आरं देवा.! कोविड पेशन्टच चोरुन नेले.! पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करुन बेड्या ठोकल्या.! अपहरणाचा गुन्हा दाखल.! संगमनेरातील प्रकार.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

                नाशिकला कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड शिल्लक नसल्याने एका कुटुंबाने खाजगी रुग्णवाहीकाकरून आपले रुग्ण पुण्याला उपचारासाठी तत्काळ चालविले होते. मात्र, रुग्णवाहीकेसह कोरोना बाधित रुग्णाचेच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.19 एप्रिल 2021 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात असणाऱ्या लक्ष्मी हॉटेल जवळ घडली. या घटनेनंतर रुग्णवाहीकेच्या चालकाने घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी वैभव सुभाष पांडे याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यानी  आरोपी वैभव सुभाष पांडे याला ताबडतोब बेड्या ठोकुन त्याच्याकडून बाधित रुग्णासह 80 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यानंतर महिलेस पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यदा कदाचित जर पोलिसांनी या चोरट्याला तत्काळ ताब्यात घेतले नसते तर त्या रुग्णवाहिकेचे सोडा.! महिलेचे काय झाले असते ते नव्याने सांगण्याची गरज नाही.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या उपशहरातील जेलरोड येथे राहणारी एक महिला कोरोना बाधित आढळुन आली होती. उपचार व्हावे म्हणून त्यांनी नाशिक मधील अनेक रुग्णालये तपासली, मात्र, त्यांना कोठे आॅक्सिजन बेड मिळाला नाही. त्यामुळे, त्यांच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की, आता नाशिक येथे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध न झाल्याने पुढील उपचारासाठी रुग्ण पुण्याला हलविणे बरे.! त्यामुळे, एक खाजगी रुग्णवाहिका पाहून त्यांनी नाशिक पुणे हायवे मार्गे रुग्ण पुण्याच्या दिशेने  रात्री उशिरा आगेकुच केली. दरम्यान, नाशिक येथून निघाल्याने मध्ये जेवणासाठी पार्सल काय भेटते का? याकडे त्यांचे लक्ष होते. ते घारगाव येथील पुणे हायवे लगत असलेल्या लक्ष्मी हॉटेल जवळ थांबले. तेथे हॉटेलवर पार्सल घेण्यासाठी रुग्णवाहीकेचा चालक उतरला व रुग्णाचे नातेवाईक शौचालयासाठी उतरले. गाडीत कोरोना बाधित रुग्ण असल्याने गाडीला कोणी हात लावणार नाही. या विचाराने रुग्णवाहिकेच्या चालकाने चावी गाडीलाच ठेवली. पण, गाडीत रुग्ण सोडून कोणीच नाही. आणि गाडीला चावी देखील तशीच असल्याचे आरोपी वैभव पांडे याने पाहिले. याच संधीचा फायदा घेत आरोपी वैभव पांडे याने रुग्णवाहिकेसह रुग्णाला देखील घेऊन धुम ठोकली होती. 

           दरम्यान, रुग्णवाहीकेच्या चालकाने घारगाव पोलीस ठाणे गाठले. तेथे घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर चालकाच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यानंतर अवघ्या काही कालावधीतच आरोपीचा सुगावा लावुन त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या. या घटनेत मारुती सुझुकी एम. एच.15 डी.के 6060 ही रुग्णवाहिका पळवुन नेली होती. यामध्ये असलेली कोरोना बाधित महिला ही सुखरूप आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील के. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पो. ना.लांघे करीत आहे.

       दरम्यान, कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चाले आहे. लोक उपचारासाठी मोठे शहर गाठवत आहे. पण, उपचारासाठी नेत असताना सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण, माथेफिरू लोकांनी कोरोना काळातच फायदा उठवायचे ठरवले आहे. त्यामुळे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घराबाहेर पडून नवीन-नवीन प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळत आहे.