अकोल्यात 193 रुग्ण पॉझिटीव्ह, 1 मयत, ऑक्सिजन, रेमडिसीवीर अन बेडचा तुटवडा, संगमनेरात 226 रुग्ण 7 मयत.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
कोरोनाची महामारी आता अगदी 1877 साली आलेल्या प्लेगच्या साथीच्या रोगाप्रमाणे जनतेच्या उरी बसली आहे. आता प्रशासन देखील पळून-पळून किती पळणार आहे? त्यांच्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे त्यांनी देखील हात टेकले आहे. त्यामुळे, वारंवार त्यांना दोष देणे योग्य ठरणार नाही. मात्र, यासाठी सुसज्ज यंत्रणा, नियोजन आणि ऑक्सिजन बेड, रेमडिसीवीर यांची नित्तांत गरज आहे. काही झाले तरी या गोष्टींचे सोंग आणता येणार नाही. आज नगर जिल्ह्यात अगदी काही तास ऑक्सिजन पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. कोण कोठून कसे उपलब्ध करीत आहे हे त्या-त्या तालुक्याला माहित आहे. त्यामुळे, फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोले तालुक्यात अगदी काल काही मिनिट ऑक्सिजन चालेल इतकाच शिल्लक होता. त्यानंतर सुरेश गडाख, महेश नवले, संदिप शेणकर, नितीन नाईकवाडी, गणेश आवारी यांच्यासह अन्य व्यक्तींनी अथक प्रयत्न केले आणि ऑक्सिजन उपलब्ध केला. आज देखील ही परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे, जनतेने आता तरी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. 7 ते 11 नियम शिथिल आहे म्हणून काहीही कारणे काढायची आणि बाजार बुनग्यासारखे चार तास फिरायचे यावर नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आळा घातला पाहिजे. तरच ही कोरोनाची चेन आपण ब्रेक करु शकतो.
आता एकंदर यापुर्वी आजी-माजी आमदारांमध्ये जो काही श्रेय्यवाद सुरू होता. त्याला बगल मिळाला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी असाच वाद नव्याने पुढे आला आहे. डॉ. अजित नवले यांनी आंदोलन छेडले आणि नाराजी नाट्यातून तालुक्यात राजकारण पेटले. त्याचा फायदा जनतेला नक्की झाला. कारण, खुद्द नामदार बाळासाहेब थोरात यांनी कधी नव्हे अकोल्यात लक्ष घातले आणि सलग दोन दिवस 50 रेमडिसीवीर त्यांनी अकोल्यासाठी दिल्या. याचा अर्थ नामदारांना जे काही रिपोर्टींग झाले ते काही गैर नव्हते त्याचे फलित म्हणून अगदी काहीच येत नसताना 50 रेमडिसीवीर म्हणजे जोक नव्हे. यात दोघांचे भांडण आणि जनतेचा लाभ झाले हे तितकेच सत्य आहे. खरंतर तालुक्यात कधी नव्हे असा श्रेय्यवाद, भाऊबंदकीचे वाद आणि पक्षद्वेशी राजकारण रंगू लागले आहे. यात जनतेचे नुकसान आहे. आज जनता बेड, ऑक्सिजन, रेमडिसीवीर, अॅम्ब्युलन्स यांच्यापासून वंचित आहे. लोक उपचाराआभावी जीव सोडत आहेत. ही सर्व परिस्थिती थोपविण्यासाठी सगळ्यांनी एकीची वज्रमुठ बांधणे गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ फार वाईट असेल असे सुज्ञ व्यक्तींना वाटते आहे.
अकोले तालुक्यात आज दि. 22 एप्रिल रोजी 193 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात कुंभेफळ अकोले येथे 48 वर्षीय पुरुष, कळस येथे 40 वर्षीय महिला, धामनगाव अवारी येथे 30, 43 वर्षीय पुरुष, बाभळवंडी येथे 24 वर्षीय दोन पुरुष, उंचखडक खुर्द येथे 12 वर्षीय तरुण, नवलेवाडी येथे 16 वर्षीय तरुण, 42, 37 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय तरुणी, विरगाव येथे 29 व 11 वर्षीय तरुणी, आठ वर्षीय बालक, चितळवेढे येथे 75, 45, 36 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, इंदोरी येथे 02 वर्षीय बालक, 58 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालिका, विठा येथे 14 वर्षीय तरुणी, 42 वर्षीय पुरुष, बहिरवाडी येथे 18 वर्षीय तरुण, 32 वर्षीय पुरूष, हिवरगाव येथे 40 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 24, 17 वर्षीय तरुण, 42 वर्षीय पुरुष, पैठण येथे 35 वर्षीय पुरुष, कोहणे येथे 16 वर्षीय तरुण, औरंगपूर येथे 49 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 28 वर्षीय तरुण, 32 वर्षीय पुरुष, टाकळी येथे 24 वर्षीय पुरुष, राजूर येथे 29, 14, 13, 23, 27 वर्षीय तरुण, 45, 22, 50, 51, 43, 48, 38, 70, 22, 32, 35, 56, 43 वर्षीय पुरुष, 65, 41, 45, 30, 60, 26, 52 वर्षीय महिला, रंधा येथे 48 वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे 59 वर्षीय पुरुष, मवेशी जवळील पुरुषवाडी येथे 17 वर्षीय तरुणी, चिंचवणे येथे 32, 20, 48, 51, वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुणी, 35, 37 वर्षीय महिला, खडकी येथे 27 वर्षीय पुरुष, वाघदरी येथे 55, 27 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 50 वर्षीय पुरुष, 23 वर्षीय तरुणी, तेरुंगण येथे 33 वर्षीय पुरुष, कातळापूर येथे 24 वर्षीय तरुणी, मवेशी येथे 62 वर्षीय महिला, समशेरपूर येथे 30, 40, 21, 50, 55, 30, 60 वर्षीय पुरुष, 11 वर्षींय तरुण, 30 वर्षीय दोन महिला व 18 व 22 तरुणी, नागवाडीत 35 वर्षीय महिला, टाहाकारी येथे 30 वर्षीय पुरुष, मुथाळणे येथे 32 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरुष, ढोनरवाडी येथे 24 वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे 55 वर्षीय पुरुष, वाकी येथे 39 वर्षीय पुरुष, माळेगाव येथे 21 वर्षीय तरुण, कातळापूर येथे 75 वर्षीय पुरुष, रंधा येथे 45 वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे 50 वर्षीय पुरुष व पुरुष, 38 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुण, शेलद येथे 34 वर्षीय पुरुष, कातळापूर येथे 23 वर्षीय महिला, माणिक ओझर येथे 21 वर्षीय दोन पुरुष, विठा येथे 67 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 08 वर्षीय बालक, आंबड येथे 48 वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 50, 55 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण, 56 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 44, 27, वर्षीय पुरूष, डोंगरगाव येथे 44 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 80 वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे 68 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारी येथे 31 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 49 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, समशेरपूर येथे 29 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 34, 40 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय बालक, जांभळे येथे 58, 51 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, बेलापूर येथे 58 वर्षीय पुरुष, भंडारदारा 8 वर्षीय बालिका, 38 वर्षीय पुरुष, शेंडी येथे 33 वर्षीय दोन महिला, केळी रूम्हणवाडी येथे 23 वर्षीय तरुणी, 32 वर्षीय पुरुष, पिंपळगाव खांड येथे 28 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 40 वर्षीय पुरुष, पांगरी येथे 35 वर्षीय पुरुष, शिळवंडी येथे 46 वर्षीय महिला, पिंपळगाव खांड येथे 55 वर्षीय पुरुष, मोग्रस येथे 67 वर्षीय महिला, कोतुळ येथे 16 वर्षीय बालक, 38 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, आंभोळ येथे 12 वर्षीय बालिका, पैठण येथे 62 वर्षीय पुरुष, मोरवाडी येथे 20, 48 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, फोफसंडी येथे 39 वर्षीय पुरुष, न्यु नगर रोड संगमनेर, 21 वर्षीय तरुण, मुरशेत येथे 50 वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे 50 वर्षीय पुरुष, रतनवाडी येथे 35 वर्षीय पुरुष, मुरशेत येथे 45 वर्षीय पुरुष, शेंडी येथे 05 वर्षीय बालक, 35 वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे 57, 26 वर्षीय पुरुष, टाकळी येथे 41 वर्षीय महिला, म्हाळुगी येथे 64 वर्षीय पुरुष, कोतुळ 9 वर्षीय बालक, धुमाळवाडी येथे 31 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, टाहाकरी येथे 34 वर्षीय पुरुष, विठे येथे 49 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 50 वर्षीय पुरुष, इंदोरी येथे 75 वर्षीय महिला, अगस्ति नगर अकोले येथे 56 वर्षीय महिला, मेहेंदुरी येथे 37 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 56 वर्षीय महिला, म्हळदेवी येथे 29 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 26 वर्षीय पुरुष, आंबड येथे 37 वर्षीय महिला, सुगाव खुर्द येथे 65 वर्षीय महिला, दत्तावाडी येथे 35 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 65, 32 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, निब्रळ येथे 64 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 20 वर्षीय तरुण, कोहणे येथे 43 वर्षीय पुरुष, कळस येथे 70 वर्षीय महिला, राजूर येथे 55 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथे 65 वर्षीय महिला अशा 193 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, आज अकोले शहरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य उपचार घेत आहेत. तर अकोले तालुक्यात आजवर 63 जणांनी कोरोनापुढे शरणागती पत्करली असून 3 हजार 324 व्यक्ती त्याच्याशी झुंज देत आहेत. तर तालुक्यात 6 हजार 448 रुग्ण आजवर बाधित झालेले आहेत. तर संगमनेरचा विचार करता येते मृत्युचे प्रमाण वाढत चालले असून संगमनेरात 226 रुग्ण मिळून आले आहेत. सोशल मीडियावर आलेल्या माहितीनुसार आज संगमनेरात सात जणांनी कोरोनापुढे शरणागती पत्करली असून अनेकजण मृत्युशी झुंज देत आहेत. संगमनेरात कोरोनाचा आकडे 15 हजारांकडे वाटचाल करीत असून आक्सिजन, रेमडिसीवीर, बेड आणि अवाजवी बिल याबाबत प्रचंड अस्वास्थता दिसून येत आहे. आता ना. बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याकडे कटाक्षाने लक्ष देणे सुरू केले आहे. त्यामुळे, आशा आहे की, अकोले आणि संगमनेर तालुक्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.
- शंकर संगारे
- आकाश देशमुख