बायकोला घेऊन गेल्याने, नवर्याने त्याच्या स्वादुपिंडावर लाथ मारुन मुंडीवर बसला, 14 जणांवर हाफ मर्डरचा गुन्हा, पाच अटक.!
नवर्याकडून त्याची बायको गाडीहून पडली असता तिला मार लागला, मात्र, त्याने तिला दवाखाण्यात नेले नाही. म्हणून तिच्या भावाने तिला संगमनेर येथे रुग्णालयात दाखल केले. याचाच राग येऊन गणेश बाळु भांगरे (रा. शेंडी, पिंपळाची वाडी, ता. अकोले) यांना त्यांचे मेहुणे पंढरीनाथ भवारी (रा. शेलविहीरे, ता. अकोले) यांच्यासह 14 जणांनी बेदम मारहाण केली. यात भांगरे यांच्या पोटात जोरजोराने मारहाण केल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडाला मार लागला आहे. हा हल्ला म्हणजे जीवघेणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे राजूर पोलीस ठाण्यात 6 ओळखीचे व 8 अनोळखी अशा चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून 16 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी गणेश भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, भांगरे यांची बहिन पंढरीनाथ भवारी यांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी भवारी यांच्याकडून त्यांची पत्नी गाडीहून पडली होती. तिला दवाखाण्यात नेणे गरजेचे होते. मात्र, भवारी याने वारंवार टाळाटाळ केली. त्यामुळे, खुद्द गणेश याने बहिनीला संगमनेर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, माझ्या बायकोला तू का घेऊन गेला. त्याहुन या दोघांमध्ये फोनहुन चांगलीच बाचाबाची झाली. परिणामी त्याचे रुपांतर वादात झाले आणि कालांतराने दोन्ही गट एकमेकांना भिडले.
यात नेमकी गणेश भांगरे यांना शेलविहीरे येथे बोलावून पहिल्यांदा मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दि. 8 जून 2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी भांगरे यांच्या घरात घुसून पंढरीनाथ भवारी, जालिंदर भांगरे, महादू भांगरे, राहुल लोखंडे, आकाश दुटे, दत्तू जाधव, यांच्यासह अन्य 7 ते 8 जणांनी बेदम मारहाण केली. गणेश याच्या मुंडीवर, डोक्यावर पाय देऊन पाटात लाथा मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर, भांगरे यांच्या कुटुंबातील आई वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे, त्याच्या कुटुंबात या कारणाने प्रचंड भयाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, गणेश यास गंभीर मार लागल्यामुळे त्यास एसएमबीटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांच्यावर काही कारणास्तव उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे, त्यास तत्काळ मुंबई येथील ससून हॉस्पिटलला हलविण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीच्या स्वादुपिंडाला गंभीर इजा झाल्या आहेत. ज्या कोणी मारहाण केली आहे तो एक जीवघेणा हल्ला आहे. त्यामुळे, पोलिसांनी पंढरीनाथ भवारी, जालिंदर भांगरे, महादू भांगरे, राहुल लोखंडे, आकाश दुटे, दत्तू जाधव, यांच्यासह अन्य 7 ते 8 जणांवर कलम 307 कलमान्वये (जीवघेणा हल्ला) गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, गशेण आणि उपरोक्त विषयातील आरोपी यांच्यात देखील काही आर्थिक घेण्यादेण्याचे वाद आहेत. त्यानुसार गणेश याने देखील अन्य व्यक्तींना मारहाण केली आहे. त्यामुळे, त्याच्यावर देखील राजूर पोलीस ठाण्यात कलम 324 कलमान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी जीवघेणा हल्ला केलेल्यांपैकी पाच जणांना अटक केल्याची माहिती मिळाली असून त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खैरनार साहेब करीत आहेत.