अकोल्यात 131 बाधित सात हजार पार, 70 मयत.! अकोले पुर्णत: लॉकडाऊन

सार्वभौम (अकोले) :- 

                    अकोले तालुक्यात आज दि. 26 रोजी 131 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आता अकोल्याची संख्या 7 हजार 48 इतकी झाली असून 70 जणांनी आपले प्राण गमविले आहे. तर आज दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे, तालुक्यात कोरोनाबाबत भितीचे वातावरण आणखी गडद होत चालले आहे. अकोल्यात हॉस्पिटलांना ऑक्सिजन राहिले नसून रेमडिसीवीर इंजक्शन देखील शिल्लक नाही. त्यामुळे, ही फार मोठी चिंतेची बाब आहे. आज खरंतर तालुक्याला मदतीची फार गरच आहे. मात्र, योग्यती मदत होत नसल्यामुळे कोरोनाशी झुंजताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. आज अकोलेच काय, संगमनेरात देखील ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, त्यामुळे लोक हॉस्पिटलच्या बाहेर मरुन पडताना दिसत आहे. ही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोले तालुका पुर्णत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर बाहेरुन औषधे व ऑक्सिजनची मागणी होत आहे.  

अकोले तालुक्यात आज 131 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात पिंपळगाव नाकविंदा येथे 50 वर्षीय महिला, कोंभाळणे येथे 43, 55, 21, वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, पागिरवाडी येथे 17 वर्षीय बालिका, औरंगपूर येथे 50 वर्षीय पुरुष, मनोहरपूर येथे 47 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 46, 27, 33, वर्षीय पुरुष, 23, 27, नागवाडी येथे 35 वर्षीय महिला, 18 व 42 वर्षीय महिला, वारंघुशी येथे 77, 75, 50, 65 व 35 वर्षीय पुरुष, 42, 30, 60, 29 व 72 वर्षीय महिला, 15 व 19 वर्षीय तरुण, राजूर येथे 36, 32 वर्षीय महिला, 35, 28, 58, 37, 28, 55 वर्षीय पुरुष,  3 वर्षीय बालिका नाशिकहून  राजूर मध्ये आली आहे. सावरखुटे येथे 49, 56 36 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, अंबीत येथे 72 वर्षीय पुरुष, काताळापूर येथे 27 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, चिंचावणे येथे 46 वर्षीय पुरुष, तेरुंगण येथे 32 वर्षीय महिला, केळी रुम्हणवाडी येथे 27 वर्षीय पुरुष, केळी येथे 30 व 27 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, समशेरपूर येथे 51, 45, 24, 65, 86, 36, 23, 35, 40, 32, वर्षीय पुरुष, 17, 30, 30, 55 व 65 वर्षीय महिला, घोडसरवाडी येथे 30 व 45 वर्षीय पुरुष, खिरविरे येथे 32 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, सावरगाव पाट येथे 35 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय बालिका, सांगवी येथे 36 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 39 वर्षीय पुरुष, अकोले शहर येथे 23, 56, 26, 42 वर्षीय पुरुष,  34, 80, 34, 46, 70, वर्षीय महिला, म्हाळदेवी येथे 57 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 29 वर्षीय पुरुष, टाकळी येथे 89 वर्षीय पुरुष, आंबड येथे 17 वर्षीय बालिका, 44 वर्षीय पुरूष, सुगाव खुर्द 65 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 39, 31 वर्षीय पुरुष, 27, 48 व 23 महिला, धुमाळवाडी येथे 44 वर्षीय पुरुष, 40 व 12 वर्षीय पुरुष, बहिरवाडी येथे 44 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 45, 32 वर्षीय पुरुष, आंबड येथे 53 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, निब्रळ येथे 32 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 21 वर्षीय महिला, धामनगाव पाट येथे 32 वर्षीय पुरुष, आश्रम स्कुल शिरपुंजे येथे 29 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, मवेशी येथे 28 वर्षीय पुरुष, खिरविरे येथे 51 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, कोदणी येथे 36 वर्षीय महिला, पिंपरकने येथे 42 वर्षीय पुरुष, 324 वर्षीय महिला, मान्हेरे येथे 43 वर्षीय पुरुष, शेणीत येथे 62 वर्षीय पुरुष, लाडगाव येथे 45 वर्षीय पुरुष, चिचोंडी येथे 24 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, मुतखेल येथे 37 वर्षीय पुरुष, शेंडी येथे 38 वर्षीय पुरुष, तेरूंगण येथे 31 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, पाडशेत येथे 60 वर्षीय पुरुष, 55 वर्षीची महिला, साम्रद येथे 32 वर्षीय महिला, गणोरे येथे 56 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 20 वर्षीय तरुण अशा 131 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आता अकोल्याची संख्या 7 हजार 48 इतकी झाली असून 70 जणांनी आपले प्राण गमविले आहे. तर आज दोन जणांचा मृत्यु झाला आहे. 

  जिल्ह्यात आज  ३१९५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ८४० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६४२ आणि अँटीजेन चाचणीत ६१६ रुग्ण बाधीत आढळले.

आज  डिस्चार्ज 

मनपा ७२६, अकोले १९९, जामखेड ४५, कर्जत २१२,  कोपरगाव १८२, नगर ग्रामीण २५५, नेवासा ११०, पारनेर १३४, पाथर्डी ८९, राहाता २०४, राहुरी १०३, संगमनेर २९५,  शेवगाव २११,  श्रीगोंदा १२०,  श्रीरामपूर ११२, कॅन्टोन्मेंट १२६, मिलिटरी हॉस्पिटल २३ आणि इतर जिल्हा ४९ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:१,३७,६८६

उपचार सुरू असलेले रूग्ण:२२८४०

मृत्यू:१८४९

एकूण रूग्ण संख्या:१,६२,३७५

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

दानशुर संस्था!

वात्सल्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज दि.२६ एप्रिल दु. १:०० वा. तहसिल कार्यालय, अकोले या ठिकाणी "कोरोना काळातील रुग्णांना जेवण्यासाठी "युज- एन्- थ्रो " किट (डबा, चहाचे गेलास, पाणी पिण्यासाठी ग्लास, रॅफेर , सॅनिटायझर,स्प्रे, ) व इतर आत्यावश्यक वस्तुंचे वाटप अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डाॅ. किरणजी लहामटे, मुकेश कांबळे तहसिलदार, मुख्य पोलिस निरीक्षक अभय परमार साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.इंद्रजित गंभीरे, अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे,  तालुका मंडल अधिकारी बाबासाहेब दातखिळे, मा.ढोले तात्या (अकोले तलाठी सजा), यांच्या उपस्थितीत तसेच कोरोना काळात कोरोना रूग्णांना जेवण सेवा उपलब्ध करून देणारे श्री.नवले व श्री.दिवटे यांना संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव श्री.विलास लाड यांच्या हस्ते कोरोना काळातील मदत म्हणून शासकीय अधिकाऱ्यांन समोर सुपूर्द करण्यात आले.तरी या कामी संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री.महेश भराडे, श्री.विशाल कोहाड, यांनी सहकार्य केले.संस्थेचे अध्यक्ष श्री.सुदेश जी मुर्तडक यांनी प्रशासनाला सर्वतोपरी वेळोवेळी योग्य ती मदत करण्याचा मानस संस्थेच्या वतीने करण्यासाठी कायम हजर राहण्याचे वचन दिले.