तिला अंघोळ करताना पाहणे त्या दोघांना महागात पडले, तिने जाब विचारला तर त्या गर्भवतिच्या पोटात लाथा मारुन ते पळून गेले, संगमनेरात गुन्हा दाखल.!


सार्वभौम (संगमनेर) :- 

                          बाथरूममध्ये महिलेला डोकावुन पाहण्यासाठी आलेल्या तरुणांनी सहा महिन्यांच्या गरोदर महिलेस पोटात लात मारून दुखापत केली. इतकेच काय! महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे महिलेशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरातील साईनगर येथे  7 जून 2021 रोजी घडली. विशेष म्हणजे आरोपी यांनी पिडीत महिलेच्या पतीस लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडीत महिलेने पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रकार कथन केला.  याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अक्षय खरात (रा. साईनगर, ता. संगमनेर) व शिवा सातपुते (रा. साईनगर, ता. संगमनेर) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, साईनगर परिसरात नवरा-बायको असे एक कुटुंब गेली अनेक दिवसांपासून खाजगी मालकीच्या घरात भाड्याने राहतात. त्यांचा पाणीपुरीचा  छोटासा व्यवसाय असल्याने त्यांचा उदरनिर्वाह या पाणीपुरीच्या गाडीवर चालतो.  सहा महिण्यापूर्वी या महिलेला दिवस गेल्याने ती महिला घरीच असायची. दि. 7 जून रोजी रात्री 1 च्या सुमारास पिडीत महिला बाथरूम मध्ये गेली असता कोणीतरी इसम खिडकीतून पाहत असल्याचे लक्षात आले. बाथरूम मधुन बाहेर आले असता लाईटीच्या उजेडात तो इसम गल्लीतील अक्षय खरात असल्याचे दिसून आले. पण बाहेर येताच आरोपी अक्षय याने तेथुन पळ काढला. हा सर्व प्रकार पिडीत महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यांनी ही गोष्ट कोणालाच न सांगता सर्व घटनेवर मौन बाळगले. परंतु त्यानंतर दि. 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता आरोपी अक्षय खरात व शिवा सातपुते हे दोघे या पिडीत महिलेच्या घरी आले. आरोपी अक्षय खरात याने पिडीत महिलेला तु माझे नाव का घेते असे म्हणुन पीडीत महिलेचा हात ओढुन पोटात लात मारली. त्यावेळी जवळ असलेल्या पिडीत महिलेच्या पतीने मधी येऊन सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी यांनी पिडीत महिलेच्या पतीस लथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत महिला सहा महिन्यांची गरोदर असल्याने त्यांच्या पोटात दुखू लागले. पिडीत महिलेला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. गुरुवार दि.10 जून रोजी पिडीत महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पिडीत महिलेने थेट शहर पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रकार सांगुन दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अक्षय खरात (रा. साईनगर, ता. संगमनेर) व शिवा सातपुते (रा. साईनगर, ता. संगमनेर) अशा दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

             दरम्यान, कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर अनेकांना शहाणपण येणे अपेक्षित होते. कारण, अशा प्रकारे एखाद्या तरुणीचा पाठलाग करणे, तिची छेडछाड काढणे, तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे असे प्रकार थांबायला हवे होते. पण, आता हे प्रकार हल्ली पोलीस ठाण्यात देखील घडून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडे जनतेच्या सौरक्षणाची जबाबदारी दिली तेच हल्ली असे कृत्य करीत असल्याने हे प्रमाण अधिक वाढतच आहे.