गाईची कास सुजली आणि नवऱ्याने बायकोच्या डोक्यात दगड टाकून ठार केले.! विकृत नवऱ्याला ठोकल्या बेड्या.! मेव्हणाची फिर्याद.!
सार्वभौम (संगमनेर) :-
गायीचे दुध काढण्यासाठी नवरा बायको आपल्या गायी जवळ गेले असता. गायीच्या कासेला सुज आल्याचे पत्नीच्या लक्षात आले. त्यामुळे गायीच्या कासेला बर्फाने शेकवावे लागेल असे पत्नी नवऱ्याला बोलताच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. ह्या बाचाबाचीचे रूपांतर वादात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, या निर्दयी माणसाने त्याच्या पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून केला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील बोडखेवाडी येथे मंगळवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. यात भारती शिवाजी दिघे (वय 28 वर्षे, रा. बोडखेवाडी, पो. तळेगाव, ता. संगमनेर) या महिलेचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर मयताच्या भावाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार दाजीवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी शिवाजी रामनाथ दिघे याला ताबडतोब बेड्या टोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी शिवाजी त्याची पत्नी भारती या दोघांचे 11 मे 2011 रोजी नान्नज दुमाला येथे लग्न झाले होते. त्यांचा संसार तसा जेमतेमच सुरू होता. या दरम्यान त्यांना एक 8 वर्षाचा मुलगा व 6 वर्षाची मुलगी असे दोन आपत्य झाले. हे पती पत्नी गेली अनेक दिवसांपासुन शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. शेती बरोबर दुग्ध व्यवसाय सुरू होता. नियमित सकाळी व संध्याकाळी दोघेही नवरा बायको गायांचे दूध काढावे लागत होते. रोजच्या प्रमाणे मंगळवारी देखील गायीचे दुध काढण्यासाठी सायं 6 वाजता आरोपी शिवाजी व मयत पत्नी भारती गायांचे दुध काढण्यासाठी गेले. मात्र, गायीच्या सडातून दुध निघत नसल्याने गायीची कास सुजलेली असल्याचे पत्नी भारतीच्या लक्षात आले. गायीची कास बर्फाने शेकवावी लागेल असे पत्नी बोलताच आरोपी शिवाजीने शिवीगाळ सुरू केली. आरोपी शिवाजीला राग अनावर झाली आणि त्याने शेजारी पडलेला दगड आपल्या पत्नीच्या डोक्यात टाकून खून केला. यात भारती दिघे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फिर्यादी महेश जिजाबा वाणी (वय-30 रा. नान्नज दुमाला, ता. संगमनेर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरून तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी शिवाजी दिघे यास अटक केली आहे. पण, मागील दोन वर्षांपासून शिवाजी दिघे यांना मानसिक उपचार सुरु होते. त्यांना सुरवातीस संगमनेर मधील एका डॉक्टरकडे उपचार सुरू होते व सध्या संगमनेर मधील दुसऱ्या एका डॉक्टरकडे उपचार सुरू आहे. असे फिर्यादीत म्हणले आहे.
दरम्यान, एक शुल्लक राग एक जीव घेऊन गेला तर एका व्यक्तीला जेलमध्ये बसावे लागले आहे. त्यामुळे, सर्वात प्रथम रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तर ज्या काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांच्यावर त्वरीत उपचार केले पाहिजे. अन्यथा उपचार राहतात बाजूला आणि अशा प्रकारच्या अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, सावधान.!