अकोल्यात 114 रुग्ण तर तीन मयत.! तालुक्यातलं सगळं संपलं, मढं गुंढाळायला माणूस नाही.! फक्त उरलाय आक्रोष.!
अकोले तालुक्यात आज दि. 26 एप्रिल रोजी 114 रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. तर आज एकाच दिवशी तीन जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. तालुक्यात अगदी भयानक परिस्थिती असून कोठेही ऑक्सिजन बेड मिळत नाही. डॉ. भांडकोळी, माऊली आणि डॉ. चासकर यांच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनाचा तुटवडा असून ते आहे त्या रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अवघ्या काही टाक्या घेऊन डॉक्टर लोक मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे, नागरिकांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. एक काळ असा होता की, संगमनेरात रुग्णांचा हाहाकार सुरू होता तेव्हा अकोल्यात रुग्ण नव्हते. आज संगमनेर कमी होत चालले असून अकोल्याचा आकडा आभाळाला जाऊन टेकला आहे. त्यामुळे, जोवर तालुक्यातील जनतेला शहानपण येत नाही. तोवर कोरोनाची संख्या घटत नाही. हे देखील तितकेच खरे आहे. आज तालुक्यात इतकी बिकट अवस्था आहे की, दोन लोक मयत झाल्यानंतर त्यांचे शव कागदात गुंडाळण्यासाठी कोणी व्यक्ती नव्हता, अखेर शंकर नेहे या सामाजसेवकाने स्वत: शव गुंडाळून गाडीत घालुन सरणावर नेले आणि पुढील विधी केला. इतका तालुका पोरका झाला आहे. निश:ब्द
खरंतर अकोले तालुक्यात प्रत्येक पीएससी अंतर्गत कोविड सेंटर उभे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, केवळ बेड ही सुविधा पुरी नसून त्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे, तालुक्यातील नेत्यांनी थोडे मनावर घेऊन स्वत: पायपीट केली पाहिजे, अन्यथा तालुक्यात रोज दोन ते तीन लोक मयत पावत आहेत. हे प्रमाण वाढत राहिले तर जनतेच्या फार मोठ्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल. ऑक्सिजन हा एक भाग असला तरी रेमडिसीवीर अद्याप तालुक्यात मिळत नाहीत. फक्त ऑक्सिजन हा अत्यंत गरजेचा असल्यामुळे रेमडिसीवीर हे मागे पडले आहे. मात्र, हे एक उपलब्ध होण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये मोजावे लागत आहे. ही निखळून पडलेली व्यवस्था आणि सरकारकडून न मिळणारा पुरवठा यास कोण जबाबदार आहे? असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत.
आज अकोले तालुक्यात 114 पैकी, देवठाण येथे 31, 60 वर्षीय पुरुष, गणोरे येथे 26 वर्षीय तरुणी, 28 वर्षीय तरुण, 65 वर्षीय महिला, हिवरगाव येथे 37 वर्षीय महिला, म्हळदेवी येथे 27 वर्षीय पुरुष, अगस्ति थेअटर परिसरात 41 वर्षीय महिला, एरिकेशन कॉलनी भंडारदरा येथे 69 वर्षीय महिला, वाशेरे येथे 35 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 22 वर्षीय तरुणी, अकोले रोड मयुर क्लॉथ सेंटर परिसरात येथे 33 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 28 वर्षीय तरुणी, इंदोरी येथे 44 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, अकोले येथे 56 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 35, 26 वर्षीय महिला, धामनगाव आवारी येथे 31 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 21 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, बोरी कोतुळ येथे 28 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 26 वर्षीय महिला, कोतुळ 28 वर्षीय तरुण, खडकी येथे 42 वर्षीय पुरुष, राजूर येथे 34 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालिका, 5 वर्षीय बालक.
मवेशी येथे 30 वर्षीय महिला, धामनगाव येथे 26 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 80 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, मान्हेरे येथे 44 वर्षीय पुरुष, खामगाव येथे 50 वर्षीय महिला, भंडारदरा येथे 45 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 56, 50 वर्षीय महिला, काशिपूर येथे 63 वर्षीय पुरुष, बहिरवाडी येथे 33 वर्षीय पुरुष, अकोले येथे 25 वर्षीय पुरुष, पिंपळगाव तळ येथे 72 वर्षीय महिला, साकीरवाडी येथे 41 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 50 वर्षीय पुरुष, इंदोरीत 65, 56, 55, 20 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 25 वर्षीय पुरुष, अगस्ति कारखाना रोड गणेश विहार अकोले येथे 16 वर्षीय बालक, 45 वर्षीय महिला, आंबड येथे 40 वर्षीय पुरुष, दत्तवाडीत 32 वर्षीय पुरूष, सुगाव बु येथे 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय पुरूष, रुंभोडी येथे 54, 67 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, पैठण येथे 64 वर्षीय महिला, धागनगाव आवारी येथे 21, 51 वर्षीय पुरुष, 42, 28 वर्षीय महिला.
नवलेवाडी येथे 51, 60 वर्षीय महिला, 58, 90 वर्षीय पुरुष, वाशेरे येथे 48 वर्षीय महिला, अगस्ति नगर अकोले येथे 57 वर्षीय पुरुष, मेहेंदुरी येथे 41 वर्षीय पुरुष, राधा नगर कॉलनी अकोले येथे 34 वर्षीय महिला, राजूर येथे 29 वर्षीय पुरुष, शिळावाडी येथे 27 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 76 वर्षीय पुरुष, कढणे येथे 73 वर्षीय पुरुष, बगडवाडी येथे 30 वर्षीय पुरुष, बागदरा येथे 12 वर्षीय बालक, 36 वर्षीय महिला, अकोेले येथे 34, 49, 18 वर्षीय पुरुष, काझीगळी कोतुळ येथे 52 वर्षीय पुरुष, निंब्रळ येथे 56 वर्षीय महिला, विरगाव येथे 25, 32 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, भोरझाप येथे 52 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 63 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 50 वर्षीय महिला, सुगाव येथे 40, 37 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 29 वर्षीय पुरुष, आंबड येथे 53 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 26 वर्षीय पुरुष, अकोले येथे 58, 32 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 75 वर्षीय महिला, रूंभोडी येथे 43 वर्षीय पुरुष, म्हाळदेवी येथे 26, 25, 15, 35 वर्षीय पुरुष, आंबड येथे 70 वर्षीय महिला, अकोले येथे 23 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 21, 52 वर्षीय पुरुष, अकोले येथे 41 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, खाणापूर येथे 9 वर्षीय बालिका, येथे 36 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 53 वर्षीय पुरुष, अकोले येथे 59 वर्षीय पुरुष, मुतखेल 44 वर्षीय महिला, शिरपुंजे येथे 55 वर्षीय पुरुष अशा 114 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अकोले तालुक्याचा आकडा हा 7 हजार 162 इतका झाला आहे. तर मृतांची संख्या 73 इतकी झाली आहे.
- प्रणिता पवार (रतनवाडी)
*विनंती की, घरात बसा
*वारंवार हात धुवा
*सॅनिटायझर वापरा
*मास्क नियमित वापरा
*सुरक्षित अंतर ठेवा
*गर्दी कोठे करु नका
*सार्वजानिक ठिकाणे टाळा
*हनिकारक काही खावू नका
*सर्वत्र स्वच्छता पाळा
*सरकारी सुचना पाळा
*संशयीतांनी तपासणी करा
*नियमित औषधे घ्या
*कोविड योद्ध्यांचा आदर करा
*सुरक्षित रहा, देश वाचवा