पोरीला टपली मरली आणि मग काय.! फुल राडा झाला, शिविगाळ व अश्लिल कृत्य.! अन डोक्यात दगड टाकला.! बाप लेकावर गुन्हा ठोकला.!
सार्वभौम (राजुर प्रतिनिधी) :-
डोक्यात टपली मारण्याच्या किरकोळ कारणाहून दोन गटात वाद झाले असता बाप लेकांनी मिळवून पती-पत्नीला बेदम मारहाण केली. इतकेच काय महिलेला मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत अश्लील चाळे केले ही धक्कादायक घटना राजूर येथील संकेत हॉटेल जवळ शुक्रवार दि. 2 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अतूल प्रभाकर लहामगे व प्रभाकर लहामगे (रा. राजुर, ता. अकोले) यांच्यावर राजुर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हे दोन्ही ही कुटुंब राजूरमध्ये एकमेकांच्या जवळच राहतात. आरोपी अतूल लहामगे याने गाईला चारा टाखला नाही म्हणून फिर्यादीच्या मुलीच्या डोक्यात टपली मारली. माझ्या मुलीच्या डोक्यात टपली का मारली असे मुलीच्या वडिलांनी आरोपी अतुलला विचारणा केली. मुलीचा बाप समजून सांगण्यासाठी गेला असता अतुलने बाचाबाची सुरू केली. या बाचाबाचीचे रूपांतर हळूहळू मोठ्या वादात सुरू झाले. मग काय.! बाप-लेकांनी मिळवून फिर्यादीच्या नवऱ्यास लाथाबुक्यांनी मारहाण सुरु केली. फिर्यादी ही त्यांचे भांडणे सोडवण्यासाठी गेली असता आरोपींनी थेट फिर्यादीला मिठी मारली आणि लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे केले. तर एका हाताने फिर्यादीची गच्ची धरून दुसऱ्या हाताने जवळ पडलेला दगड फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना चांगलीच दुखापत झाली. या हाणामाऱ्यामध्ये फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटुन ते गहाळ झाले आहे. याप्रकरणी आतुल प्रभाकर लहामगे व प्रभाकर लहामगे (रा. राजुर, ता. अकोले, जि. अहमदनगर) यांच्यावर राजुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
दरम्यान राजूर परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण आजकाल वाढत आहेत. यात बहुतांशी गुन्ह्यांमध्ये पोलीस मध्यस्ती करतात आणि त्यानंतर वादावर पडदा पडला जातो. या व्यतिरिक्त संदिग्ध प्रकार दाखल होण्याची संख्या जिल्ह्यात काही कमी नाही. त्यामुळे, राजूर पोलीस ठाणे त्याला अपवाद असणार तरी काय? त्यामुळे, संदिग्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलीस योग्य ती भूमिका घेऊन त्याची निर्गती करतात. मात्र काही ठिकाणी मलिदा खाण्याचे देखील काम होत असल्याचे बोलले जाते. यापुर्वी सपोनी नितीन पाटील यांनी राजुरकरांच्या काळजात घर केले होते. तडिपार आणि चोरटे दरोडेखोरांना पळता भूई थोडी केली होती. आता हो पायंडा कायम करण्याचे काम सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करतात का? हे पाहणे महत्वाचे आहे.