संगमनेरात २०५ तर अकोल्यात ८३ कोरोना बाोधित.! समनापूर वडापावचं नशिब खराब.! 14 ठिकाणी सेंटर, 14 डॉक्टर अन 959 बेड.!


सुशांत पावसे

संगमनेर (प्रतिनिधी) :-  

               संगमनेरमध्ये काल ११३ रुग्ण आढळून येत नाही तेच आज मंगळवार दि.६ एप्रिल रोजी २०५ कोरोना बाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर मागील आठ दिवसात तब्बल ८८२ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख येथे नेहमी वाढताच आहे. तालुक्यात रोजचे पॉझिटिव्ह रुग्ण व कोरणाचा वाढता प्रदुर्भाव पाहता संपूर्ण तालुक्यात प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, काल रात्री ८ वाजल्यापासून दारूचे दुकाने बंद होणार म्हणून तळीरामांनी दारूच्या दुकानांपुढे तोबा गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पण प्रशासनाने मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. एवढेच काय, या गर्दीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊन ही प्रशासनाने मात्र डोळ्यावर पट्टी बांधली. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचे उल्लंघन केल्याने सुप्रसिद्ध समनापुरचे नशीबवान वडापाव सेंटरवर गटविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. हे वडापाव सेंटर ७ दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.

         दरम्यान, संगमनेर तालुक्यात सध्या कोरोना विषाणुची झपाट्याने वाढ होत असून दिवसागणिक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण, येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बहुतांश कोरोनाचे लक्षणे दिसून येत नाही. हीच बाब लक्षात घेता तालुक्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. याच क्षेत्रातील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने हा मोठा संसर्ग टाळण्यासाठी याच क्षेत्रात विविध ठिकाणी याच रुग्णांना कोविड सेंटर तसेच लक्षणे नसेल्यांना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर अमोल निकम यांनी तालुक्यातील काही इमारती प्रशासनाकडे अधिग्रहित करण्यासाठी परिपत्रक काढले आहेत. त्यात कोविड सेंटर व विलगीकरन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 14 इमारती व 14 वैद्यकीय अधिकारी व क्षमतेनुसार बेड उपलब्ध करून दिले आहेत. तालुक्यात एकूण ९५९ बेड कोविड सेंटरमध्ये आहे. तर तालुक्यातील पठारावर कोविड केअर सेंटरचा अधिक भर दिला आहे.

कोविड सेंटर व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध बेड व कोविड सेंटरला वैद्यकीय अधिकारी खालील प्रमाणे नेमण्यात आले आहेत. 

(१)आदिवासी मुलांचे शासकीय वसती गृह, घुलेवाडी येथे २५० बेड, वैद्यकीय अधिकारी-डॉ. सतिष चांदुकर

(२)अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालय मांची हिल येथे २०० बेड, वैद्यकीय अधिकारी- तैय्यब तांबोळी

(३) शासकीय आश्रमशाळा वसतीगृह, साकुर येथे १६० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैरागर

(४) मौलाना आझाद मंगल कार्यालय,संगमनेर शहर येथे ७५ बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ, मच्छिद्र साबळे

(५) शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,संगमनेर येथे ४० बेड, वैद्यकीय अधिकारी  डॉ.मच्छिद्र साबळे

(६) शासकीय आश्रमशाळा वसतीगृह, अकलापुर येथे ५० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल भोर

(७) प्रा. आरोग्य केंद्र,जोर्वे येथे ५० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहजबोन तांबोळी

(८) जि. प. प्राथमिक शाळा, बोटा ३० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष कापसे

(९) जि. प. प्राथमिक शाळा,घारगाव येथे ३० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र डेरंगे

(१०) जि. प. प्राथमिक शाळा, तळेगाव येथे ३० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब डामसे

(११) जि. प. प्राथमिक शाळा चंदनापुरी येथे २५ बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ.निर्मला कवटे

(१२) उपकेंद्र सारोळे पठार येथे १० बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ, प्रल्हाद बांबळे

(१३) आयुर्वेदिक दवाखाना वरुडी पठार येथे ५ बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत शेलार

(१४) प्रा. आरोग्य केंद्र, जवळेबाळेश्वर येथे ४ बेड, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक दारुंटे

तर

अकोले तालुक्यात आज खाजगी आणि सरकारी असे ८३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे, तहसिलदार यांनी रस्त्यावर उतरुन धडाकेबाज कारवाया केल्या. त्यात आर व्ही ट्रेडर्स यांना ३० हजार तर वैद्य सेल्स, भिंगारे भांड्यांचे दुकान, कोळपकर भांड्यांचे दुकान, मारुती स्टील, गणेश मील यांच्यासह अनेकांवर कारवाई करत तब्बल प्रत्येक दुकान १० हजार दंड केला. यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर या कारवाईचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. तर अकोले तालुक्यात देखील आज माऊली कोविड हेल्थ केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

 सोशल मीडियावर प्रशासनाच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यात म्हटले गेले की,  सरकार व जिल्हा प्रशासनाचा यात कहीही दोष नाहीं. स्थानिक पातळीवर प्रशासनातील सहकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे सोईस्कर आर्थ काढून सरकारला बदनाम करायच्या द्रृष्टीने व्यापारी वर्गास त्रास चालू केला आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायाधीश सुद्धा आरोपीची बाजू ऐकून घेतो पण यांनी एकाही व्यापारी लोकांचे म्हणने तर सोडाच पण तोंडातुन शब्दही काढू न देता १०,००० हजार दंडाची पावती देंऊन पोलीसी खाकीचा धाक दाखवत सर्रास वसूली केली. काही व्यापाऱ्यांच्या दूर वरुन आलेल्या मालाच्या गाड्या ख़ाली करत होते तर त्यांनाही प्रत्येकी रूपये १०,००० हजार दंड ठोठावला. माल विकताना अगर दुकानातील माल गाड़ीत भरताना आढळल्यास कारवाई करा. पण माल ख़ाली कारणे हा गुन्हा कसा काय? हे प्रशासनाने समजून सांगावे.

एखाद्या उद्योगातील मजूर आत काम करत आहे त्यास शासनाने परवानगी दिलेली असताना इथल्या प्रशासनाने त्यांनाही रूपये १०,०० हजार दंड ठोठावला. असे झाले तर उद्योग संपतील कामगारांवर उपासमारीची वेळ येईल व दिवसागनिक ही परिस्थिती वाढत गेली तर त्यास तालुक़ा प्रशासन जबाबदार राहील.

सरकारचे सक्त आदेश आहे, उद्योग चालू ठेवावे, रोज़गार बंद होऊ देऊ नका, जनतेचीं ग़ैरसोय होईल असे कृत्य करु नका -

असे असताना देखील आज अकोल्यातील प्रशासन पोलीस डिपार्टमेंटच्या धाकाख़ाली सरंजामी कार्यवाही करित होते. या विरोधात सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते व व्यापारी यांनी  तत्काळ आंदोलन उभे करणे गरजेचे आहे. नाहीतर तालुक्याचे प्रचंड नुक़सान होईल. अशा प्रकारचा मेसेज आज एक काॅंग्रेस पदाधिकाऱ्याच्या नावे सोशस मीडियावर फिरत होता.