..अखेर अगस्ति कारखाण्याच्या एमडी साहेबांचा राजिनामा.! त्यांनी दिले उत्तर.! कारखाना बुडायला नको.! कामगारांना रडू कोसळले.!
सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात एक खळबळ माजविणारी एक बातमी समोर आली आहे. अगस्ति सहकारी साखर कारखाण्याचे कार्यकारी अधिकारी (एम.डी) यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधान आले असून त्यांनी राजिनामा का दिला? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, काही झाले तरी भास्कारराव घुले यांच्या राजिनाम्याने तालुक्याच्या शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यात तिळमात्र शंका नाही. घुले यांना जुन्नर तालुक्यातील विघ्नहर साखर कारखाना येथे 15 वर्षानंतर पुन्हा शेतकर्यांनी बोलविले आहे. त्यामुळे, तेथील चेअरमन यांनी त्यांना विनंती केली आणि घुले यांनी त्यास मान्यता देत अकोले तालुक्याला रामराम केला आहे. घुले यांनी अगस्ति कारखाण्यावर पाच वर्षे काम केले होते. त्यात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यामुळे, त्यांच्या या निर्णयामुळे कामगार वर्गात फार मोठी नाराजी झाली आहे.
खरंतर, भास्करराव घुले यांनी जसे साखर कारखाण्याचे सुत्र हाती घेतले होते. तेव्हापासून त्यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केले होते. कधी राजकीय नेत्यांना त्यांना आश्रय दिला नाही तर कधी कामगारांची मनमानी त्यांनी ऐकूण घेतली नाही. त्यांनी शेतकरी हितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे, ते नेहमी वादात आणि चर्चेत राहिले. मात्र, त्यांच्या कार्यक्षमतेवर राजकीय स्टण्ट वगळता कोणी अक्षेप घेतला नाही. घुले यांचा कार्यकाळ अगदी आर्मी प्रमाणे शिस्तिचा आणि शेतकर्यांंसाठी सलोख्याचे गेल्याचे पहायला मिळाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते येथील राजकारणाला फार वैतागल्याचे दिसत होते. मात्र, तसा त्यांनी दुजोरा दिला नाही.
खरंतर जेव्हा विधानसभेत वैभव पिचड यांना पराभव झाला. तेव्हापासून तालुक्यात नव्या परिवर्तनाचे वारे वाहु लागले होते. नव्या नेत्यांचा जन्म झाला आणि त्यांनी तालुक्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय चालले आहे याचा बोभाटा सुरू केला. त्या पाठोपाठ पिचड यांच्या समर्थकांनी भाजपची पायवाट सोडून पुन्हा राष्ट्रवादी गाठली. त्यामुळे, येथील जे अधिकारी व पदाधिकारी होते त्यांनी भाजपपेक्षा बहुजनांचे पाठबळ फार मोठे होते. त्यामुळे, त्यांच्यात देखील प्रचंड अस्वस्थता जाणवत होती. परिणामी जेव्हा गायकर साहेब राष्ट्रवादीत आले तेव्हा त्यांच्या पाठोपाठ राजकीय नेते, पदाधिकारी व अधिकारी यांनी थेट राष्ट्रवादी गाठली. हे एमडी साहेबांचेच नव्हे तर अनेक अधिकार्यांच्या बाबत असेच पहायला मिळाले आहे.
यापलिकडे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, माजी प्रशासकीय अधिकारी बी.जे देशमुख यांनी कारखाणा ताब्यात घेण्याच्या हलचाली सुरू केल्या होत्या. यात अनेक कागदी घोडे नाचविण्यात आले होते. त्यामुळे, काम सोडून माहिती अधिकारास उत्तरे देणे आणि नको त्या आरोपांना सामोरे जाणे यासाठी एमडी साहेब पुरते वैतागले होते. जोवर राष्ट्रवादीत गायकर साहेब नव्हते तोवर वाटत होते की, ही आजची राष्ट्रवादी कारखाण्याचे वाटोळ करते की काय? मात्र, गायकर साहेबांच्या प्रवेशानंतर पवार साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गायकर साहेब कारखाण्याला सावरतील अशी जनतेला खात्री झाली. त्यामुळे, कारखाण्याची चिंता मिटली होती. मात्र, गायकर साहेबांना देखील घुले यांच्यासारख्या अभ्यासू व शिस्तप्रिय एमडींची गरज भासणार आहे.
मी स्वत:हून चाललो आहे.!
मी स्वत:हुन कारखाना सोडण्याची निर्णय घेतला आहे. मी विघ्नहर कारखाण्यावर यापुर्वी 15 वर्षे काम केले आहे. त्यामुळे, तेथील जनतेने माझ्यावर विशेष प्रेम केले आहे. त्यामुळे, मी स्थानिक शेतकरी व चेअरमन यांच्या अग्रहखातर तेथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अकोले तालुक्याने मला विशेष प्रेम दिले आहे. येथे माझ्यावर कोणी दबाव टाकलेला नाही. किंवा मला कोणी सोडण्यास प्रवृत्त केले नाही. त्यामुळे, कोणी आरोप प्रत्यारोप करील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी कारखाण्यासाठी चांगले काम केले आहे. त्यामुळे, मी माझ्या कामाशी प्रामाणिक होतो. आज मला दुसरीकडे संधी मिळाली त्यामुळे, मी तिकडे जात आहे.
- भास्करराव घुले (एम.डी)