थोरला लेक कोविड सेंटरमध्ये बापाला सोडून पळाला, पुन्हा आलाच नाही.! धाकला म्हणे मी मुंबईत मला शक्य नाही.! आज 106 रुग्ण बाधित
खरंतर कोविडमुळे पुरोगामी अकोले तालुक्याची संवेदनशीलता मरत चालली आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे. कारण, एकीकडे डॉक्टर लोक भरमसाट लुटत असल्याचे आरोप होत आहे. तर प्रशासन जीव काढून लोकांना नियम पाळ्याची विनंती करीत आहेे. तरी देखील जनता ऐकण्यास तयार नाही. आता तर या पलिकडे तालुक्यात काही गोष्टी कानावर पडू लागल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर खरोखर तालुक्यात असे देखील कुपुत्र राहतात याची शास्वती झाली आहे. कारण, दोन सुशिक्षित तरुणांनी आपल्या जन्मदात्या मुक्या बापाला ते ही भान हरपलेले असताना कोविड सेंटरमध्ये सोडून दिले. यावेळी एक पळुन गेला तर एक फोनवर म्हणाला तुम्ही अॅडमिट का करुन घेतले? त्यानंतर चक्क कोविड सेंटरवर स्वच्छतेचे काम करणार्या जमला या व्यक्तीने त्यांना जेवण चारले तर कोणतीही तक्रार न करता या आजोबाची शि-सू काढली. त्यानंतर अती नाजूक परिस्थिती झाल्याने प्रशासनाने या आजोबांच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि त्यांना त्यांच्या ताब्यात दिले. या दरम्यान, मुंबईहून फोनवर बोलणारा मुलगा त्यांच्या हकेला धवला नाही ना त्याचा दुसरा मुलगा. त्यामुळे, प्रशासन पुरते हतबल झाले होते. हा प्रसंग खरोखर तालुक्याच्या मातीला लाजवेल असा होता.
त्याचे झाले असे की, कोतुळच्या कोविड सेंटरवर गेल्या काही दिवसांपुर्वी एका आजोबांना आणण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे त्यांना खानापूर कोविड सेंटरला रेफर करण्यात आले होते. दुर्दैवाने त्यांना येथे देखील बरे वाटले नाही. त्यांच्या सोबत जो त्यांचा मुलगा होता. तो देखील वैतागला होता. पण बाप हा बाप असतो हे त्याला कोणी सांगावं.! खरंतर त्या आजोबांना चालणे शक्य नव्हते, त्यांना बोलता येत नव्हते स्कोअर आणि सॅच्युरेशन जास्त असल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर होत चालली होती. खानापूर येथे आल्यानंतर त्यांचा एक मुलगा तेथे आला होता. त्याने हे हाल पाहिले आणि डॉक्टरांना म्हणाला साहेब.! मी आत्ता आलो पाच मिनिटात आणि तो जसा पसार झाला तेव्हापासून आजोबा वैतागून गेले, डॉक्टर देखील वाटत पाहून कंटाळले तरी अद्याप त्या बहाद्दराचा तपास नाही. त्यामुळे, आरोग्य प्रशासन करणार तरी काय? त्यांनी कसेबसे सहा ते आठ दिवस काढले. मात्र, नंतर त्यांना देखील त्रास होऊ लागला.
दरम्यान, एक बेवारस म्हणून त्यांची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी, तेथील आरोग्य सेविका आणि सफाई कर्मचारी जमला यांनी त्या आजोबांची पालक म्हणून काळजी घेतली. त्यांची शुश्रृषा केली. म्हणजे एखादा पाल्याप्रमाणे आजोबांना यांनी संभाळले, त्यांना जेवण भरविण्यापासून ते त्यांची शी केलेले कपडे धुण्यापर्यंत आरोग्य विभाग कोठे कमी पडला नाही. मात्र, तरी देखील आजोबांची प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांचा पोटचा मुलगा आत्ता येतो म्हणून सांगून गेला आणि पुन्हा आलाच नाही. मग यांना पुढील उपचारासाठी न्यायचे कोणी? असा प्रश्न पडला. त्यावेळी डॉक्टरांनी रुग्णाच्या दुसर्या मुलास सांगितले की, तुमच्या वडिलांना पुढे हलवावे लागले. मात्र , त्याने सांगितले, मी मुंबईत आहे. मला येणं शक्य नाही. आमचे पेशन्ट कोतुळला होते तुम्ही इकडे कशाला आणले? त्यानंतर भलताच काथ्याकुट सुरू केला. तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून येण्यास नकार दर्शविला, प्रशासन जी काही कारवाई ती त्यांनी करावी असे म्हणत फोन ठेऊन दिला. त्यानंतर प्रशासनाने त्यांचे नातेवाईक शोधले आणि बाबांना त्यांच्या स्वाधीन केले. आता तुम्हीच सांगा. कसे पुत्र जन्मा येणार्याची आपेक्षा ठेवावी? खरंच या तरुणांना काळीज आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, काही झाले तरी डॉक्टर व आरोग्यसेवक यांच्या कर्तुत्वाला दाद दिली पाहिजे. एवढे झाल्यानंतर या व्यक्तीने काल अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अकोले तालुक्यात आज 106 रुग्णांची भर पडली आहे. त्यात कोतुळ येथे 33 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 57 वर्षीय महिला, गणोरे येथे 65 वर्षीय महिला, शनिंमंदीर अकोले येथे 52 वर्षीय पुरुष, मान्हेरे येथे 49 वर्षीय पुरुष, मेंंहेदुरी येथे 30 वर्षीय महिला, आंबड येथे 65 वर्षीय महिला, वाघापूर येथे 28 वर्षीय पुरुष, विठे येथे 51 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला, रेडे येथे 59 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनिवास येथे 42 वर्षीय महिला, औरंगपूर येथे 37 वर्षीय पुरुष, कळंब येथे 43 वर्षीय पुरुष, शेलद येथे 39 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 31 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, कळस बु येथे 50 वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे 35 वर्षीय पुरुष, धामनगाव पाठ येथे 35 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 63 वर्षीय महिला, गणोरे येथे 38 वर्षीय पुरुष, हिवरगाव येथे 40 वर्षीय पुरुष.
राजूर येथे 52 वर्षीय पुरुष, माळेगाव येथे 55 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, आंभोळ येथे 11, 29, 59 महिला तर 36 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 57 वर्षीय महिला, अकोले येथे 60 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 25 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 71 वर्षीय पुरुष तर 38 वर्षीय महिला, सिडफार्म येथे 36 वर्षीय महिला, कळस बु येथे 38 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 42 वर्षीय महिला, कारखाना येथे 21, 56 वर्षीय पुरुष व 23 आणि 48 वर्षीय महिला, महात्मा फुले चौक अकोेले येथे 32 वर्षींय महिला, शेकेइवाडीत येथे 59 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 33, 24, 59 व 33 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय बालक, कळस येथे 14 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 38 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथे 36 वर्षीय पुरुष, हिवरगाव येथे 20, 40 वर्षीय पुरुष, सुगाव येथे 62 वर्षीय पुरुष, अकोले 50 वर्षीय महिला, समशेरपूर येथे 26 व 28 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 48 वर्षीय पुरुष.
पैठण येथे 79 वर्षीय पुरुष, धामनगाव पाट येथे 26 वर्षीय पुरुष, बदगी येथे 54 वर्षीय पुरुष, कळी कोतुळ येथे 20 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 11, 55, 35 वर्षीय महिला, मोग्रस 45, 19 वर्षीय महिला व 29 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 38 वर्षीय पुरुष,लहित येथे 57 वर्षीय पुरुष, शिळवंडी येथे 54 वर्षीय पुरुष, धामनगाव पाठ येथे 36 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 13 वर्षीय बालिका, पैठण येथे 16 व 50 वर्षीय महिला, भाळोवाडी येथे 32 वर्षीय पुरुष, सुगाव 4 वर्षीय बालिका, कोतुळ येथे 35, 38 वर्षीय पुरुष, करंडी येथे 39 वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे 46 वर्षीय महिला, नवलेवाडीत 34 वर्षीय महिला, इंदोरी येथे 73 वर्षीय पुरुष, अ्रकोले येथे 1 वर्षाचे बालक, शेणीत येथे 45 वर्षीय पुरुष, निळवंडे येथे 28 वर्षीय महिला, टाकळी येथे 37 वर्षीय पुरुष, धामनगाव येथे 24 वर्षीय तरुणी, चितळवेडे येथे 72 वर्षीय महिला, विरगाव येथे 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, अकोलेत 20 वर्षीय तरुण, 45, 38 वर्षीय महिला, गर्दनी येथे 20 वर्षीय पुरुष, इंदोरीत 63, 55, 3 , 35 असे ती पुरुष जात, विठे येथे 32 वर्षीय पुरुष, आंबड येथे 29 वर्षीय पुरुष व बहिरवाडी येथे 60 वर्षीय पुरुष,