडले.! देशमुखांचे नाव न घेता टिका.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्याची धनलक्ष्मी अगस्ति साखर कारखाना तथा संचालक मंडळ यांच्यावर काही सभासदांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. हे सर्व आरोप थोतांड असून केवळ संचालक मंडळ आणि चेअरमन, व्हा.चेअरमन यांना बदनाम करुन अगस्ति कारखाना बंद पाडायचे हे षड़यंत्र आहे. खरंतर ज्यांनी साधी पिठाची गिरणी काढली नाही. त्याने कारखाना कसा चालवायचा, हे आम्हाला शिकवू नये आणि जर कोणाची कारखाना चालवायची पात्रता असेल तर मी तुम्हाला हात जोडतो, त्याला माझ्याकडे घेऊन या, मी देखील राजिनामा देतो आणि त्यांच्या स्वाधिन कारखाना देतो. दुर्दैवाने २००२ साली मी कारखाना विरोधकांच्या ताब्यात दिला. मात्र, दोन वर्षे तो बंद पडला, नंतर तो उभा करायला किती त्रास झाला सगळ्या तालुक्याने पाहिले आहे. त्यामुळे, त्रोटस सभासदांनी राजकारण करुन काड्या घालायचे काम बंद केले पाहिजे. कारण, कारखाना म्हणजे काही पोरखेळ नाही. उठसुठ उठायचे आणि दिवसरात्र आरोप करीत सुटायचे. यांच्या डोक्यात काय शिजतय हे ओळखलं पाहिजे. की, कारखाना बंद पाडायचा आणि त्याचे खाजगिकरण करुन तो विकत घ्यायचा. मात्र, ही तालुक्यातील जनता खपवून घेणार नाही. अशा प्रकारचे खडेबोल माजी मंत्री तथा मधुकर पिचड यांनी बी. जे.देशमुख यांचे नाव न घेता सुनावले.
साहेब पुढे म्हणाले की, १९९१ पासून कारखाना सुरु करताना आम्ही किती खस्ता खाल्या आहेत हे आम्हाला माहित आहे. याच्या पुढील मंजुरीसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी किती जीवाचे रान केले आहे हे त्यांना काय माहित. आरोप म्हणजे उचलायची जीब आणि लावायची टाळुला, यांनी कधी शेअर्स जमा केले आहेत का? आज किती दुर्दैव आहे की, ज्यांनी कारखाण्यासाठी काडीचं काम न करता साधी पिठाची गिरण देखील काढली नाही. त्यांचे आरोप आज ऐकावे लागत आहे. असे म्हणत पिचड यांनी खंत व्यक्त केली. तसेच, माझी हयात गेली, मात्र, मी कारखाण्यात अगदी कधीही राजकारण आणले नाही. आजकाल कोणीही यायचे आणि माहिती मागवायची, त्याचा गैरवापर करायचा आणि आम्हाला वेठीस धरायचे. हे आता आम्ही खपवून घेणार नाही. आता आम्ही ठरविले आहे. जर आमच्यावर शिंतोडे उडवाल तर याद राखा, आमचा प्रत्येक संचालक तुम्हाला जाग्यावर उत्तर देईल.
तर कारखाण्याचे व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी अगस्ति कारखाण्याच्या इतिहासाचा आढावा घेतला. अगदी तळमळीच्या भावना व्यक्त करीत जर शेतकरी, बँक व सभासदांमध्ये चुकीची माहिती पसरविली तर कारखाना बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला कारखाना जर बंद पडला तर पुन्हा कारखाना उभा राहणार नाही. त्यामुळे, हा हंगाम संपताच तातडीने सर्व कारभार हा आज आम्ही जनतेसमोर मांडतो आहे. या सर्वांची आकडेवारी माडताना पाटील यांनी अगदी सविस्तर माहिती माध्यमांना दिली. केव्हा किती कर्ज होत. कोणाकडून किती घेतले, किती भरले आहेत, किती बाकी आहे, येणारी इनकम कशी आहे, त्याचे नियोजन कसे आहे. हा सर्व उहापोह त्यांनी मीडियाला दिला. केवळ आम्ही दिलेल्या माहितीचा विपक्यास करायचा आणि जनतेची व शेतकरी सभासदांची दिशाभुल करायची. हे आता डोईजड झाले आहे. त्यामुळे, जर कारखाण्याची त्यांनी चौकशी लावली आहे. तर, त्यांनी तो निकाल येईपर्यंत तरी शांत राहणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने रोज खोटेनाटे होणारे आरोप आता सहन होत नाही. अशा भावना गायकर पाटील यांनी मांडल्या.
ते पुढे म्हणाले की, गेल्या २५ वर्षात आज २०२१ मध्ये चांगला हंगाम पार पडला आहे. ६.१५ लाख मेट्रीक टन गाळप झाले आहे. तर ६ लाख १३० किलोच्या पुढे साखर निर्मित्ती झाली आहे. आजवर कारखाण्याकडे ३६५ कोटींचे कर्ज आहे. त्यात १८४ खेळते भांडवल आहे. इथेनॉलचा प्रकल्प ५१ कोटींचे आहे. म्हणजे कर्जात गुंतवणूक आणि खेळते भांडवल पाहता कर्ज फार आहे असे काही नाही. जिल्ह्यातील ७ ते ८ कारखाण्यांवर इतकेच कर्ज आहे. मात्र, त्याचा इतका बाऊ करण्यात आला आहे की, त्यामुळे, जनतेची दिशाभूल केली जात आहे. खरंतर, तालुक्यातील उस बाहेर जाऊ नये, यासाठी स्वत:वर कर्ज झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये हेच महत्वाचे तत्वा आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे.
यावेळी, बी. जे देशमुख साहेब यांचे नाव न घेता त्यांच्या आरोपांवर पत्रकार परिषदेत खंडन करण्यात आले. गायकर साहेब यांनी आकडेवारी मांडून प्रचंड तळतळ व्यक्त केली. ते म्हणाले, यांना आरोप करणार्यांना काहीतरी वाटलं पाहिजे. येथे ५०० पेक्षा अधिक टण उस कारखाण्यात घालणारे संचालक आहेत. त्यांना जर तुम्ही टोळीचे राजकारण म्हणताना यांना काहीच कसे वाटत नाही. संचालक स्वत:वर कर्ज काढून कारखाना चालवायला तयार आहेत असे असताना त्यांच्यावर आरोप होतात हे किती दुर्दैव आहे. या पलिकडे जर जर आमच्यापेक्षा कोणी चांगला कारखाना चालवत असेल तर आम्ही आजच राजिनामा द्यायला तयार आहोत. आम्ही उलट त्यांना सहकार्य करु, त्यांच्यासोबत जाऊ, कारण, आता हे सहनशिलतेच्या पलिकडे आहे. इतकी हरॉशमेंट आणि वाईट चर्चा त्याला कोणताही आधार नाही. हे केव्हर सहन करायचे? आम्ही राजिनामा देतोय आता तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही फारच सालस असाल तर काराखाना चालवून दाखवा. खरंतर, कारखाण्यात भ्रष्टाचार झाला असे म्हणत यांनी चौकशी लावली. आता ते अधिकारी येऊन चौकशी करीत आहे. जर आम्ही त्यात दोषी आढळलो तर संचालक मंडळ त्यांच्या जमिनी विकून किंवा गहाण ठेऊन जी काही रक्कम होईल ती भरु. पण, त्यांच्यापुर्वीच आम्हाला आरोपाच्या पिंजऱ्यात उभे करणे यांना काहीच कसे वाटत नाही. आता काही झाले तरी एक येथील भुमिपुतरांनी लक्षात ठेवावे, आता जर कारखाना बुडाला तर पुन्हा कारखाना उभा होणार नाही. म्हणून तर काही झालं तरी आम्ही कारखाना आजवर बुडू दिला नाही. मात्र, यांना कारखाण्याचे वाटोळे करायचे आहे.
- सागर शिंदे