दोन नवलेंचे राजकीय द्वंद्व.! मालुंजकरचा जार वाळला नाही.! थोरातांच्या बठकीतील धुडगुस घालणारे आमदारच मुकादम.!



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                         अकोले तालुक्यात एक दिवशी 482 पैकी 10 रेमडिसिवीर आले आणि नकळत जनप्रक्षोभाच्या नावाखाली तालुक्यात राजकीय वातावरण पेटले गेले. ते शांत करण्यासाठी ना. बाळासाहेब थोरात हे अकोल्यात आले असता राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष तथा रुंभोडीचे सरपंच रवि मांलुंजकर यांनी भर बैठकीत नामादारांना धारेवर धरले. हा एक पुर्वीनियोजीत कट होता त्याचे कर्तेधरते हे तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे होते अशा प्रकारचा आरोप देखील करण्यात आला. या एक रेमडिसीवीरने तालुक्याचे राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले. मात्र, यावेळी तालुक्यातील दोन चळवळीचे दिग्गज नेते मधुकर नवले व अजित नवले यांच्यातील मतभेद डॉ. नवले यांच्या शब्दांतून अगदी आवेशपुर्वक जनतेसमोर आले अशी तालुक्यात चर्चा आहे. तर, नवले यांच्या व्यक्तीद्वेषाला उत्तर देताना मधुकर नवले यांनी डॉक्टरांना चळवळीचा इतिहास आणि आम्ही देखील चळवळीसाठी आयुष्य वेचले आहे. तर कोविडच्या काळात कोणताही गौगवा न करता जी काही सर्वोतपरी मदत करायची ती केली आहे. मात्र, आम्ही कधी आमच्या स्वार्थापोटी आंदोलन आणि चळवळीचा वापर केला नाही. अशा प्रकारचे खडेबोल सुनावले. एकंदर मिनानाथ पांडे आणि दादापाटील वाकचौरे यांनी देखील आ. किरण लहामटे यांच्या कार्यशैलीवर टिका करीत त्यांना धारेवर धरल्याचे पहायला मिळाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16 एप्रिल 2021 रोजी डॉ. अजित नवले यांच्या हाती माहिती आली की, संगमनेरात दोन तालुक्यांसाठी 482 रेमडिसिवीर आले होते. त्यातील फक्त 10 अकोल्यासाठी मिळाले आणि डॉ. नवलेंचा पारा वर चढला. त्यांनी 17 एप्रिल रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला आणि प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी, ना. थोरात साहेबांसह प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे आणि संगमनेर तहसिलदार अमोल निकम हे देखील आदोलकांच्या अजेंड्यावर आले. तालुक्यात हौशा-नौशा-गौशांना स्टेज मिळाले म्हणजे त्यांच्या वाच्चाळ तोफा अगदी कडाडू लागतात. तेथे झाले देखील तसेच घोषनाबाजी आणि फोटो सेशनसाठी नियोजनपुर्वक रिंगण आखले गेले, घोषणांची आतिषबाजी झाली आणि जे कार्यकर्ते सावलीला आले त्यांनी भाषणांची मैफिलच मांडली. हा कार्यक्रम तब्बल तीन तास चालला.

या आंदोलनात अकोले तालुक्यावर अन्याय होऊ नये म्हणून ना. बाळासाहेब थोरात यांनी दुसर्‍या दिवशी अकोले गाठले. सुदैव तालुक्याचे होते की, त्यांनी गेल्या कित्तेक वर्षापासून अकोल्याच्या प्रशासकीय बाबीत लक्ष घातले नव्हते, ना कधी आढावा घेऊ पाहिला होंता. मात्र, आपल्या भावावर (तालुक्यावर) अन्याय नको म्हणून ते आले आणि त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भलताच पाहुनचार केला. खरंतर नामदारांकडे प्रश्न मांडण्यापेक्षा त्यांना जाब विचारण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना धन्यता वाटली. नामदार हे संयमी व्यक्तीमत्व आहे, त्यामुळे, ते शब्दभर उत्तरले नाही. मात्र, खरोखर त्यांनी जर शरद पवार साहेबांसारखे वागणे केले असते तर शिर्डीत जसे एकाला पत्रकार परिषदेतून बाहेर काढू पाहिले तसे नामदारांनी देखील केले असते. मात्र, ऊलट त्यांच्याच संयमचा अंत पाहण्यात आला. खरंतर रवि मालुंजकर यांनी ज्या काही भावना मांडल्या त्या वावघ्या नव्हत्या, परंतु ती मांडण्याची पद्धत फार विक्षिप्त होती. त्यांची देहबोली एखाद्या विरोधीपक्षावर तुटून पडल्यासारखी होती. आपण कोणाशी बोलतो आहे? तो व्यक्ती कोणी आहे? त्यांची स्टेज काय आहे? त्यांचे पद काय आहे? त्यांचा अनुभव आणि वय काय आहे? याचा कोणताही लिहाज मालुंजकर यांनी ठेवलेला दिसला नाही. त्यामुळे, सामान्य जनतेला त्यांचे बोलणे गोड वाढले तरी ज्ञानी, जागरुक आणि सदसद विवेक बुद्ध असणारा कोणताही व्यक्ती त्याचे समर्थन करु शकत नाही.

आता 18 एप्रिल 2021 रोजी नामदार साहेबांच्या बैठकीत जो काही राडा झाला. त्याला अनुसरुन डॉ. अजित नवले यांनी त्यांच्या मनातील भडास माध्यमांपुढे ओकली. त्यांच्या बोलण्यातील काही मुद्दे वगळले तर ज्याला चळवळीचे आणि भुतकाळातील राजकीय इतिहासाचे ज्ञान आहे. तो स्पष्टपणे सांगेल की.! डॉक्टरांनी आपल्या मनातील भडास बाहेर पाडली आहे. ते एक अभ्यासू नेते असून ते विशेषत: मार्क्सवादी आहेत. त्यामुळे, सहाजिकच त्यांची दहबोली आणि बोलण्याची पद्धत तसेच आरोपाची शैली आक्रमक असणार यात काही शंका नाही. मात्र, त्यांना बैठकीला खुद्द नामदार साहेबांनी बोलविले नाही आणि आंदोलनाचे फलित म्हणून नामदार तालुक्यात आले व त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनाच विशेषत: मधुकर नवले यांना विश्वासात घेऊन आढावा बैठकीचा प्रारंभ केला याची सल त्यांच्या बोलण्यातून अगदी स्पष्टपणे बाहेर पडताना दिसते अशा प्रकारचा युक्तीवाद त्यांच्या विरोधात झाला.

त्यानंतर डॉ. नवले यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी देखील टिका केली. ते म्हणाले की, जर तालुक्यातील जनतेचा कनवाळा होता तर निमंत्रणाची काय गरज होती. त्यांनी स्वत: येऊन प्रश्न उपस्थित करायचे होते. त्यात त्यांना कमीपणा काय वाटावा? तर यापुर्वी नवले यांनी रेमडिसिवीर यावर आंदोलन केले नाही. डॉ. भांडकोळी यांच्याकडून कोणी आंदोलनात दिसले नाही. कारण, त्यांना 10 रेमडिसिवीर मिळाल्या होत्या. यांनी जे कोविड सेंटर उभे केले त्यांना काहीच मिळाले नाही म्हणून हो उहापोह त्यांच्याकडून पहायला मिळाला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी लागेच त्यांना 24 मंजूर झाल्या त्यापैकी 8 मिळाल्या. मग दुसरे कोविड सेंटर देखील अकोल्यात आहे. त्यांना काहीच मिळाल्या नाही त्यासाठी कोणीच का रस्त्यावर उतरले नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. तर दुसरीकडे यांच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा आभाव, रेमडिसिवीर नाही तरी देखील एक व्यक्तीचे चार दिवसात 52 हजार रुपये बिल झाले कसे? असे देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. अजित नवले यांनी मधुभाऊ नवले यांचे नाव घेऊन जरी टिका केली नाही तरी तालुक्यातील जनात इतकी काही दुधखुळी नाही. नवले, धुमाळ, नाईकवाडी यांचे राजकारण आता जनतेला नवे नाही. मधुकर नवले यांनी काय केले? असा अप्रत्यक्ष सवाल उभा केला गेला आणि त्यावर आज दि. 21 एप्रिल रोजी मधुकर नवले यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जनतेसमोर मांडली. ते म्हणले की, जाणिवपुर्वक अकोले आणि संगमनेर अशा प्रकारचा वाद उभा केला गेला आहे. मात्र, चळवळीत काम करणार्‍यांनी मागे वळून पहावे की, आजवर दोन्ही तालुक्यांनी एकत्र चळवळी करुनच न्याय मागितला आहे. जे रेमडिसिवीरचे काम व्हायला पाहिजे होते, ते बाजुला राहून मुद्दाम येथे अंतर्गत राजकारण होऊ घातले आहे हे फार मोठे दुर्दैव आहे. नामदारांच्या बद्दल कोणी मनात आकस ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, साहेब येथे येऊन गेल्यानंतरच येथील प्रशासन सज्ज झाले आहे.

डॉ. नवले यांनी केलेल्या काही अप्रत्यक्ष आरोपांना उत्तर देताना मधुभाऊ नवले म्हणले की, मी जे काही केले ते मी लोकांना सांगत फिरत नाही. मात्र, मागील कोरोनाच्या लाटेत सगळं अभिनव क्वारंटाईन सेंटरसाठी प्रशासनाच्या ताब्यत दिले होते. प्रशासनाला जे हवं त्याची पुर्तता केली आहे. तर काल देखील काही औषधे आणि आता देखील ऑक्सिजनची उपलब्धता करुन देत आहोत. या पलिकडे जेव्हा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मदतीचे आवाहन केले होते तेव्हा देखील मदत केली आहे, आजही विक्रम नवले यांनी ऑक्सिजन सिलेंटडर शोधून उपलब्ध करून दिला आहे. हे आम्ही सांगत बसत नाही. अर्थात काहींना वाटते आहे की, जे करतोय ते मीच एकटा करतोय, हा अहंकार योग्य नाही अशा प्रकारचे शाब्दीक गालगुच्चे नवले पकडले. आम्ही उभी हयात आंदोलने केली, मात्र ती समाज उन्नती आणि न्यायी हक्कासाठी होती. ती कोणाला बदनाम करण्यासाठी नव्हती. आज जो काही थोरात साहेबांना बदनाम करण्याचा घाट घातला आहे तो आम्ही काँग्रेस कार्यकर्ते शिजू देणार नाही हेच ठामपणे सांगतो. 


ही दुसरी राजकीय धुडगूस

आता डॉ. अजित नवले आणि ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले यांच्यातील मतभेद हे दुसर्‍यांदा प्रकर्षाने चव्हाट्यावर आले आहेत. कारण, 22 डिसेंबर 2020 रोजी जेव्हा मधुभाऊ यांनी भाजपला तथा पिचड पिता-पुत्रांना रामराम ठोकला तेव्हा ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. मात्र, असे बोलले जाते की, डॉ. नवले यांनी विरोधी भूमिका घेतली आणि त्यामुळे बैठकीत एकच गदारोळ झाला. ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादीचे वाभाडे त्यांना काढले आणि त्यांना एक प्रेसनोट काढण्यास सांगितली, यासाठी त्यांनी अल्टीमेट देखील दिला होता. म्हणजे राष्ट्रवादीत कोणी यावं आणि कोणी नाही. हे त्यांना ठरवायचे तर मग राष्ट्रवादीतील पदाला चिकटून बसलेले काय कामाचे? अशी टिका पुढे आली. तेव्हा देखील राष्ट्रवादीने एक प्रेसनोट काढून आपला निर्वाळा सादर केला. की, डॉ. नवले यांनी कोणालाही विरोध केला नाही. अर्थात या सोशल मीडियावरील चर्चा होत्या. आता त्याला पुन्हा नव्याने पुष्टी मिळाली आहे.

तर आज काँग्रेसचे जेष्ठ नेते मिनानाथ पांडे यांनी देखील आमदार किरण लहामटे यांच्यावर निशाणा साधला. डॉ. किरण लहामटे हे केवळ फोन लावतात, साऊंड करतात आणि आपल्याला ऐकवतात. यापलिकडे त्यांनी स्वत: पालकमंत्र्यांना येथे बोलविले पाहिजे होते, त्यांच्या बैठकांना गेले पाहिजे. जे शक्य होईल ते तालुक्यासाठी आणले पाहिजे. मात्र, अकोल्यात बसून फोन करायचे आणि ते लोकांना ऐकवायचे हे आता मान्य होणार नाही. आपण कोठेतरी कमी पडत आहोत हे आमदार महोदयांनी मान्य केले पाहिजे. आज तालुक्यात 888 बेड आहे त्या पलिकडे डॉ. सुधिर तांबे यांच्या मदतीने आणखी काही मदत होणार आहे. येथील राष्ट्रवादी भाजपवर का बोलत नाही? त्यांचा पालकमंत्री आहे. अन्न औषध प्रशासन खातं त्यांच्याकडे आहे त्यांना का हे लोक बोलत नाही? काँग्रेस नेत्यांना का टारगेट करीत आहेत्य  त्यामुळे, नामदार साहेबांना जर कोणी अवमान करु पाहत असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही. डॉ. अजित नवले यांनी जी काही मुलाखत दिली आहे ती व्यक्तीद्वेषातून दिलेली आहे. त्यांना वेगळं निमंत्रण पाहिजे होते हे योग्य नाही. आता येणार्‍या काळात जर असे वादंग होत असेल आमच्या नेत्याचा आवमान होत असेल तर आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ.!

यावेळी दादापाटील वाकचौरे म्हणले की, एक मंत्री आपल्या तालुक्यात येतो उलट त्यांच्या स्वागतासाठी आमदारांनी उपस्थित रहायचे तर उलट आमदारच उशिरा आले आणि वरुन डॉ. अजित नवले म्हणले की, आमदार येईपर्यंत प्रोटोकॉल पाळला नाही. उलटपक्षी आमदार किरण लहामटे यांनी जो काही व्यक्ती (रवि मालुंजकर) आणला होता त्याला पुर्वनियोजित प्रशिक्षण दिले गेले होते. मालुंजकर जे काही बोलला त्याचा बोलता धनी आमदार आहे. मालुंजकर हा एक अध्यक्ष आहे, एका गावचा सरपंच आहे. आजून त्याचा जार वाळला नाही. त्यामुळे, साहेबांचे म्हणणे होते की, त्याचे जितके वय आहेे तितका नामदार साहेबांचा अनूभव आहे. इतके सगळे घडून देखील नामदार साहेब म्हणले की, जाऊद्या त्या मुलाची काही चूक नाही. तर डॉ. अजित नवले यांना देखील एकदा नामदार साहेब ढाण्या वाघ म्हणून संबोधित केले होते. मग यांचा कोणता इगो दुखावला गेला. अर्थात यांचा पुर्वनियोजित प्लॅन होते की, ही मिटींग उधळून लावायची होती. जेव्हा मालुंजक आरोप करीत होता तेव्हा आमदार सांगत होते की, त्याला बोलुद्या-बोलुद्या त्यामुळे हे सर्व नियोजनपुर्वक होते.