पोलीस ठाण्यात पोलिसाने महिला पोलिसाला मिठी मारली.! आघाव दादांचे आघाव वर्तन.! गुन्हा दाखल.!
सार्वभौम (अकोले/राजूर) :-
पोलीस म्हटलं की आजकाल कोरोनाच्या काळात रस्त्यावर ऊभा असणारा देवदूत डोळ्यासमोर उभा ठाकला जातो. मात्र, या पोलीस वर्दीत देखील काही विकृत व्यक्ती असतात याची प्रचिती अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील राजूर पोलीस ठाण्यात दिसून आली. आपल्या कर्तव्यात व्यस्त असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी लगट करुन तिच्या इच्छेविरुद्ध आघाव चाळे करण्याचा प्रयत्न त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या भाऊसाहेब आघाव याने केले आहे. हा प्रकार दि. ३० मे आणि १ जून २०२१ अशा दोन वेळा रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात घडला आहे. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलीस ठाण्यात आघाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या घटनेनंतर आघाव याची बदली संगमनेर पोलीस ठाण्यात तात्पुरती करण्यात आली होती. आता मात्र त्याच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. या प्रकारामुळे, ऐकीकडे अकोले आणि दुसरीकडे राजूर पोलीस ठाणे पुरते बदनाम झाले आहे. काही झाले तरी दोन्ही पोलीस ठाण्यास सहायक पोलीस निरिक्षक हे कार्यरत आहेत. त्यांचे काम उल्लेखनिय असले तरी दुर्दैवाने त्यांना काही निवडक कर्मचारी गोत्यात आणू लागले आहेत. त्यामुळे, अशा कर्मचाऱ्यांना समज देऊन त्यांच्याकडून योग्यती कामे करुन घेणे जिकरीचे ठरणार आहे. कारण, येथे येणारे कर्मचारी म्हणजे बहुतांशी डिफॉल्ट असतात. त्यामुळे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय असणार.!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ३० मे रोजी एका महिला कर्मचाऱ्यास वायरलेसवर रात्रपाळीची ड्युटी होती. त्याच वेळी भाऊसाहेब आघाव याची ठाणे अंम्मलदार म्हणून ड्युटी होती. या दरम्यान आघाव हा वयरलेस कक्षेत आला व मला म्हणाला की, मॅडम तुम्ही गप्प-गप्प का असतात.? तुम्हाला काही त्रास आहे का? तुम्ही माझ्याशी मैत्री करा, मी तुम्हाला हसायला शिकवतो. असे म्हणताच पीडित महिलेला अंदाज आला की याचा हा आघावपणा दारुच्या नशेतला आहे. तेव्हा तिने त्याला बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्याने पीडित महिला पोलिसाचा हात दाबत म्हणाला की, मी फार मोठा माणूस आहे. त्यानंतर त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली. या प्रकारानंतर महिला कर्मचारी पुरती घाबरुन गेली होती. तरी देखील त्यांनी आघावला मागे लोटत तुम्ही हे काय करत आहात असे म्हणत जोराने लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आघाव हा शरिराने धडधाकट असल्याने तो लोटला गेला नाही. हे सर्व पाहता महिला कर्मचारी फार घाबरली आहे असे पाहताच आघाव थोडा मागे सरकला. त्याने सावध भूमिका घेत उलट पीडित महिलेस धमकी देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला की, येथे झालेला प्रकार जर कोणाला सांगितला तर, मी तुला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे, एकीकडे भिती आणि दुसरीकडे बदनामी हे पाहता आघाव हा देखील दारुच्या नशेत असल्याचे समजून घेत महिला कर्मचाऱ्याने घडल्या प्रकारावर पांघरुन टाकले होते.
दरम्यान, तिसऱ्याच दि. १ जून २०२१ रोजी मला पुन्हा वायरलेस ड्युटी लागली होती. त्यावेळी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सहायक फौजदार निमसे हे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाऊसाहेब आघाव याला ड्युटी नसताना पुन्हा पोलीस ठाण्यात आला. मी तेव्हा माझ्या कामात होते. तो वायरलेस कक्षेत आला आणि म्हणाला की, आज माझा बर्थडे आहे. तू मला शुभेच्छा का दिल्या नाही? त्यावर पीडित महिला पोलीस म्हणाल्या की, वाढदिवस तुमचा आहे. मी का शुभेच्छा देऊ? असे म्हणताच तो बाहेर निघून गेला. त्यानंतर संबंधित महिला वायरलेस रुममध्ये रडत बसल्या होत्या. त्यांच्या रडल्याचा आवाज ऐकून सहायक फौजदार निमसे यांना आला आणि ते वायरलेस कक्षेच्या दरवाजात गेले. त्यांनी महिला पोलीस यांना बाहेर बोलविले. त्यानंतर त्या बाहेर आल्या आणि दोन-तीन दिवसात घडलेला प्रकार निमसे यांना कथन केला. त्यानंतर निमसे यांनी घडल्या प्रकाराबाबत वरिष्ठांना कल्पना द्या असे सांगितले असता त्यांनी दि. २ जून २०२१ रोजी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या कानावर घातला. त्यानंतर साबळे यांनी दोन्ही व्यक्तींना समोरासमोर घेऊन सोक्षमोक्ष लावला. त्यानंतर भाऊसाहेब आघाव याने माफी मागून माझ्याकडून जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही अशी हमी दिली. त्यानंतर आपली बदनामी नको म्हणून पीडित महिलेने गुन्हा दाखल न करता आघाव याची अन्य ठिकाणी बदली करावी अशी विनंती केली. ठरल्या प्रमाणे आघाव याची संगमनेर येथे बदली केली. मात्र, या दरम्यान त्याने उलट पीडित महिलेचे अन्य ठिकाणी संबंध आहे. असे म्हणत सगळीकडे बदनामी केली. त्यामुळे, पीडित महिलेने त्याच्यावर कयदेशीर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घडलेला प्रकार आघाव यांनी कानामागे टाकला असता तर पुढे गुन्ह्याला सामोरे जावे लगले नसते. कालांतराने प्रकरणवर पडदा पडला असता. मात्र, येथे खरोखर त्याचा आघावपणा नडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, गुन्हा, बदली, निलंबन आणि शारिरीर व मानसिक तथा आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. हा तपास थेट संगमनेरच्या सहायक पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे, राजूर पोलीस ठाण्यात हा नव्याने फालतू इतिहास रचला गेला आहे. या प्रकारामुळे, पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली असून हे पोलीस ठाणे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.
अकोले तालुक्यात डॉ. भांडकोळी यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व अकोले तालुक्याने त्यांच्यासाठी दुवा केली. डॉ. भांडकोळी हे आता एकदम ठणठणीत झाले असून त्यांचे हॉस्पिटल पुन्हा सुरु झाले आहे. डॉक्टर स्वत: कार्यरत झाले आहेत. याची तालुक्यातील जनतेने याची नोंद घ्यावी.