ऐ विघ्नसंतोषी एक बाई घेऊन ये अन आमच्या पोलिसावर विनयभंग दाखल कर.! आण्णांचा तोतया समाजसेवक आणि बंडखोर पोलिसाचा आँडिओ व्हायरल.!
सार्वभौम (राजूर/अकोले) :-
अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस खात्यात असा एक पायंडा पडून गेला आहे. जो कोणी कर्तव्यात कसूर करतो त्याला उचलायचे आणि अकोले-राजूर येथे टाकून द्यायचे. एखाद्या पोलिसांने/अधिकाऱ्याने खात्याबाह्य काम केले की त्याची बदली थेट अकोले किंवा राजूर येथे करायची. मग तुम्हीच सांगा साहेब.! येथे येणारा दुय्यम अधिकारी असो वा कर्मचारी, तो काय आत्मियतेने काम करणार.? पोलीस ठाण्यात येऊन छेडछाड करणे किंवा याचे त्याचे उनेधुने करुन मलिदा गोळा करण्यापलिकडे दुसरे काम असते तरी काय ? थोडं मागे जाऊन तपासले तर लक्षात येईल की, इन्चार्ज वगळता कोणत्या कर्मचाऱ्याने अगदी उल्लेखनिय काम केले आहे का.? असेलही तुरळक, परंतु येथे उनिधुनी करणारे सोडून काही कर्मचाऱ्यांना काम असते तरी काय.? एखादा विघ्नसंतोषी तोतया समाजसेवक हाताशी धरायचा आणि गोरगरिबाच्या आया-बायांना भुलवून खोटे-नाटे गुन्हे दाखल करायला लावायचे. यातच धन्यता मानतात. अगदी असाच एक प्रकार राजूर पोलीस ठाण्यात घडल्याचे समोर आले आहे. आपल्याच पोलीस खात्यात काम करणाऱ्या सहकाऱ्याचा काटा काढायचा म्हणून मी आण्णा हजारेंचा कार्यकर्ता म्हणणारा तथा शिवसेनेचे खा. यांचा विघ्नसंतोषी समर्थक याला फोन करुन एक बाई आणायला सांगितली आणि तिच्याशी अंगलट केली अश्लिल चाळे केले अशी फिर्याद भडकवाड यांच्या विरुद्ध देण्यास सांगितली. म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्याचा त्या महिलीशी कोणताही संबंध नसताना त्यांना चौकशीत अडकवून गुन्हा दाखल करण्याचे षड़यंत्र दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आखले होते. मात्र, सुदैवाने ही अॉडिओ रेकॉर्डींग व्हायरल झाली आणि हा प्रकार समोर आला आहे. केवळ पोलीस ठाण्यातील वर्चस्वाहुन हा प्रकार घडला असून आता या दोन्ही व्यक्तींमधील संवाद जातीयवादी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, या दोघांवर पोलीस अधिक्षक हे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतात का ? की यांना पाठीशी घालतात. हे पाहणे महत्वाचे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजूर पोलीस ठाण्यात जसे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे हे हजर झाले होते. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकिय दबावाला खतपाणी घातले नाही. जे असेल ते कायद्यावर घेत कारवाई केली. म्हणून तर आमदार महोदयांचे कट्टर समर्थक संतोष परते यांच्यावर रेशन प्रकरणात कायदेशिर कारवाई केली. साबळे यांची निर्भिडता त्यांना कोठेतरी बाधक ठरणार यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यांनी आपले काम सोडले नाही. मात्र, या पोलीस ठाण्यात जमलेला डिफॉल्ट कर्मचाऱ्यांचा गोतावळा गप्प बसेल तो पोलीस कसला? साहेबांना खुश करायला किंवा पोलीस ठाण्यात आपले वर्चस्व गाजवायला नको त्या थराला जाणारे देखील पोलीस येथे आहेत. साहेब.! जर खरोखर तुम्हाला शोध घ्यायचा असेल तर आघाव यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी करा. असे बोलले जाते की, आघाव यांच्याकडे पोलीस ठाण्यातील बहुतांशी जबाबदारी होती. ती या व्यक्तीला खटकत होती. आघाव यांच्यासह भडकवाड देखील पोलीस ठाण्यात पुढाकार घेत होते. त्यामुळे, आघाव यांचा राईट कार्यक्रम झाला, आता भडकवाड यांचे प्रस्त कमी करायला काय केले हे सर्व क्लिपमध्ये आहेच. त्यामुळे, पोलीस अधिक्षक मनोज पाटिल साहेब यांनी या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, हीच राजुरकरांची इच्छा आहे.
आता ज्या व्यक्तीने हे प्रकाश मय दिवे लावण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यांची मोडस काय आहे. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. एखाद्या महिलेला पुढे करुन तिची आब्रु वेशिवर टांकायची आणि यांनी आपली पोळी भाजून घ्यायची अर्थातच एका महिलेला बदनाम करुन दुसऱ्याच्या आयुष्याचे वाटोळे करायचे. विशेष म्हणजे पोलीसच पोलिसाच्या विरोधात जाऊन फालतू लोकांच्या नादी लागून खात्याला बदनाम करतो. यापेक्षा वेगळे दुर्दैव काय असू शकते.? आता या पोलिसाला जोडीदार कोण ? तर हा विघ्नसंतोषी तोतया समाजसेवक. जो ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे नाव सांगून अकोले व राजूर परिसरात दलाली करतो. लोकांना लुटनारा हा स्वयंघोषित नेता, खा. सदाशिव लोखंडे यांचा कार्यकर्ता आहे. आजवर त्याने राजूर पोलीस ठाण्यास दलालीचेच काम केल्याची माहिती पोलीस देतात. तर, याच्या नावे राजूर पोलीस ठाण्यात अनेक गंभिर गुन्हे दाखल आहेत. याच्यावर तडिपारीचा प्रस्ताव देखील तयार झाला होता. मात्र, हा प्रचंड उचापतीखोर आहे. अनेकांना उलटपालट सल्ले देणे, सरकारी कर्माचार्यांना धमकाविणे, पोलीस ठाण्यात येऊन वारंवार हस्तक्षेप करणे, अशा नाना उचापती हा व्यक्ती करत असतो. त्यामुळेच याला निर्भिड पोलिसांनी अगदी पोलीस ठाण्यातून बाहेर हाकलून दिले होेते. पुर्वी याच्या भाच्याचे प्रकरण होते आता किरण नामक व्यक्तीचे म्हणजे? रिकामटेकडे उद्याग सोडून हा व्यक्ती काहीच करत नाही. त्यामुळे, पोलिसांच्या जिवावर मोठा झालेल्या या व्यक्तीच्या नांग्या आणखी मोठ्या होऊ देण्यापेक्षा आजच खोडलेल्या कधीही बऱ्या. आता फक्त हे एसपी पाटील व पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांना कळालं म्हणजे बरे.! अन्यथा येरे माझ्या मागल्या. हेचपुढे सुरु राहिल.
राजुर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देविदास भडकवाड यांचेवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र तसेच जातीवाचक संभाषणाची ऑडिओ क्लिप हाती लागली असुन मागासवर्गीय पोलिस कर्मचारी कसे बदनाम करुन करणा्याचे षडयंत्रची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी संगमनेर तालुक्यातील मागासवर्गीय संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मदने साहेब यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणावर चर्चा करून संबंधित वर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी दलित पँथरचे जिल्हा प्रमुख सोमनाथ भाऊ भालेराव, लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख मंजाबापु साळवे, शिवसेनेचे अध्यक्ष रविंद्र भाऊ गिरी, दलित पँथरचे शहर अध्यक्ष राजाभाऊ खरात, आदिवासी संघटनेचे अध्यक्ष संदिप भाऊ दळवी, दलित विकास आघाडीचे प्रमुख संतोष भडकवाड ,जेष्ठ नेते प्रवीण गायकवाड, आदी सहभागी विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.