संगमनेरात पोलिसांवर दगडफेक, तिघे जखमी, गाड्यांसह तंबू उखडून फेकले.! 21 जणांवर गुन्हे दाखल.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                         संगमनेर शहराच्या इतिहासाला लाजवेल असा प्रकार  शहरातील दिल्ली नाका येथे घडला आहे. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सींग पाळा असे सांगणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना चक्क जमावाने मारहाण करीत पळू-पळू त्यांच्यावर दगडफेक केली. यात दोघे पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार दि. 06 मे 2021 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री पोलिसांनी आरोपींची शोध मोहिम होती घेतली होती. तर त्यानंतर या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याचे बोलले गेले होते. त्यामुळे, पोलीस नेमकी काय भूमिका घेतात. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. या गुन्ह्यात जुबेर हॉटेलवाला, त्यामधील स्टाफ, निसार खिचडीवाला, जकीर खान, मोहम्मद हनिफ रशीद शेख, अरबाज साजिद शेख व याच्यासह आणखी 15 जणांना आरोपी करण्यात आले आहे.


राज्यात पहिल्यांदा लॉकडाऊन लागले आणि नगर जिल्ह्यात पहिल्यांदा संगमनेरपासून कोरोनाचा प्रारंभ सुरू झाला. ही लाट प्रचंड वेगाने वाढत होती. त्यामुळे, शंभर कोटींच्या लाचखोरीचा आरोप झालेल्या गृहमंत्र्यांनी पोलिसांनी सुचना केल्या की, आता काठीला तेल लावून ठेवा. त्यानंतर पोलिसांनी अगदी जनावराला मारतात तसे माणसांना मारले. हे आपण सोशल मीडियातून पाहिले, तर काहींनी अनुभविले देखील. मात्र, कायद्यापुढे कोणाचे चालेल का? खाकी दिसली की बाकी काही बोलायचे नाही. त्यामुळे, अनेकांना मार खाणं अनिवार्य होते. त्याचा फायदा घेत काही पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यााठी निष्पाप लोकांनी अगदी जनवरासारखे मारले. हा प्रकार पोलीस महासंचालक यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या काठ्यांवर बंदी आणली होती.

या पलिकडे, पोलीस देखील मानसे आहेत. प्रत्येकाला सुट्ट्या आहेत, ठरवून दिलेल्या ड्युट्या आहेत मात्र, पोलिसांना मात्र कोण्याही प्रकारच्या सुट्या नाहीत. कोणत्याही प्रकारची तक्रार न करता त्यांनी रस्त्यावर उभे राहयचे आणि आपली ड्युटी 24 तास चोख बजवायची. ना कोरोनापासून संरक्षण ना विमा, ना सहानुभूती ना कोणाचे कौतुक त्यामुळे ड्युटी सोडून त्यांच्या पदरी काही नाही. अक्षरश: कुटुंबातून बाहेर राहण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. मात्र, करणार काय? वर्दीपेक्षा त्यांच्यासाठी मोठे कोणी नाही. त्यामुळे, कोणी वंदा अथवा कोणी करा निंदा जीव धोक्यात टाकून काम करण्याचा हा अवखळ धंदा.! अशात कोविडशी झुंजताना आपल्याच जनतेशी त्यांना झगडावे लागते हे फार मोठे दुर्दैव आहे. पण, कधी-कधी वाटते जे जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर अन्याय झाला की, त्यांनाच त्यांच्यातलेच लोक न्याय देत नाहीत. ही देखील मोठी खंत आहे.

आता गुरूवार दि. 6 मे रोजी घडलेला प्रकार असा की, काही रमजान महिना असल्यामुळे काही बांधव फळे घेण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी एकाच ठिकाणी जमाव केल्यामुळे, पोलिसांनी त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, यावेळी पोलिसांची उपस्थितांशी बाचाबाची झाली आणि त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी नागरिकांच्या रोषाचा उद्रेख झाला आणि त्यांनी पोलिसांच्या अंगावर चाल केली. त्यानंतर एकाने पोलिसांवर हात उचलला असता गर्दीचा फायदा घेत  अनेकांचे हात त्यांच्यावर पडले. तर काही व्यक्तींनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात प्रशांत केदार, भगिरथ देशमाने व सलमान शेख असे तिघे जखमी झाले आहेत. जमाव अधिक आक्रमक झाल्यामुळे, त्यांनी पोलिना मारहाण केली तर त्यांनी उन्हासाठी मांडलेल्या राहुट्या उध्वस्त केल्या. जमावाच्या हातून काही अनर्थ घडण्यापेक्षा पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने पळ काढला. इतकी ही हतबलता पोलिसांकडून पहायला मिळाली आहे.

खरंतर, दिल्ली नाका ते जोर्वे नाका या परिसरात लॉकडाऊन सुरू असताना शंभर ते दिडशे जणांचे टोळके रोज बसलेले असते. या भागात अवैध गुटखा, कत्तलखाने, दारु विक्री, गोपनिय हॉटेल असे अनेक अवैध व्यवसाय देखील चालतात. अर्थात यांना खतपाणी कोणी घातले आहे? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, एकीकडे साहेबांच्या मतांचे राजकारण आणि दुसरीकडे वर्दीची मलिदे खाऊ भूमिका त्यामुळे, अशा पद्धतीची ही अराजकता संगमनेरात माजत चालली आहे. यावर येणार्‍या काळात देखील अंकूश बसेल असे वाटत नाही. कारण, संगमनेरात जे पोलीस निरीक्षक आहेत ते कर्मचार्‍यांच्या डोक्यावर बसून काम करुन घेतात तर काही कर्मचार्‍यांनी थेट मलिदे गोळा करण्यासाठी सोडले आहे. त्यामुळे, त्यांना कर्मचार्‍यांचे काही घेणे देणे नाही. ते घटनास्थळी केव्हा आलेत याची चौकशी केल्यानंतर सर्व काही उघड होईल.

तर पोलीस उपाधिक्षक यांची देखील दिवसकाडू भूमिका दिसून येत आहे. ते कर्मचार्‍यांप्रती कधी सकारात्मक दिसत नाही अशी टिका त्यांच्यावर देखील होत आहे. कारण, सन 2016 साली जेव्हा नगर शहरात क्लेरा ब्रुस मैदानावर जमाव कर्मचार्‍यांवर धावून गेले. तेव्हा तत्कालिन पोलीस उपाधिक्षक बजरंग बनसोडे यांनी स्वत: तेथे जाऊन जमावाला सामोरे गेले होते. त्यांच्यावर हल्ला झाला, मात्र त्यांनी कर्मचार्‍यांना एकटे सोडले नाही. संगमनेरात उलट त्या कर्मचार्‍यांच्या चौकशा व्हायला बसल्यात. त्यामुळे, सेनापती खंबिर तर सेना भक्कम, येथे मात्र विरोधाभास दिसून येत आहे. येथील वाळु उपसा, मटका, जुगार, दारू, कत्तलखाने, गुटखा, गांजा यांना भर लॉकडाऊनमध्ये देखील कोणाचे अभय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.