अकोल्यात सर्वांत उच्चांकी आकडा 308 पॉझिटीव्ह, तर दोन मयत.! संगमनेरात 121 रुग्ण पॉझिटीव्ह.!


सार्वभौम (अकोले) :-

                      नगर जिल्ह्यात कोविडने थौमान घेतले आहे. रोज तीन हजार पेक्षा जास्त संख्या पॉझिटीव्ह येत असून जिह्यातील ऑक्सिजनसाठी, रेमडिसीवीर आणि बेड देखील मिळत नाही. आज संगमनेरात 121 रुग्ण मिळून आले असून बर्‍यापैकी संख्या घटल्याचे दिसते आहे. तर अकोले तालुक्यात 308 रुग्णांची भर पडली आहे. आज संपुर्ण जिल्ह्यात 3 हजार 493 रुग्ण मिळून आले आहेत. मात्र, या सगळ्या भयवाह वातावरणात एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती अशी की, आज एकाच दिवशी 3 हजार 553 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे तर 24 हजार 203 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अकोले आणि संगमनेरचा विचार करता संगमनेरात पॉझिटीव्हचे प्रमाण कमी होत चालले असून अकोल्यात दुपटीने संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे, हे एक फार मोठी चिंतेची बाब ठरत आहे. तुलनेत अकोल्यात फारशा सेवा सुविधा नसून प्रशासन आता कितपत तोंड देणार आहे. तरी देखील काल डॉ. किरण लहामटे, सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले, माधवराव तिटमे, डॉ. अजित नवले, महेश नवले, तहसिलदार मुकेश कांबळे, डॉ. इंद्रजित गंभीरे, डॉ. श्यामकांत शेटे, मंडल अधिकारी दातखिळे तात्या, सुरेश गडाख, संपत नाईकवाडी, सुरेश खांडगे, मच्छिंद्र धुमाळ, नितीन नाईकवाडी यांच्यासह अनेक नेत्यांनी बैठक घेऊन काही उपायोजना मांडल्या आहेत. त्या दृष्टीने आता तालुक्याने वाट काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांनी तालुक्याला फार मोठा मदतीचा हात दिला आहे. 

अकोले तालुक्यात आज 308 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. त्यात विरगाव येथे 21, 55 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 38 वर्षीय महिला, शिवाजीनगर 18 तर धुमाळवाडी 19 वर्षीय मुलगा, धुमाळवाडी येथे 40, 65 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगा, 68 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारी येथे 55 वर्षीय पुरुष, 50, 29 वर्षीय महिला, समशेरपूर येथे 43, 87, 21, 45, 50, 43, 28, 43, 65, 73, 67, 30, 52, 21, 29 वर्षीय पुरुष, 65, 32, 40, 21, 46, 80, 70, 37, 22, 31, 18, 34, 45, 64, वर्षीय महिला, 16, 13, वर्षीय तरुणी, 15 व 18 वर्षीय तरुण, 3 व 2 वर्षीय बालिका, मुथाळणे येथे 16, 14 वर्षीय तरुण, 5 वर्षीय बालिका, 9 वर्षीय बालक, घोडसरवाडी येथे 20 वर्षीय पुरुष, मुथाळणे 35, 60 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, येथे 40 वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे 68, 36 वर्षीय पुरुष, केळी रुम्हणवाडी येथे 30 वर्षीय महिला, सावरगाव पाट 40 वर्षीय महिला, कारंडी 3 वर्षीय बालिका, 60 35, 55, वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, जांभळे येथे 16 व 12 वर्षीय तरुण, खामुंडी (ब्राम्हणवाडा) 21 वर्षीय तरुणी, ब्राम्हणवाडा येथे 25 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय तरुण, जाचकवाडी येथे 56 व 58, 32 वर्षीय महिला, चास 32 वर्षीय महिला, घोडसरवाडी 55 वर्षीय महिला, कोंभाळणे 55 वर्षीय महिला, तामकरवाडी येथे 12 वर्षीय तरुणी, 9 वर्षाचा बालक, खिरविरे येथे 40 वर्षीय पुरुष, गणोरे येथे 37, 39 वर्षीय पुरुष, पागीरवाडी येथे 26 वर्षीय महिला, देवठाण येथे 17 वर्षीय तरुण, केळी येथे 30, 27 वर्षीय पुरुष, 40, 22 वर्षींय महिला, सोनेवाडी (देवठाण) येथे 48 वर्षीय पुरुष, सांगवी 23 वर्षीय तरूण, टाहाकारी 21 वर्षीय तरुण.

राजूर येथे येथे 38, 30, 28, 59, 51, 45, 50, 49, 39, 50, 56, 40, 29, 28, 38, वर्षीय पुरुष, 18, 30, 58, 46, 65, 25, 50, 32, 46, 42, 55, 32, 35, 68, 26, 47, 33, 35 वर्षीय महिला, 15, 9, 18 वर्षीय तरुणी, 5, 6, 5 वर्षीची मुलगी, 18, 19 वर्षीय तरूण, कटलापूर (शेंडी) 55, 20, 55 वर्षीय महिला, येथे 26, 35, 30, 62, 25 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुणी, तेरूंगण येथे 34 वर्षीय पुरुष, शिरपुंजे 45 वर्षीय महिला, 32, 50 वर्षीय पुरुष, केळुंगण येथे 26 वर्षीय पुरुष, सावरखुटे येथे 40 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, धामनवन येथे 41, 28 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 59 वर्षीय पुरुष, शेंडी येथे 40 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला, रंधा येथे 26 वर्षीय महिला, भोजदरी येथे 32 वर्षीय महिला, वाघदरी येथे 55, 33 वर्षीय पुरुष, पेंडशेत (राजूर) येथे 65 वर्षीय पुरुष, वांजुळशेत येथे 23 वर्षीय महिला, घोटी (कोहणे) येथे 40 वर्षीय पुरुष, लव्हाळी येथे 60 वर्षीय पुरुष, कोतुळ 55, 28 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका,

 शिळवंडी येथे 68 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, मवेशी 19 वर्षीय तरुण, अकोले शहरात 46, 33, 27, 32, 49, 24, 45, 26, 46 वर्षीय महिला, 20, 28, 23, 32 वर्षीय तरूण, 65, 45, 37, 30, 62, 30 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरूणी, 2 वर्षाचा बालक, गर्दनी येथे 50, 47, 22 वर्षीय पुरुष, पिंपळगाव लाडगाव येथे 36 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, निब्रळ येथे 60 वर्षीय दोन महिला, 21 वर्षीय तरुण, टाकळी येथे 33 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी, मेहेंदुरी येथे 62 वर्षीय पुरुष, 60, 40 वर्षीय महिला, 12 वर्षीय तरुण, इंदोरी येथे 53 वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे 36, 46 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय महिला, म्हाळदेवी येथे 43, 70 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरूण, कळस येथे 60 वर्षीय महिला, नवलेवाडीत 45, 26, 28, 26, 51 वर्षीय महिला, 58, 62 वर्षीय पुरुष, 4 वर्षीचा बालक, गर्दनी 19 वर्षीय तरुण, 50 वर्षीय महिला, म्हाळादेवीत 68 वर्षीय महिला, पाडोशी येथे 62 वर्षीय पुरुष, तांभोळ येथे 42 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय तरुण, 70 वर्षीय महिला, कळस येथे 69 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, पैठण येथे 64 वर्षीय महिला, शेकेईवाडीत 70 वर्षीय दोन महिला, 52 वर्षीय महिला, विरगाव येथे 45 वर्षीय महिला, धामनगाव आवारीत 60 वर्षीय महिला.

 आंबड 15 वर्षीय तरुणी, 35 वर्षीय महिला, खानापूर येथे 21 वर्षीय तरूण, देवठाण येथे 52 वर्षीय पुरुष, लिंगदेव 29 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगा, 2 वर्षीय बालिका, ढोकरी येथे 49 वर्षीय पुरुष, अगस्ति पोष्ट अकोले 28 वर्षीय तरुण, आंबड येथे 50 वर्षीय महिला, विरगाव येथे 45 वर्षीय पुरुष, जांभळेत 65 वर्षीय महिला, सावरगाव पाट येथे 17 वर्षीय तरुण, इंदोरी येथे 31 वर्षीय पुरुष, भंडारदरा येथे 45 वर्षीय पुरुष, राजुरी येथे 34 वर्षीय महिला, काजीपुरा येथे 35 वर्षीय पुरुष, वाशेरे येथे 53 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 78 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 43 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर अकोले येथे 60 वर्षीय पुरुष, संभाजीनगर अकोले येथे 63 वर्षीय पुरूष, गणोरे येथे 29 वर्षीय पुरुष, राजूर येथे 30 वर्षीय पुरुष, रूंभोडी 37 वर्षीय पुरूष, कळस बु येथे 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, धामनगाव येथे 35 वर्षीय पुरुष, 56, 29 वर्षीय महिला, 4 वर्षीय बालक, कुंभेफळ येथे 65 वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे 27 वर्षीय पुरुष, आंभोळ येथे 52, 36 वर्षीय पुरुष

nbsp;इंदोरीत 21 वर्षीय तरूणी, कारखाना रोड शेटे मळा येते 26 वर्षीय तरुण, समशेरपूर येथे 46 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 35 वर्षीय पुरुष, शिळवंडी येथे 62 वर्षीय पुरुष, विठे येथे 74 वर्षीय पुरुष, धामनगाव आवारी येथे 18 वर्षीय तरुण, पांगरी येथे 70 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 55 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 61, 58 वर्षीय पुरूष, बिरेवाडीत येथे 21 वर्षीय तरूण, अकोले येथे 15 वर्षीय तरुणी, नवलेवाडीत 26 वर्षीय तरुण, रुंभोडी येथे 55 वर्षीय पुरुष, गर्दनी येथे 35 वर्षीय पुरुष, गोंदुशीत 60 वर्षीय महिला, लाडगाव राजूर येथे 66 वर्षीय महिला व पुरूष, उंचखडक बु येथे 33 वर्षीय पुरूष, रूंभोडीत 66 वर्षीय महिला, गणोरेत 24 वर्षीय तरूणी अशा 308 रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले आहेत. तर तालुक्यात 6 हजार 917 रुग्ण झाले असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. आज एकाच दिवशी मेहेंदुारचा एक व्यक्ती व सुगाव खु येथील एक माजी उपसरपंच यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

तालुक्यामध्ये कोविड पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन सर्वतोपरी नियोजन करत असूनही वाढत्या संख्येमुळे सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अकोले तालुका व्यापारी असोसिएशने चर्चा करून आज पासून येत्या बुधवारपर्यंत  संपूर्ण तालुक्यात कडक जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल व दुध वगळता सर्व दुकाने बंद राहील तरी नागरिकांनी बुधवार पर्यंत घरामध्ये थांबून सहकार्य करावे. ज्यांना काही लक्षणे जाणवत आहेत अथवा पेशंटच्या संपर्कातील तात्काळ चाचणी करून घ्यावी.

 - मुकेश कांबळे (तहसिलदार अकोले)