तु लफडेबाज आहेस असे म्हणून प्रियकराने तिला शिवीगाळ. केली! सोशल मीडियावर फोटो व्हायरलची धमकी, मग काय.! ठोकल्या बेड्या.!
प्रेमाची नाटके करुन एनवेळी नाही म्हणण्याचे प्रमाण मुलींचे कमी नाहीत आणि मुलांचे देखील नाही. गेल्या पंधरा दिवसात अशा प्रकारे प्रेयसिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने प्रेयसिने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तो प्रकार अजून ताजाच असताना संगमनेर शहरातील गणेशनगर येथे पुन्हा अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. तु लफडेबाज आहेस असे म्हणून प्रियकराने तिला शिवीगाळ केली तर जास्त अगाऊपणा केला तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दमदाटी केली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सचिन नामदेव काळे (वय 34, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) याच्यावर अॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरंतर प्रेम आणि जात, धर्म यांच्यात आपला समाज बर्यापैकी गुरफडून पडला आहे. हे असे असले तरी वासनांध व्यक्तीपुढे अशा प्रकारच्या चौकटी तोडून सगळ्यांनी पुढे आले पाहिजे. तसे की, कोपर्डीच्या ताईसाठी सगळा समाज एकवटला होता. शेवटी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि भैलुमे या तिघांना फाशीची शिक्षा सुनावलीच. या पलिकडे पारनेरचे लोणी मावळा प्रकरण देखील असेच आहे. तर या व्यतिरिक्त खर्ड्याचे नितीन आगे आणि सोनई हत्याकांड अगदी अपवाद वगळला तर यात बर्याच ठिकाणी जातीय रंग दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे, आजकाल जात पाहून प्रेम करणे असा फंडा निर्माण होऊ पाहत आहे. दुर्दैवाने एकीकडे राजकीय अॅट्रॉसिटीचा गैरवापर आणि दुसरीकडे खरोखर अन्याय झाला तरी अॅट्रॉसिटी दाखल होऊन देखील त्याच्या योग्य पद्धतीने न होणारा तपास हे सर्व सारखेच होऊन बसले आहे. कोणतीही घटना पाहिली तरी ऊलट पालट दिशेने येथे जातीयवाद उभा राहतोच.
आता या घटनेत आरोपी सचिन नामदेव काळे हा गेल्या कित्तेक दिवसांपासून 36 वर्षीय मुलीच्या संपर्कात होता. त्याच्यात मैत्री आणि नंतर प्रेम संबंध राहिले. मात्र, कालांतराने काळे हा पीडित तरुणीला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सारखा शिवीगाळ करुन तिच्या जाती विषयी अपशब्द बोलत होता. या दरम्यान पीडित तरुणीने त्याला प्रेम प्रकरणात प्रेमाच्या भाषेत समजून सांगितले. मात्र, तरी देखील याने त्याचा शिवीगाळ प्रकार सुरूच ठेवला. तू लफडेबाज आहेस, तुझे आणि माझे जे काही फोटो काढले आहेत. ते मी सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देऊ लागला.
दरम्यान हा प्रकार पीडित मुलीला अनावर झाल्यामुळे तीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. त्याचा हा प्रकार 15 मार्च 2019 ते 27 मार्च 2021 म्हणजे तब्बल एक वर्ष चालला होता. दोघांमध्ये प्रेमाचे संबंध असताना अशा प्रकारे त्याचे ब्लॅकमेल करणे याचा अतिरेख झाल्यामुळे पीडित तरुणीने थेट त्याच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता कायदेशीर रित्या तपास पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्याकडे गेला. त्यांनी तत्काळ त्यांच्या टिमद्वारे सचिन नामदेव काळे यास अटक केली आहे. आता यात पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली असून या घटनेत नेमकी काय घडले आहे. याचा अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे अनेक लैला मजनू यांना विरह सहन करावा लागला आहे. तर जसे लॉकडाऊन खुले झाले तेव्हापासून सर्वाधिक मुले मुली पळून जाणे व धार्मिक ठिकाणी जाऊन लग्न करण्याचे प्रमाण वाढले आहे. इतकेच काय! पहिल्या लॉकडाऊनमध्ये झालेले लग्न आता दुसर्या लॉकडाऊनमध्ये मोडल्याचे देखील पहायला मिळाले आहे. तर एकतर्फी प्रेम आणि लग्नास नकार दिल्याने अनेकांनी मुलींना सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्याचे प्रमाण देखील वाढते असल्याचे खात्यातून बोलले जात आहे. त्यामुळे, पाल्यांनी आपल्या पाल्यांकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक विचारसारणी असणार्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे.