संगमनेरात वर्दीच्या आडून काँग्रेस-राष्ट्रवादीत सुडाचं राजकारण.! नेत्याचा मुलगा रात्रीतून उचलला.! 9 जणांना पोलीस कोठडी.!

  

सार्वभौम (संगमनेर): 

                     संगमनेरमध्ये महाविकास आघाडीमधील मंत्र्यांच्या दबावापोटीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलास पोलिसांनी अटक करून पोलीसांवरील हल्ल्या प्रकरणाला नवे वळण दिले असल्याची टीका आता संगमनेरमध्ये होत आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे  सोशल डिस्टिंग पाळा असे सांगणाऱ्या पोलिसांवर मंगळवार दि.6 मे रोजी 6 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादिवसापासुन आरोपींची शोध मोहीम सुरू होती. तब्बल 9 दिवस उलटुनही अद्याप 13 आरोपी ताब्यात घेतले आहे. यात  4 आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी होऊन जामीन देखील मिळाला आहे. तर आज सकाळी शहर पोलिसांनी कोंम्बींग ऑपरेशन मध्ये 9 आरोपी ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जेव्हा या नऊ आरोपींना पोलीस कोठडीत टाकण्यात आले तेव्हा पोलीस कोठडीत असणाऱ्या राहुल ज्ञानेश्वर काळे, पंकज विजय मोहिते, विशाल हौशिराम खेमनर यांनी मिळून रिजवान महमदखान चौधरी याला शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. तर, भिंतीवर ढकलून दिले. हा प्रकार रविवार दि. १६ मे २०२१ रोजी रात्री ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोटे करीत आहेत.

 रिजवान मोहमंदखान चौधरी (वय 31 रा.अपनानगर), इर्शाद अब्दुल जमीर (वय 37,भारतनगर), अरबाज अजीम बेपारी (वय 20, रा. भारतनगर), जोयेबअली सय्यद शौकत सय्यद (वय 27,रा.दिल्लीनाका), अर्षद जावेद कुरेशी (वय 18,रा. लाखमीपुरा), शफीक इजाज शेख (वय 24, रा.लखमीपुरा), मोहंमद नमुस्ताक फारूक कुरेशी(वय 35,रा.मोगलपुरा), फारूक बुऱ्हाण शेख (वय 45, रा.मोगलपुरा) आशा नऊ जणांना शहर पोलिसांनी बेड्या टोकल्या आहे. तर दिल्लीनाका येथे पोलिसांवर हल्ला होण्याची घटना घडली. आरोपी जेरबंद केले नाही तेच पोलीस निरीक्षक देशमुख मेडिकल कारणे रजेवर गेले. पण, हीच सुट्टी ती ही मेडिकल कारण पोलीस कर्मचाऱ्यांना घ्यायची असेल तर त्यांना सुट्टी मिळविणे जिकरीचे होते. एक दिवस सुट्टी लागत असेल तरी साहेब नाना प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना ऑनड्युटी 24 तास सोडुन त्यांच्या पदरी काही नाही. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत काल सकाळी त्यांनी केलेल्या कोंम्बीग ऑपरेशन सर्वत्र कौतुक होत आहे.

          दरम्यान,  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे प्रचंड मतभेद आहेत. स्थानिक पातळीवर सर्वच निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसच्या विरोधात उघड-उघड पणे भूमिका घेऊन विरोधी आघाडीला सहकार्य करत असतात. गेली अनेक वर्षे सुरू असलेला हा संघर्ष कुरघुडीच्या राजकारणाने सदैव चर्चेत राहिला आहे. आज पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या मुलास थेट मध्यरात्री घरी जाऊन अटक केल्याने ही अटक कोणाच्या दबावामुळे झाली याची चर्चा आता तालुक्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. कारण, पोलिसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील आरोपी शोधण्याची मोहीम पोलीस यंत्रणेकडून वेगाने सुरू होती. मात्र, रमजान ईदचा सण असल्यामुळे काही काळ थांबवलेली ही मोहीम ईद संपताच पोलिसांनी मध्यरात्रीच सुरू केली आणि यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे घरच पोलिसांनी या कोंबिंग ऑपरेशनमध्ये लक्ष केल्याने ही अटक जाणीवपूर्वक झाली का?असा प्रश्न उपस्थित होतो.

 वास्तविक या घटनेतील मूख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सीसीटीव्ही फुटेज मधुन मिळणाऱ्या पुराव्यांवरून हे अटक सत्र सुरू असले तरी पोलिसांनवर असलेला राजकीय दबाव लपुन राहत नाही. कारण काँग्रेसच्या नेत्यांना मुस्लिम समाजास फार दुखावून चालणार नाही. कारण, अल्पसंख्याक समाजाच्या पाठबळावरच काँग्रेसचे शहरातील राजकारण गेले अनेक वर्षे अवलंबून आहेत. ही व्होटबँक काँग्रेसला तोडुनही चालणार नाही, त्यामुळेच मुख्य आरोपींना सौरक्षण देऊन समाजातील आपल्या विरोधकांना हेतुपुरस्सरपणे लक्षवेध करून त्यांना शह देण्याचा प्रयत्नच या अटक सत्रा मागे सुरू झाला की काय याची चर्चा संगमनेरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता ज्यांना अटक होत आहे ते प्रत्यक्ष घटनास्थळी होते की नाही हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. की हे प्रकरणच काळाच्या ओघात लाल फितीत बंद होईल हे येणारा काळच सांगेल.

               दरम्यान,योगायोगाने सद्या राज्याचे गृहमंत्री पद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री पद व पक्षणिरीक्षक पद भूषवताना तालुक्याच्या राजकारणाची त्यांना खडानाखडा माहिती आहे. आता वळसे पाटील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात की मंत्री मंडळातील सहकारी मंत्र्यांच्या प्रेमापोटी आपल्याच पदाधिकाऱ्याच्या मुलास झालेल्या अटकेच्या घटनेकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष करतात हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

- सुशांत पावसे