अकोल्यात बड्या व्यापाऱ्यांच्या नाकावर टिच्चून छोट्या व्यापाऱ्यांचा उद्रेख, बंदचं आवाहन करणारं भोंग बंद पाडलं, अखेर लॉकडाऊन उठलं पण कडक नियम व अटी,
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर तालुक्यानंतर आता अकोले तालुक्यात देखील बडे मियॉं आणि छोटे मियॉं अर्थात धनदांडगे व्यापारी आणि हातावर पोट भरणारे कष्टाळू व्यापारी यांच्यात घमासान पहायला मिळाली. संगमनेरात काल टपरीधारक हे प्रशासनाची व मक्तेदारी गाजविणाऱ्या ठराविक व्यापाऱ्यांच्या विरोधात मैदानात उतरलेले पाहिले. तर आज तेच चित्र अकोले तालुक्यात पहायला मिळाले. प्रशासनाने सायंकाळी पाच नंतर शहर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात निखिल जगताप या समाजसेवकाने नगर पंचायतीचा भोंगा बंद करुन आपला रोष व्यक्त केला तर राजेंद्र नाईकवाडी यांनी देखील छोट्या व्यापाऱ्यांना साथ दिली. त्यानंतर बोलबोल करता तिनशे ते चारशे छोटे व्यापारी तहसिल कार्यालयासमोर जमा झाले. जोरदार घोषणा देत बंदचा निषेध नोंदविण्यात आला. पाच नंतर बंद करु नका या रोखठोक सार्वभौमच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी दाद देत बंदवर अक्षेप घेतला. त्यानंतर तहसिलदार मुकेश कांबळे व मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्याशी बैठक करीत अंतीम निर्णय झाला. की, शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींच्या अधिन राहुन रात्री ८:३० पर्यंत सर्व प्रकारची दुकाने चालु ठेवता येणार आहे. आठ दिवसात जर कोणी नियम पाळताना दिसले नाही, तथा कोविडचा आलेख उंचावत गेला तर पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे. असे कांबळे साहेबांनी सांगत ८:३० पर्यंत सर्वांना दुकाने खुली करण्याची मुभा दिली. तर, डॉ. किरण लहामटे यांनी देखील छोट्या व्यापाऱ्यांना चांगला सपोर्ट केला. या प्रकारामुळे, अकोले तालुक्यातील बडे व्यापारी यांचा हम करे सो कायदा ही मोनोलीपॉली मोडीत निघाली असून छोट्या व्यापाऱ्यांच्या संघटनाची एकजूट पहायला मिळाली. या निर्णयात रोखठोक सार्वभौमने महत्वाची भूमिका बजावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलग दोन महिने कोरोनाने हाहाकार माजविल्यानंतर काल परवा शासनाने जनजीवण पुर्वपदावर केले आहे. यात अनेक छूपे व्यावसायिक धनदांडगे झाले तर डॉक्टरांबाबत न बोललेले बरे.! मात्र, या कठीण काळात मजुरी करुण खाणारा, छोटा व्यावसायिक, हातावर पोट असणारा व्यक्ती, कोविड काळात दवाखाण्याची लाखो रुपये भरुन हतबल झालेला व्यक्ती यांचे बाकी जगणे मुश्किल झाले होते. त्यामुळे, लॉकडाऊन उघडण्याची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहणारे लोक फार खूश झाले होते. आता लॉकडाऊन उघडले खरे, मात्र प्रशासनाने भलतेच नियम व अटी लागू केेले. त्यामुळे, बड्या व्यापाऱ्यांचे सोडा, पण छोट्या व्यापाऱ्यांना बाकी फार त्रास होणार होता. कारण, अनेकांचे धंदे हे पाच नंतर सुरु होतात आणि ८:३० वाजता संपतात. म्हणजे घर बसानेसे पहेले लुटेरे हाजीर, अशी जुनी म्हण आहे. तसेच काहीसे चित्र निर्माण होऊ लागले होते. त्याला छोट्या व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि प्रशासनाने सहकार्य करीत लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, अकोले व संगमनेरात नागरकांनी प्रांताधिकारी, तहसिलदार व मुख्यधिकारी यांचे आभार मानले आहेत. मात्र, बड्या ठराविक व्यापाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा निर्णय झाल्याने अनेकांचा जळफळाट पहायला मिळाला.
दरम्यान, अकोले तालुका जेव्हा जेव्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला तेव्हा अगदी चारपाच डोके एकत्र येत होते. तर, व्यापाऱ्यांचा निर्णय होताना ज्यांचा व्यापार सोडा, दलालीचा धंदा आहे असे लोक त्या प्रक्रियेत सहभागी होत होते तर काही असे व्यापारी ज्यांच्या ज्यांच्या दुकानांना दोनदोन दारे आहेत. त्यामुळे, लॉकडाऊन झाला काय आणि नाही काय, काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे, प्रशासन म्हटले तसे मान्य करुन पाऊस पडेल का? तसे माना डोलायच्या आणि सुरात सुर मिळलायचे. मात्र, आज फार विपक्ष परिस्थिती पहायला मिळाली. सगळ्या छोट्या व्यावसायिकांनी बड्या व्यावसायिकांना पुसलं सुद्धा नाही. उलट त्यांच्या चोमड्यापणाकडे दुर्लक्ष करीत त्यांच्यावर झालेल्या अन्यायावर आवाज उठविला. कारण, काही गृपवर लगेच मेसेज पडले होते. आम्ही पाच नंतर दुकाने बंद करुन प्रशासनाला सहकार्य करत आहोत. अर्थात या कौतुकाला गरजवंत व्यापाऱ्यांनी भिक घातली नाही. होय.! कौतूक नव्हे तर काय? आता ज्यांनी पाच नंतर दुकाने बंद ठेवण्याच निर्णय घेऊन प्रशासनाला सहकार्य करु पाहिले. त्या सर्वांनी उद्या पाच नंतर रोज आपली दुकाने बंद ठेऊन दाखवा. किमान आठवडाभर आणि चालुद्या छोट्या व्यावसायिकांची दुकाने. हे होईल का शक्य? तेव्हा स्वार्थ जागा होईल. त्यामुळे, व्यापारी यातून एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्यापारी छोटा असो वा मोठा, एकमेकांनी एकमेकांचा विचार केला पाहिजे. एकोप्याने निर्णय घेतले पाहिजे. हाच खरा उन्नतिचा मार्ग आहे. असे मत सुज्ञ व्यक्तींनी दिले आहेत.
आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व छोट्या व्यावसायिकांना सहकार्य केेले आहे. त्यांची इच्छा नसताना याच्या भावनांची कदर केली आहे. अर्थात हे नियम व अटी कोणासाठी आहेत, कोणाच्या सुरक्षेसाठी आहेत, त्यातून कोणाचे भले होणार आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, कोरोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करा, हिच विनंती कांबळे साहेबांनी केली आहे. लोक साधे मास्क देखील घालत नाहीत हे सिद्ध करण्यासाठी तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी नितीन नाईकवाडी आणि सागर शिंदे यांच्यासह बाजारपेठेत सर्वे केला. त्यावेळी खरोखर लाजिरवाणे चित्र पहायला मिळाले, अनेकजण विना मास्क घोळक्याने बसले होेते, अनेक फळविक्रेत्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. चारही रिक्षा चालकांनी मास्क लावलेले नव्हते. एकीकडे गोरगरिब जनतेवर कारवाई करु वाटत नाही, तर दुसरीकडे जनता नियम पाळत नाही. अटी घालाव्या तर त्या मान्य होत नाही. अशा प्रकारची गोची प्रशासनाची झाली आहे. तरी देखील त्यांनी छोट्या व्यावसायिकांचा सन्मान केला आहे. त्यासाठी आ. डॉ. किरणजी लहामटे, सार्वभौम संपादक सागर शिंदे, नितिन नाईकवाडी, निखिल जगताप, प्रमोद मंडलिक, राजेंद्र नाईकवाडी, कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे यांच्यासह तिनशे ते चारशे व्यावसायिक उपस्थित होते.
"काय आहेत नियम"
प्रत्येकाने सॅनिटायझर वापरावे
मास्क बंधनकारक असेल
सोशल डिस्टन्स पाळावाच लागेल
रात्री ८:३० नंतर दुकाने बंद करावी
दुकानासमोर प्लॉस्टिक पट्टी लावावी
नियमांचे उल्लंघन तर दुकान सिल.
कोरोना असेपर्यंत दुकान उघडण्यावर बंदी