तुझी बिल भरायची लायकी नाही, मार रे याला अन् द्या हकलून.! 95 हजार भरुनही पेशन्ट मयत झालं, अमानुश "वाणी" वागणूक.! नर्स, डॉक्टर, मेडिकल चालकावर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजापूर येथील एका महिलेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्यांची बुधवार दि. 26 एप्रिल रोजी एका खाजगी दवाखान्यात कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी त्याच दिवशी एच.आर.सी.टी स्कॅन केला. यामध्ये त्यांचा स्कोर अधिक प्रमाणात दिसून आला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी बेड शोधण्यास सुरवात केली. त्यांना शहरातील लिंकरोड येथे डॉ. वाणी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले गेले.
रुग्णाला दाखल केल्यानंतर पाच दिवस जनरल ऑर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णासाठी रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले. रुग्णाच्या नातेवाईकांनी ते उपलब्ध देखील करून दिले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी 60 हजार रुपये तर मेडिकलचे 35 हजार रुपये असे एकुण 95 हजार रुपये रक्कम वाणी हॉस्पिटलमध्ये भरली. येवढी रक्कम भरून देखील मेडिकलवाल्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना फक्त कच्ची पावती दिली व हॉस्पिटलचे संपूर्ण बिल भरल्यानंतरच पावती भेटेल असे हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर येवढा खर्च करून देखील योग्य तो उपचार न झाल्याने दि. 7 मे रोजी रुग्णाचे निधन झाले असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर, सोमवार दि. 7 जुन रोजी उर्वरित रक्कम भरण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक गेले असता हॉस्पिटल प्रशासनाकडे प्रिस्क्रिप्शन व पक्की बिले शासकीय योजनेसाठी मागितले असता डॉ. वाणी व त्यांचा स्टाफ यांच्यात किरकोळ बाचाबाची सुरु झाली. या दरम्यान रुग्णाच्या रुग्णालयातील व्यक्तींना रुग्णाच्या नातेवाईकाला लाथा बुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली व अपशब्द वापरून रुग्णाच्या नातेवाईकाला अपमानीत केले. तुमची बील भरायची लायकी नाही असे म्हणत धक्के मारून हाकलुन दिले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांपुढे कथन केला. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये डॉक्टर, मेडिकल व नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पहिला कोरोना लोकांच्या मुळावर उठला होता. मात्र, आता काही डॉक्टर सामान्य लोकांच्या मुळावर उठले की काय? अशी टीका आता संगमनेरात होताना दिसत आहे. कारण, 1 लाखपेक्षा जास्त बिल आल्यास प्री- ऑडिट करणे गरजेचे असताना ते कुठे होताना दिसत नाही. पेशंट ऍडमिट केले की, लाखो रुपये बिले येतात. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांचे प्रशासनाकडून निरासन होत नाही. त्यामुळे, डॉक्टर आणि सामान्य माणसांमध्ये बाचाबाची होण्याच्या घटना आता संगमनेरात वाढताना दिसत आहे. तर यापुर्वी अशा नगन्य वाद झाले आहेत. मात्र, दुर्दैवाने एकीकडे निर्ढावलेले प्रशासन आणि भयभित झालेली जनता त्यामुळे न्याय मागायची सोय राहिली तरी कोठे ? मात्र, काही धाडशी लोक व काही डॉक्टर लोकांचा अतिरेख झाल्यामुळे पर्यायी याचे रूपांतर वादात होऊन पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढण्याची वेळ संगमनेरात येत आहे. तर यापलीकडे हम करे सो कायदा आशा पद्धतीने अधिकारी वागताना दिसत आहे. खरंतर, आजकाल मलिदा मिळेल अशी कामे अगदी तात्काळ होतात. मात्र, सामाजिक व जनतेच्या प्रश्नांचे निरासन होईल अशा कामांकडे कोणी लक्ष देत नाही. हे संगमनेरकरांचे दुर्दैव आहे. या विस्कळीत व्यवस्थेला जबाबदार कोण? याचे आत्मचिंतन करावे लागणार आहे.
खरंतर, लोक म्हणतात रुग्णालयात यातना आणि वेदना दोन्ही कमी होतात. पण इथे उपचारासाठी लाखो रुपयांचे बिल पाहूनच छातीवर दडपण येते. संगमनेरात मोफत उपचाराच्या सुविधा अगदी नगण्य आहे. सर्वाधिक खाजगी हॉस्पिटल असल्याने जनतेला उपचारासाठी फार पैसे मोजावे लागले. त्यामुळे काही हॉस्पिटलांमध्ये रुग्णाकडून अव्वाच्या-सव्वा पैसे उकळून रुग्णांची इथे लुट केली. तक्रार केली की, सोयीस्कर पणे त्यावर पडदा टाखायचा आणि डॉक्टरांना गुन्ह्यात पाठीशी घालायचे हे इथे सुरळीत पणे चालते. त्यामुळे, येथील सामन्य माणसांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर वारंवार नाराजी दाखवली आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात कोविडच्या सर्व सिमा पार केलेल्या असतांना येथे प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. रुग्ण सापडतात मात्र, त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्रशासन किंवा सामाजिक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. काही रुग्णांना कोविडचे उपचार मिळाले नाही. तर काही कोविडने कमी तर भीतीने जाण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत 22 हजार 157 रुग्ण झाले असुन रोजच शंभरीच्या घरात आकडा निघत आहे. एकीकडे पाच दिवसात दिड-दिड लाखोरुपयांचे बिले आणि दुसरीकडे दगवणारे रुग्ण त्यामुळे, मानसिकता ढासळणार नाहीतर काय? आता यामध्ये प्रशासनानेच मध्यस्ती झाले पाहिजे. रुग्णलयांच्या बिलांवर अंकुश ठेवण्यासाठी जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित करणे अपेक्षित आहे. असे कित्तेक सामन्य लोक आहेत ज्यांनी आपल्या जमिनीविकुन, कर्जाने पैसे काढुन, आया बहिणींचे दागिने गहाण ठेऊन रुग्णलयांची बिले भरली आहे. तरी देखील माणुस दगावतो. ही सल कोणाकडे मांडायची? त्यामुळे, प्रत्येकजण या आजारापेक्षा येणाऱ्या भरमसाठ बिलांना वैतागला आहे. प्रत्येक डॉक्टरला एकाच माळीत गोवता येणार नाही. काही डॉक्टर असे आहे. जे सामन्य माणसांच्या बिलांमध्ये सवलती किंवा मोठ्यामनाने माफ करतात. ही माणुसकी जपली तर माणसाला आधार मिळतो. तर दुसरीकडे तुमच्या माणसाचे वाटोळे झाले तरी चालेल आम्हाला काही देणे घेणे नाही. पैसे टाक आणि चालता हो असे म्हणणारे देखील संगमनेरात कमी नाही.
अकोले तालुक्यात डॉ. भांडकोळी यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व अकोले तालुक्याने त्यांच्यासाठी दुवा केली. डॉ. भांडकोळी हे आता एकदम ठणठणीत झाले असून त्यांचे हॉस्पिटल पुन्हा सुरु झाले आहे. डॉक्टर स्वत: कार्यरत झाले आहेत. याची तालुक्यातील जनतेने याची नोंद घ्यावी.