राष्ट्रवादीचा झेडा अटकेपार फडकविणारा खलाशी संदिप वर्पे, एक शुन्यातून सुरू झालेला ऐतिहासिक प्रवास.!
कोपरगाव (विशेष) :-
गेल्या कित्तेक दशकांपासून एक म्हण रुढ होत आली आहे. की, बाप तैसा बेटा, परंतु त्या म्हणीचा प्रत्यय आजकाल होताना दिसत नाही. बाप हुशार असेेल तर मुलं अगदी ढ जन्माला येतात, एव्हाणा बापाच्या जिवावर उड्या मारतात किंवा त्यांच्यात संस्काराचा आभाव दिसतो. याला एक तरुण मात्र अपवाद ठरला आहे. तो व्यक्ती म्हणजे संदिप वर्पे होय. आई वडिल दोघे प्राचार्य असले तरी स्वत:ची एक नवी ओळख त्यांनी समाजात निर्माण केली आहे. अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून उदयाला येऊ पाहणारा तरुण राजकारणात एका विशिष्ट उंचीवर जातो, ते देखील घरात कोणताही राजकीय वारसा नसताना हे म्हणजे आजकाल फार अशक्य गोष्ट आहे. त्यांच्या स्वभावाची आणि प्रामाणिकतेची इतकी ख्याती आहे की, खुद्द शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा या तरुणाच्या खांद्यावर सहज हात टाकतात, अजित दादांसारखा व्यक्ती त्यांच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणतात तर जयंत पाटील, गृहमंत्री दिलीपराव वळसेपाटील यांच्या विश्वासातील हा एक ध्रुवताराच आहे. राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन अगदी खलाशाप्रमाणे तो अटकेपार फडकविण्याचे व्रत या तरुणाने घेतले आहे. त्याचा बाणा नक्कीच यशस्वि होईल यात तिळमात्र शंका नाही. कारण, असे म्हणतात की, जोवर माणूस रणांगण सोडत नाही, तोवर तो कधीच पराभूत होत नाही. अगदी तसाच हा तरुण आहे. जोवर पवार साहेबांच्या स्वप्नातला पक्ष उभा राहून यश मिळवत नाही, तोवर शिर कलम झाले तरी बेहत्तर, तोवर हा तरुण रणांगण सोडत नाही. कोणताही मोह नसलेला हा संयमी नेता, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वभौम त्यांना मानाचा सलाम करीत आहे.
वडील व आई दोघेही के.जे. सोमय्या कॉलेज कोपरगाव येथे प्राचार्य असल्याने विचारांचा वारसा होताच. या सर्वातून कोपरगावची जडण-घडण झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे विद्यार्थी संघटना एन.एस.यु.आय ते जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदापर्यंत अनेक चढ-उतार त्यांना पाहायला मिळाले. पण, राज्यातील कुठल्या जिल्ह्यात असे तरुणांचे संघटन दिसणार नाही. असे संघटन संदिप वर्पे यांनी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष असताना उभे केले होते.
खरंतर त्यांचे घर गांधी विचारधारेचे असल्याने लहानपणापासूनच संदिप यांना काँग्रेस विचारांचे बाळकडू मिळाले. पहिल्या पासुनच घरात सामाजिक कामाचा वसा असल्याने बालपणीच त्यांच्या आंगी नेतृत्वगुणांचे अंकुर रुजले गेले होते. मग काय! मराठी शाळातुन एका वक्तृत्ववान शैलीच्या जडण घडणीला सुरवात झाली. पहिल्यापासुन नेतृत्वगुण अंगी असणारा हा बालक मुळतः अनेकांच्या नजरेत भरत होता. लहानपणापासुनच वक्तृत्व कौशल्याची आवड असल्याने राजकीय सभेला किंवा आंदोलनाला जनसमूह आला की, गर्दीमध्ये घुसून ते संपुर्ण ऐकत होते. कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांचा कुठला प्रश्न असला की तो एकटा सोडवण्याचा प्रयत्न करत होते. 1993-94 साली अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस एन.एस.यु.आय विद्यार्थ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेऊन काम करत होती. 1995 साली काँग्रेस एन.एस.यु.आय या विद्यार्थी संघटनेत ते सक्रीय झाले आणि जोमाने काम करण्यास सुरवात केली. याच कामाची पावती मिळत ते 1996 साली कोपरगाव एन.एस.यु.आय विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष झाले. या विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून कोपरगावात त्यांनी लोकाभिमुख काम करण्यास सुरुवात केली. एकीकडे संदिप यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आणि शरद पवार साहेबांनी 1999 साली काँग्रेसच्या मतभेदांमुळे काँग्रेसमधुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केला. खरंतर पवार साहेबांना वर्पे यांनी लहान पणापासूनच आयडॉल मानलेल होतं. त्यामुळे आपण देखील पवार साहेबांबरोबर जाऊन पक्ष संघटनेत खारीचा वाटा उचलायला हवा असे त्यांना मनोमन वाटु लागले होते. त्यानंतर घड्याळाचे काटे चळवळीच्या दृष्टीने अधिक गतिमान वेगाने फिरु लागले.
त्या नव्या जोमाने काम सुरू झाले असता सन 1999 साली कोपरगाव शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पद वर्पे यांनी स्वीकारले. राजकीय क्षेत्रात पाहिले पाऊल पडले आणि तेही शहराध्यक्ष पद घेऊन, त्यामुळे ते पक्षसंघटनेत हाडाचा कार्यकर्ता बनुन तळमळीने काम करू लागलेे. पक्षाची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिक पणे त्यांनी सुरू केले. कोपरगाव तालुक्यात युवक संघटनेची मोठं बांधली. याकालावधीत बिपीन दादा कोल्हे यांच्या सोबत त्यांची ओळख झाली. वक्तृत्व कौशल्य असल्याने कोपरगाव तालुक्यातील जनतेचे प्रश्न भाषणांमधुन प्रशासनाच्या कानात गुंजू लागले. या कामाचा ठसा थेट जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंत पोहचाला आणि त्यांनी 2006 साली अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद बहाल केले. यामध्ये बिपीन दादा कोल्हे व ना.प्राजक्त दादा तनपुरे यांची मोठी भुमिका होती. आता जिल्ह्याचे युवक अध्यक्ष पद मिळाले त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. परंतु, कामाचा वेग त्यापेक्षाही वाढला आहे. त्यामुळे, राज्यातील कुठल्या जिल्ह्यात असे तरुणांचे संघटन दिसणार नाही. असे संघटन संदिप वर्पे यांनी अहमदनगर जिल्ह्यात उभे केले आहे. एकेकाळी लाल सलाम आणि काँग्रेसच्या विचारांचा असणारा हा नगर जिल्हा, आता राष्ट्रवादीच्या विचारांचा बनला आहे. यात वर्पे यांचे फार मोठा वाटा आहे.
नंतर 2010 मध्ये संदिप वर्पे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. पण, प्रत्येकाच्या आयुष्यात काही बाके प्रसंग येत असतात तसेच वर्पे यांच्या देखील आले. स्थानिक पक्षाचे नेतृत्व व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी वर्पे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. राजकीय स्वार्थापोटी बहुतेकदा या कंड्या पिकवल्या. पण, त्या सर्व निष्फळ ठरल्या. संदिप वर्पे यांनी जिल्हा युवकअध्यक्ष असताना असे काम केले होते की, वरिष्ठांना दखल घेऊन वर्पे यांना पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्ष पद बहाल करावे लागले. त्यानंतर 2014 साली मोदी लाट आली. ज्यांनी वर्पे यांच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाला विरोध केला होता. तेच नेते राजकीय स्वार्थापोटी पक्षाला सोडून गेले. त्यामुळे पवार साहेबांनी देखील वर्पे यांच्यावर विश्वास दाखवून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी केले. कामात कुठला ही कंटाळा न करता पक्ष जी जबाबदारी देईल तेथे काम केले आणि संधीचे सोने केले. त्यामुळे संदिप वर्पे याना पक्षाने अजुन एक जबाबदारी दिली. 2015 मध्ये खा.सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष असताना संदिप वर्पे यांना प्रदेश सचिवपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सोलापूरचे प्रभारी असताना निवडणुक निरीक्षक पदाची जबाबदारी मिळाली. पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्षपद व शिर्डी लोकसभा मतदार संघ व त्या अंतर्गत असलेले विधानसभा मतदारसंघ याची जबाबदारी मिळाली. ही जबाबदारी मिळत असताना विधानसभेला पवार साहेबांचे अनेक निकटवर्तीय जिल्ह्यातील प्रमुख नेते भाजपमध्ये गेले. त्यामुळे हा संपूर्ण जिल्हा भाजपमय होतो की काय? अशी भिती सर्वांच्या मनात घोळत होती. त्या पडत्या काळात देखील संदिप वर्पे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघाची जबाबदारी घेतली.
सन 2019 मध्ये पिचडांसारख्या मातब्बर नेत्याचा पराभव कोण करू शकतो आशा उमेदवारीची चाचपणी सुरू केली. त्याहूून अवघड म्हणजे एकास-एक उमेदवार देणे हे देखील त्यांनी शक्य करून दाखवले. आज तागायत अहमदनगर जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणुन राष्ट्रवादीचे नाव घेतले जाते. यामध्ये संदिप वर्पे यांचा मोलाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे, ते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विश्वासु तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील शिलेदार आहेत. राज्यातील व जिल्ह्यातील राष्ट्रवादीची येवढी मोठी जबाबदारी असताना देखील त्यांनी कोपरगाव तालुक्यात राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या धाग्याने गुंफलेली नाती ही नेहमी संदिप वर्पे यांच्या पाठीमागे पहाडासारखी उभी राहिलीले दिसते आहे. पण, सुरवातीला बिपीन दादा कोल्हे यांच्या सोबत असलेले संदिप वर्पे हे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या दिशेला जाऊन आपले राजकीय मार्ग वेगळे केले. आता संदिप नावाचा निनाद कोपरगावमध्ये चारही दिशांनी गुंजत आहे. कोपरगाव शहरात देखील ते नगरसेवक आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना जनतेचीसेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. जनतेला विश्वसात घेऊन त्यांनी नगरपालिकेत विकासात्मक काम केली. अभ्यासु व पाणीप्रश्नाचा जाणकार अशी त्यांची कोपरगाव शहरात ओळख आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता व वेगवान निर्णय क्षमता असल्याने किचकट काम देखील ते झटकपट सुरळीत करतात. आज तागायत कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा असलेले संदिप वर्पे आमदार आशुतोष दादा काळे यांच्यासोबत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करताना दिसतात. मात्र, आपली नाळ जनतेशी कशी जोडली जाईल व विकास कामे कशी केली जातील याकडे त्यांनी नेहमी लक्ष केंद्रित केले.
राजकारणात नेहमी चढ उतार येत असतात. मात्र, राष्ट्रवादी विचारांनी कार्यकर्त्यांशी नाळ जोडली असल्याने पुष्कळ बाके प्रसंग येऊनही कार्यकर्त्यांचे व सहकार्यांचे मोहळ कधी दुरावले नाही. सत्तारूढ पक्षात असो किंवा नसो. पण, राष्ट्रवादीची विचारधारा मी कधी सोडणार नाही. यावर ते ठाम आहेत. राजकीय पिंड राष्ट्रवादीचा आणि तोच पुढे अविरत चालूच ठेवणार हेच तत्व त्यांनी अंगिकारले आहे. संदिप वर्पे यांचे पाहिलं पाऊल एन. एस.यु.आय. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात पडलं आणि आज राष्ट्रवादीच्या विचारधारेवर ते अविरतपणे सुरू आहे. राजकीय बद्दल, होतील जातील मात्र, संदिप नावाचं डबकं कधीच झालं नाही आणि होणार देखील नाही. कारण, या व्यक्तिमत्वाला थांबायचे माहीत नाही तर त्यांना सामाजिक प्रवाहानुसार वाहायचे माहीत आहे. तो नेहमी असाच वाहत राहो. हीच सदिच्छा.! प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणार्या या नितळ, निर्मळ व प्रांजळ व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो.!
- सुशांत पावसे