अकोल्यात तीन मयत 105 रुग्ण पॉझिटीव्ह.! 1 मे पर्यंत लॉकडाऊनचे नवे कडक नियम.
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात कोरोनाची आकडेवारी प्रचंड वाढते आहे. त्या तुलनेत येथे प्रशासनाकडून रेमेडिसीवीरचा पुरवठा होता नाही दिसत नाही. त्यामुळे, आज अकोल्यात सगळे नियम धाब्यावर बसवून तहसिल कार्यालयात आंदोलन करण्यात आले. आज खर्या अर्थाने अकोले तालुक्याला दुसवट्याची वागणुक मिळत असल्याचे पहाला मिळाले. कारण, 482 पैकी 472 रेमेडिसीवीर संगमनेरला तर फक्त 10 रेमेडिसीवीर अकोल्याला तर संगमनेरातून 20 रेमेडिसीवीर राहाता तालुक्यात जातात. हा कोठेतरी अतिरेख होताना दिसतो आहे. मात्र, खरे पाहिले तर जो तो लोकप्रतिनिधी आपापल्या मतदार संघाचा विचार करतो. त्यामुळे, ना. बाळासाहेब थोरात यांना बोलुन उपयोग नाही. आपले आमदार डॉ. किरण लहामटे हे कोठेतरी कमी पडतात. हेच त्यांचे समन्वयक मान्य करायला तयार नाहीत. येथे पद पायलीच्या पन्नास वाटली, त्यांचे योगदान काय? तर शुन्य.! आमदार राजुरहून आले की त्यांच्या मागेपुढे फिरायचे, त्यांच्या हो ला हो मिळवायचा या पलिकडे कोणी उल्लेखनिय काम करताना दिसले नाही. व्हाटसअॅपवर गप्पा मात्र भल्या भल्यांना बुचकण्यात पाडतील अशा असतात. खरंतर आमदार साहेबांनी दोन गावं कमी फिरावी, मात्र एक चक्कर जिल्हाधिकार्यांच्या दालनात जाऊन आपला हक्क भांडून आणला पाहिजे. त्यांच्या अॅम्ब्युलन्सचे दर्शन आजकाल फार दुर्मिळ झाले आहेत. आमदार साहेब उद्घाटने बक्कळ करतात, मात्र त्याचा पाठपुरावा त्यांच्याकडून होताना दिसत नाही. दुर्दैवाने अकोल्यात डॉ. इंद्रजित गंभीरे, डॉ. शेटे यांच्यासारख्या आणखी काही व्यक्तींमुळे आरोग्याची मशाल आजही तेवती आहे. अन्यथा येथे कर्मचारी सोडा, डॉक्टर देखील संगमनेरला कार्यरत असल्याचे दिसते आहे.
तुम्हाला दु:खद मनाने सांगावेसे वाटते की, अगस्ती कोविड सेंटर येथे बेड लावण्यासाठी कोणी नाही म्हणून दुसर्या मजल्याहून खाटा डोक्यावर वाहून नोडल अधिकारी डॉ. शामकांत शेटे, मंडल अधिकारी दातखिळे तात्या आणि तलाठी ढोले तात्या यांनी 75 बेड वाहून सुसज्ज केले. मग सेवा देणारे हे समाजसेवक तथा बडी-बडी भाषणे ठोकणारे बोलघेवडे कोठे जातात हे अद्याप कोणाला कळले नाही. खरंतर आज रेमेडिसीवीरसाठी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन झाले. यात रेमेडिसीवीर हा विषय बाजुला राहिला. मात्र, प्रांताधिकारी यांच्या बदलीचाच विषय समोर उभा राहिला. मुळत: हे समजून घेणे अपेक्षित होते की, रेमेडिसीवीर ही जिल्हा प्रशासन आणि थेट अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून थेट रुग्णालय तथा मेडीकल यांना पोहच होतात. त्यात महसुलचा जरा देखील हस्तक्षेप नाही. अशा प्रकारचे जिल्हाधिकारी यांचे आदेशपत्रक आहे. मात्र, अकोल्यात रेमेडिसीवीर राहिले बाजुला आणि प्रांत यांच्यावरच मोठा उहापोह झाला. दुर्दैव आणि वास्तव असे की, या सर्व औषधांचा पुरवठा होत नसेल तर तो उपलब्ध करुन देण्याचे काम आमदार महोदयांचे होते. मात्र, त्यांच्या बाबत कोणी ब्र शब्द देखील काढला नाही. जेथे आणि ज्यांच्याकडे हक्काने आदळ आपट करायची त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे आणि ज्यांच्याकडे काही अधिकार नाहीत त्यांच्यावर खार खावून भाषणे कायाची.! वा रे बहाद्दर.! हे कोठेतरी ज्ञानी व्यक्तींना पटले नाही. त्यामुळे त्यांनी आहे तशा प्रतिक्रिया रोखठोक सार्वभौमपुढे मांडल्या आहेत.
महत्वाचे
सकाळी 7 ते 11 पर्यंत चालु
किराना दुकाने
दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
भाजीपाला विक्री
फळे विक्री
अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री
कृषि संबंधित सर्व सेवा दुकाने
पशुखाद्य विक्री
18 एप्रिल ते 1 मे पर्यंत
आज संगमनेर तालुक्यात 184 रुग्ण मिळून आले आहेत तर अकोले तालुक्यात 105 रुग्ण मिळुन आले आहेत. त्यात जांबळे येथे 23 वर्षीय पुरुष, चैतन्यपूर येथे 55 वर्षीय पुरुष, निर्गुडवाडी 63 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथे 80 वर्षीय महिला, म्हाळुंगी 15 वर्षीय तरुणी, 65 वर्षीय महिला, तिरडे येथे 27, 60, 67 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुणी, 46 वर्षीय महिला, इंदोरी येथे 42, 29,36 वर्षीय पुरुष, 22, 12 वर्षीय तरुणी, 42, 45 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 55 वर्षीय महिला, 26 वर्षीय तरुण, विठा येथे 35 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, निब्रळ येथे 45 वर्षीय पुरुष, वांजुळशेत येथे 55, 45 वर्षीय पुरुष, बाभळवंडी येथे 24 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 48, 50 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, डोंगरगाव येथे 39 वर्षीय महिला, गणोरे येथे 56 वर्षीय महिला, टेंभूरवाडी येथे 42,21 वर्षीय पुरुष, चिचोंडी येथे 18, 62, 38 वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे 40 वर्षीय महिला,
मुतखेल येथे 25 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, ढोनरवाडी येथे 22 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट येथे 54 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 65 वर्षीय महिला, मुथाळणे येथे 95 वर्षीय पुरुष, सोमळवाडी येथे 69 वर्षीय पुरुष, अकोले शहरात 21 वर्षीय तरुणी, 27 वर्षीय तरुण, रुंभोडी येथे 35 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 60 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालयच्या मागे येथे 52 वर्षीय महिला, गर्दणी येथे 60 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 66, 47 वर्षीय पुरुष, 42, 40, 60, 18, वर्षीय महिला, नवलेवाडी येथे 22 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुणी, मेहेंदुरी येथे 21 वर्षीय तरुणी, 27 वर्षीय तरुण, कोतुळ येथे 21, 54, 54 वर्षीय पुरुष, 81, 40 वर्षीय महिला, नाईकवाडी वाडा (अकोले) 24 तरुणी, परखतपूर येथे 43 वर्षीय पुरुष, अकोले शहरात येथे 53 वर्षीय पुरुष, पांगरी येथे 25 वर्षीय महिला, 27 वर्षीय तरुण, कारखाना रोड अकोले येथे 47, 30,वर्षीय पुरुष, अकोले कमानवेस येथे 44 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला, 58 वर्षीय महिला, मोग्रस येथे 35 वर्षीय महिला, औरंगपूर येथे 28 वर्षीय पुरुष, कळस येथे 60, 32 वर्षीय महिला, 12 वर्षीय तरुण, 40 वर्षीय पुरुष,
नवलेवाडी येथे 24 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे 36 वर्षीय पुरुष, मनोहरपूर येथे 65 वर्षीय महिला, इंदोरी येथे 64, 38 वर्षीय पुरुष, 54, 32 वर्षीय महिला, टाकळी येथे 60 वर्षीय पुरुष, म्हाळदेवी येथे 26, 55, 20, 34, वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला,9 वर्षीची बालिका, शेटे मळा अकोले येथे 41 वर्षीय पुरुष, बाजारतळ अकोले येथे 53 वर्षीय महिला, खानापूर (भुजबळ वस्ती) येथे 50 वर्षीय महिला, नगर पंचायत अकोले येथे 32 वर्षीय महिला, पिसावळी मारुती मंदीर अकोले येथे 34 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 31 वर्षीय पुरुष, श्रीराम नगर धुमाळवाडी येथे 27 वर्षीय तरुणी असे एकूण 105 रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे, अकोल्याची संख्या आता 5 हजार 758 इतकी झाली आहे. तर आज एकाच दिवशी तीन जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यात समशेरपूर येथे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर रुंभोडी येथील हसतमुख असणारे प्रशांत हॉटेलचे मालक तथा अगस्ति कारखाण्याचे माजी व्हाईस चेअरमन हासे यांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. तसेच शेरणखेल येथील 75 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला आहेे.