अकोल्यात शतकभर कोरोना रुग्ण, या दिवसात ते नगरसेवक, झेडपी, पं.समिती सदस्य, संचालक, कोण्यात बिळात लपले? यांना मदानावेळी लक्षात ठेवा.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज 109 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. म्हणजे शतकभर कोरोना रुग्ण आज मिळून आले आहेत. त्यामुळे, तालुक्याची संख्या ही वाढतीच दिसून येत आहे. तर सुविधांचा आजही आभाव असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. इतकेच काय! तालुक्यातील आरोग्य व महसूल यंत्रणेवर राजकीय व समाज सेवकांचा प्रचंड दवाब देखील दिसून येत आहे. त्यामुळे, तोडक्या मनुष्यबळात प्रशासनाची फार तारांबळ उडत आहे. मात्र, येथे बोलणार कोणाला आणि सांगणार तरी कोणाला? झाकली मुठ सव्वा लाखाची. एकीकडे सिताराम पाटील गायकर साहेब तर दुसरीकडे मधुभाऊ नवले सर यांच्यासारखे दानशुर व्यक्ती वगळता महाविकास आघाडीत कोणाकडून फारसे योगदान दिसून येत नाही. तर दुसरीकडे भाजपकडून रावसाहेब वाकचौरे यांच्यासारखे व्यक्तीमत्व आपला लग्नाचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर दानधर्म करुन कोविड सेंटरमध्ये साजरा करता. त्यामुळे, अशा ठराविक व्यक्तींशिवाय येथे पांढरे कपडे घालुन मिजास गाजविणार्या वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेंवर लोकप्रतिनिधी असणार्या नेत्यांचे योगदान काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
अकोले तालुक्यात 109 कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. त्यात हिवरगाव येथे 68, 55, 29, 21, 45 वर्षीय महिला, 40, 25, 46, 35 वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे 30, 53 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालक, 4 वर्षीची बालिका, 40, 17, 13, 55, 31, 25, 12, 42, 38 वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे 22 वर्षीय तरुणी, 3 वर्षीय बालक, 21 वर्षीय तरुण, 60 वर्षीय पुरुष, 25, 55 वर्षीय महिला, विरगाव येथे येथे 43 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, कळस बु येथे 23 वर्षीय पुरुष, 94, 42, 54, 35 वर्षीय महिला, 58, 48 वर्षीय पुरुष, अकोले आयडीआय बँक येथे 29, 41 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, मनोहरपूर येथे 51 वर्षीय पुरुष, पांजरे येथे 32 वर्षीय पुरुष, लव्हाळी येथे 65, 24 वर्षीय महिला, कळम येथे 10, 22, 38 वर्षीय पुरुष, 35, 65 वर्षीय महिला, करंडी येथे 85, 35 वर्षीय पुरुष, 40, 82, 70 वर्षीय महिला, अडिच वर्षीय, 13 व 6 वर्षीय बालक, बदगी येथे 52 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, शेलद येथे 65, 30, 65, 45, 11 वर्षीय महिला तर 63 वर्षीय पुरुष, शेरणखेल 28 वर्षीय महिला.
मान्हेरे येथे 29, 52 वर्षीय पुरुष, अंबड येथे 16 वर्षीय महिला, पिसेवाडीत 35 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 20 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 45 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, बाभळवंडी येथे 60 वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे 20 वर्षीय महिला, केळुंगण येथे 54 वर्षीय पुरुष, ठाणगाव येथे 35 वर्षीय महिला, बनगरवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, धामनवण येथे 30 वर्षीय पुरुष, मवेशी येथे 27 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 65 वर्षीय महिला, अकोले येथे 26, 18 वर्षीय पुरुष, कळस येथे 15 वर्षीय बालिका, 26 वर्षीय महिला, गुरवझाप 46, 28 वर्षीय महिला, अगस्ती स्कुल अकोले रोड शेजारी 60 वर्षीय महिला, कोल्हार घोटी रोड बाजारतळ येथे 42 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 45 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष. कोळी कोतुळ 71, 34 वर्षीय महिला, 74 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय बालिका, 45 वर्षीय पुरूष, राजूर येथे 29 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 1 वर्षीची बालिका, चिंचावणे येथे 22 व 27 वर्षीय पुरुष, नाचनठाव येथे 50 वर्षीय महिला, अकोले येथे 65 वर्षीय पुरूष, केळी ओतुर 27, 45 वर्षीय पुरुष, धामनगाव येथे 65 वर्षीय पुरुष, अकोले येथे 25, 36 वर्षीय महिला, मेहेंदुरी येथे 29 वर्षीय पुरुष,
अकोले तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. प्रशासन अक्षरश: हतबल झाले असून त्यांच्याकडे जे आहे त्यावर समाधान मानावे लागत आहे. आजही तालुक्यात रेमडिसीवीर अक्षरश: पहायला देखील मिळत नाही. तर हेच रेमडिसीवीर अकोल्यात 18 ते 20 हजार रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे, येथे एकीकडे सेवाभावी लोक तन, मन धनाने स्वत:ला समाजसेवेत झोकून देत आहेत तर दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली काही सामाजिक बुरखे परिधान करुन सामान्य मानसांना लुटत आहेत. त्यामुळे, या काळात प्रत्येकाने मानुसकी आणि संवेदनशिलता अंगी बाळगली पाहिजे.
खरंतर, जे स्वत:ला समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी म्हणून घेतात त्यातील किती लोक आज कोरोनाच्या काळात मदत करीत आहेत? याचे मुल्यांकन समाजातील नागरिकांनी केले पाहिजे. येणार्या काळात निवडणुका आहे त्यामुळे, अचाकन काही डोमकावळे मत मागण्यासाठी आपल्या दारात दिसतील. त्यावेळी, त्यांना पहिला प्रश्न विचारा की? तुम्ही आमच्यासाठी, गावासाठी काय केले? जर त्याला उत्तर देता आले नाही. तर त्या भामट्याला मतदान सोडा.! पाणी देखील पाजू नका. आज कोणता जिल्हा परिषद सदस्य तुमाच्यासाठी धावतो आहे, कोणता नगरसेवक हाकेला साद देतोय, गरजुंना मदत करतोय, कोणता पंचायत समिती सदस्य तुमच्या गणात कार्यरात आहे. हे तुम्हाला माहित आहे खरंतर अक्षरश: बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी जनतेच्या पडत्या काळात मैदानात उतरुन काम करताना दिसत आहे. ते जर कधी तुमच्या दारात मत मागण्यासाठी आले तर त्यांना कधी ढावालु नका. कारण, स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्यांनी तुमचा जीव वाचविला आहे.
आज लोक प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत. कोणीही उठसुट अधिकार्यांना फोन लावतो आणि त्यांना जाब विचारतो. मात्र, आजही तालुक्यातील महसूल, पोलीस, आरोग्य विभाग हे रात्री 12 ते 1 वाजता झोपतात. कोविड सेंटरवर कोणी काम करायला तयार नाही, काहींनी जॉब सोडले तर काही कर्मचारी अक्षरश: रडत-खडत पण सेवा देत आहेत. तरी देखील त्यांच्या कार्यात जरा देखील कुचराई नाही. त्यामुळे, त्यांच्याशी बोलताना आणि त्यांच्यासोबत वागताना स्वत:च्या जिभेला लागम घाला. अक्षरश: तारेवरची कसरत हे लोक करीत आहेत. आपण, दिवसातून एकदा तरी एखाद्या संशयित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर पंन्नास वेळा मानात विचार येतात, मला कोरोना होतो की काय? घरी जाऊन वाफ घे, गोळ्या घे, गरम पाणी पी असे नाना प्रयोग करतो. मात्र, हे लोक रोज त्या कोविड बाधितांच्या संपर्कात आहेत. त्यांना काही जीव नाही का? त्यांना कोरोना होत नाही का? त्यांच्या 24 तासात 17 ते 19 तास ड्युट्या लागत आहे. त्यामुळे, त्यांचा देखील जीव जाणला पाहिजे असे आमचे प्रामाणिक मत आहे.
दरम्यानच्या काळात तालुक्यातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपला होता तेव्हा तालुक्यातील तरुणांनी जिल्हाबाहेर पायपिट केली आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले, त्यानंतर आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटर सुगाव येथे मोफत जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम महाविकास आघाडीतील निवडक पदाधिकार्यांनी केले आहे. तर दुर्दैवाने येथे राष्ट्रावादीचे आमदार असून अगदी बोटावर मोजण्याईतके पदाधिकारी त्यात सामिल आहे. बाकी बड्याबड्या पदांना चिकटून त्यांचे तुटपुंजे सहकार्य आणि जोर बाकी आमदारांच्या वरचा दिसून येतो. तर आमदारांच्या प्रेमापोटी विखे समर्थक आणि काँग्रेस व शिवसेना देखील यात सक्रीय दिसून येत आहे. या पलिकडे यात दैनिक सार्वभौमने देखील खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक उत्तम समाजसेवा म्हणून बबलु धुमाळ आणि बाबासाहेब नाईकवाडी यांनी एक छानसा उपक्रम राबविला आहे. ज्या कुटुंबाला त्यांचे मृत व्यक्ती जाळण्यास भिती वाटत असेल, त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल अशा मृतदेहांना जाळण्याची जबाबदारी या तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे, एकंदर एकीकडे तालुक्यात श्रेय्यवादाचे राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे समाजभान राखून तरुण पुढे येत आहेत. याचे देखील सुख आहे.