त्या चार ट्रक रेशन घोटाळ्यात आमदारांचा डावा हात.! राष्ट्रवादी उपाध्यक्ष संतोष परते याच्यासह गोदामपाल अटक! कार्यकर्त्यांचा नांगानाच.!
सार्वभौम (राजूर) :-
अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वस्त धान्य रेशनच्या चार ट्रक राजूर पोलिसांनी पकडल्या होत्या. त्या काळ्या बाजारात चालविल्या होत्या असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. कारण, याप्रकरणी पहिल्यांदा चार तर आता पुन्हा राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष संतोष परते आणि गोदामपाल भाऊसाहेब गंभीरे यास पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना काल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या गाड्या उप-ठेकेदार संतोष परते याच्या नावे असून त्यांची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे, तोच खरा घोटाळ्यातील मास्टर माईंड असल्याचे समोर येऊ लागले आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे परते हा विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या अगदी सखा सोबती आहे. जर कोणी आमदारांच्या नावे काळे धंदे कराल तर याद राखा, साहेबांचे नाव कोणी बदनाम कराल तर आम्ही खपून घेणार नाही. अशी वाल्गना करणार्या परतेने आमदारांच्या प्रतिमेला काळे फासले आहे. अशा प्रतिक्रिया त्याच्याबाबत उमटू लागल्या आहेत. तर जे डॉ. लहामटे पिचड पिता-पुत्र किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आज त्यांचाच जिवस्य कंठस्य कार्यकर्ता किंवा त्यांचा राईट हॅण्ड समजला जाणारा परते ज्या गोरगरिब जनतेने डॉक्टरांना भरभरून मतदान करुन निवडून दिले. त्यांच्या ताटातला घास काळ्या बाजारात लिलावी काढत आहे. ही जनता पुन्हा डॉक्टरांवर विश्वास ठेवेल का? असे प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 12 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोल्हार घोटी रोडवर राजूर स्टेशनच्या समोर पोलिसांनी चारही ट्रक, गहू (525 पोती) व तांदूळ (287 पोती) यांचे कट्टे असा 56 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला होता. त्यात हौशीराम दिनकर देशमुख, अशोक हिरामन देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले), योगेश राजेंद्र धुमाळ (रा. अकोले), साई संदेश धुमाळ, अशा चौघांना आरोपी करण्यात आले होते. त्यांच्याकडून तपासात अनेक संशयित व संदिग्ध बाबी उघड झाल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाला याबाबत सपोनी नरेंद्र साबळे यांनी विचारणा केली होती. की, संबंधित रेशन हे आपले आहे का? असेल तर ते कसे? त्याची नोंद, वितरण कसे, वाहनांचे रजिस्टेशन असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे आली नाही. तर या गाड्या कोणाच्या नावे आहेत? याची चौकशी केली असता त्यात एक गाडी संतोष परते याच्या नावे मिळून आली आहे. मात्र, ती रजिस्टर नाही. त्यामुळे, पोलिसांनी त्यास ताब्यात घेत अटक केली आहे.
color: #2b00fe;"> घटनेचे मुळ काय?
वास्तवत: अन्न पुरवठा विभागाचे जिल्ह्याचे टेंडर हे राष्ट्रवादीचे नेते गाडे यांनी भरलेले आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात पिचडांकडून सत्ता परिवर्तन झाले आणि ते डॉ. लहामटे यांच्याकडे गेली. त्यामुळे, हा कार्यक्रर्ते पोसण्याच्या प्रकारावर खांदेपालट झाली. अकोले तालुक्यात अन्नधान्य पोहच करण्याचे उप टेंडर संतोष परते याने घेतले. अर्थात येथे राजुरमधील एका व्यक्तीचा घडी बसलेली होती. तरी देखील पुन्हा तेथे अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे, परते याच्यावर अनेकांचा रोष होताच. मात्र, गाड्या कोणाच्या लावायच्या आणि कोणाच्या नाही. यात देखील मतभेद होते. त्यामुळे, परतेने आमदारांच्या नावाची टिमकी वाजून काही कमी मिजास गाजविला नाही. त्याचा दिवसेंदिवस अतिरेख झाला आणि या कारवाईने जन्म घेतला. हे टेंडर कायदेशीर असले तरी त्याने प्रशासनाकडे ज्या काही गाड्या रजिस्टर केल्या होत्या. त्यांनी मालाची ने आण करणे अपेक्षित आहे. मात्र, इतक्य मोठ्या धनावर वाकडी नजर फिरली आणि सर्व काही चेंन्ज होत गेले. ज्या गाडीत रेशन चालले होतेे. ती परते याच्या नावे आहे. त्यामुळे, त्याला आरोपी करणे हे सहाजिक आहे. तर लेखापलने त्याची ड्युटी पार पाडलेली नाही. तो देखील या कटात सामिल दिसतो आहे. त्यामुळे, त्याला देखील अटकेला सामोरे जावे लागले आहे.
खरंतर डॉक्टर लहमटे हे प्रामाणिक आमदार आहेत. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे त्यांना खाली पहायची वेळ येत आहे. अकोले तालुक्यात राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांपासून सर्वच पदाधिकार्यांचे नव्याने पुनर्वसन करणे गरजेचे आहे. हे कारभार असाच सुरू राहीला तर उद्या येथे भापजचा आमदार होईल असे अनेकांना वाटते आहे. वास्तवत: डॉ. आमदार अगदी लोकवर्गनीतून झाले, त्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले खारे, परंतु त्यांना तालुक्यावर राज्य करता आले नाही. त्यांना स्वत:ची टिम तयार करता आली नाही. जे रोज त्यांच्या सोबत राहतात तेच त्यांची मागेपुढे कुचेष्ट करतात, हे देखील त्यांना कधी समजून घेतला आले नाही. जाऊद्या-जाऊद्या म्हणून त्यांच्या मागे बुळगी यंत्रणा आणि बोचर्या टिकेचे ते कायम धनी ठरले आहे. त्यामुळे, जेव्हा डॉक्टर कठोर भूमिका घेत सर्व यंत्रणा प्लॅनिंगनी करतील तेव्हा कदाचित ते पुन्हा आमदार आणि मंत्री देखील असतील. अन्यथा त्यांच्या राजकारणाला भाऊसाहेब वाकचौरे यांच्याप्रमाणे खिळ बसले असे अभ्यासकांचे मत आहे. कारण, एकीकडे त्यांचे सहकारी आमदार निलेश लंके यांचे कार्यकर्ते एक हजार कॉट असणारे कोविड सेंटर चालवितात आणि दुसरीकडे डॉ. किरण लहामटे यांचे सच्चे कार्यकर्ते गोरगरिबांच्या पोटात जाणारे हजारो किलो रेशन काळ्या बाजारात विकू पाहतात. हे गणित बारामतीच्या साहेबांपुढे मांडले तर त्यांना किती वाईट वाटेल.! त्यामुळे, तालुक्यात राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज आहे.