मी राजीनामा दिलाच नाही.! आमचे प्रपंच उध्वस्त करणार्‍या सभासदांना आम्ही अडविणार.! कामगार युनियनचे आंदोलन,

  


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                     अकोले तालुक्यात अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे राजकारण अधिकच पेटू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी संचालकांनी मंडळाने पत्रकार परिषद घेऊन राजिनामा दिला आहे. त्यामुळे, तालुक्यात एकच खळबळ उडली आहे. तर त्या पाठोपाठ पुन्हा कारखान्याची कर्मचारी युनियन आक्रमक झाली असून निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांचे नाव न घेता त्यांनी दोघांचाही निषेध नोंदविला आहे. त्यामुळे, कारखान्याचे राजकीय वातावरण अधिक चिघळत चालल्याचे दिसते आहे. मात्र, तालुक्याची धनलक्ष्मी चालवायची असेल तर हे वाद त्यास पुरक नसून उलटपक्षी मारक आहे. त्यामुळे, यात राज्यपातळीच्या नेत्यांनी दखल घेऊन यावर तोडगा काढली पाहिजे. असे अनेकांचे मत आहे.

कारखान्याचा गळीप हंमाग मार्गी लागतो कोठे नाहीतर राजकारणाची रणधुमाळी रंगू लागली आहे. कारखान्याचा बॉयलर बंद झाला मात्र, आरोप-प्रत्यारोपाचा बॉयलर फुल पेटला आहे. त्यामुळे,  तालुक्यात राजकीय प्रदुषण फार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी कारखान्यावर संचालकांचे राजिनामे झाले खरे. मात्र, यात किती जणांनी राजिनामे दिले. हा मोठा प्रश्न आहे. त्यात ज्यांनी दिले त्यात एक संचालक मनिषा येवले यांनी सांगितले की, मी राजिमाना दिली नाही. अर्थात ते सहाजिक आहे. कारण, जेव्हा सर्वपक्षिय संचालक मंडळ नेमण्यात आले होते. त्यात स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून ज्येष्ठ नेते दशरथ सावंत साहेब यांच्याकडून येवले यांना नियुक्त करण्यात आले होतेे. त्यामुळे, त्या त्यांच्या मतावर ठाम राहिल्या आहेत.

आता एकीकडे संचालक मंडळ आणि दुसरीकडे कामगार युनियन तर तिसरीकडे दोन सभासद यामुळे, कारखान्यावर राजकीय आखाडा पेटला आहे. कामगारांनी 2002 नंतर पुन्हा कठोर भूमिका घेत आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या आहेत. उद्या येथे प्रशासक नेमला गेला तर कारखाना बंद देखील पडू शकतो. अनेक कामगारांच्या पोटावर पाय पडेल, त्यामुळे, त्या दोन्ही सभासदांचा आम्ही निषेध करीत आहोत. आम्हाला कर्ज काढून बोनस दिला असे म्हटल्याने देखील आमच्या भावना दुखावल्या आहेत. आता कारखाना बंद पडला तर पुन्हा तो उभा राहणार नाही. त्यामुळे, शेतकरी आणि कर्मचार्‍यांचे प्रचंच चालले पाहिजे, म्हणून आम्ही संचालक मंडळाच्या पाठीशी आहोत, त्यांना आम्ही विनंती केली आहे, असे न झाल्यास पुढे आणिबाणीची परिस्थिती निर्माण होईल. तर, देशमुख यांना आम्ही कारखान्यावर पत्रकार परिषद घेण्यासाठी येऊ देणार नाही असे मत कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे.  


त्यांनी त्यांची कामे करावी.!

मी जे मांडले आहे. त्यावर मी आजही ठाम आहे. गायकर पाटील यांनी नाबार्डच्या नियमांचे उल्लंघन करुन कारखान्याला कर्ज आणून ते वाटले आहे. संचालक मंडळाने 2018 पासून नफ्याचा खोटा ताळेबंद दाखवून कारखाना तोट्यात चालविला आहे. आम्ही (बी. जे. देशमुख व दशरथ सावंत) दोन इतके पावरफुल सभासद नाही की, कारखान्याचे कर्ज थांबवू, कामगारांची रोजीरोटी आम्ही नाही तर संचालक मंडळाने बंद पाडली आहे. त्यांना आता चिथवून आमच्यावर सोडण्याचा हा प्रयत्न आहे. कामगारांच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन आपली पाप झाकण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. तसेही कारखान्याच्या कामगारांनी त्यांची कामे करावीत. आम्ही सभासद म्हणजे कारखाण्याचे मालक आहोत. आमचा निषेध करण्याचा अधिकार त्यांना नाही. ज्यांनी निषेध केला आहे. ते सर्व लाभार्थी आहेत. आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. त्यामुळे, त्यांनी तेथे पत्रकार परिषद नाकारली असल्यामुळे आम्ही दुसरीकडे पत्रकार परिषद घेणार आहोत.

- बी. जे. देशमुख (निवृत्त प्रशासक) 


राजीनामा दिला नाही.

बाकी व्यक्तींनी जेव्हा राजीनामे दिले तेव्हा मी त्यांना सांगितले होते. मी, राजीनामा देणार नाही. त्यासाठी माझ्यावर कोणी दबाव टाकलेला नाही. टाकला असता तरी दिला नसता. येणार्‍या काळात देखील मी राजीनामा देणार नाही. कारखाण्यावर जे काही राजकारण चालु आहे. त्यात मला पडायचे नाही.

- मनिषाताई येवले (संचालिका)