वा रं पठ्ठ्या.! अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्ण सोडून दारु वाहत होता.! ठोकल्या बेड्या.! अकोल्यात 3 मयत 106 रुग्ण, संगमनेरात 217 रुग्ण.!


सार्वभौम (अकोले) :- 

                     आज अकोले शहरातील तिघांचा मृत्यू झाला असून अन्य उपचार घेत आहेत. तर अकोले तालुक्यात आजवर 66 जणांनी कोरोनापुढे शरणागती पत्करली असून 3 हजार 430 व्यक्ती त्याच्याशी झुंज देत आहेत. तर तालुक्यात 6 हजार 554 रुग्ण आजवर बाधित झालेले आहेत. तर संगमनेर तालुक्यात आज 217 रुग्ण मिळून आले आहेत. तर मयतांची संख्या शंभरी गाठली आहे. मात्र, तरी देखील संगमनेरकर काही सावधानतेची भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळे, आता तरी प्रशासनापेक्षा नागरिकांनी कठोर निर्णय घेण्याची गरज भासत आहे. तर जिल्ह्यात आज एकाच दिवशी 3 हजार 790 रुग्णांना कोरोना झालेला आहे. तर अकोले तालुक्याला ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडून गेल्या दोन दिवसात 50 रेमडिसीवीर मिळाले आहेत तर त्यांच्या पाठोपाठ डॉ. किरण लहामटे यांनी देखील आज 40 रेमडीसीवीर उपलब्ध करुन दिले आहेत. या पलिकडे कोतुळसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स लोकार्पन केली आहे. अकोले संगमनेरात अ‍ॅक्सिजनचा साठी काहीचा पुरता झाला असला तरी बेड आणि रेमडिसीवीरचा अद्याप फार मोठा तुटवडा जाणवत आहे. 

  आज दि. 23 एप्रिल 2021 रोजी अकोले तालुक्यात 106 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात इंदोरी येथे 48, 52 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 19 वर्षीय तरुण, 46 वर्षीय पुरुष, विरगाव येथे 26 वर्षीय तरुणी, 60 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 30, 54 वर्षीय पुरुष, वारंघुशी येथे 27 व 16 वर्षीय तरुण, टिवी येथे 45 वर्षीय पुरुष, शेणीत येथे 26 वर्षीय तरुणी, 31 वर्षीय पुरूष, राजूर येथे 21 वर्षीय तरुणी, शेरणखेल येथे 35 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, तांभोळ येथे 55 वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे 50, 45, 34, 29, वर्षीय पुरुष, केळी रुम्हणवाडी येथे 60 वर्षीय महिला, मवेशी येथे 57 वर्षीय पुरुष, वांजुळशेत येथे 55 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 36 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालिका, पिंपळगाव खांड येथे 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालक, पांगरी येथे 55 वर्षीय महिला, पाडाळणे येथे 70 वर्षीय पुरुष, कळस येथे 6 व 12 वर्षीय बालिका, अकोले येथे 39 वर्षीय महिला, 33, 55, 30 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 55 वर्षीय पुरुष, कोहंडी येथे 50 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 59, 46 वर्षीय पुरुष, 35, 12, 73, 35, 70,वर्षीय महिला, टहाकारी येथे 52, 25 वर्षीय महिला,  खिरविरे येथे 42 वर्षीय पुरुष,

  देवठाण येथे 20 वर्षीय तरुण, हिवरे येथे 26 वर्षीय तरुण, कोंभाळणे येथे 35, 75 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय तरुणी, मुथाळणे येथे 41 वर्षीय पुरुष, केळी येथे 53 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, इंदोरी येथे 65 वर्षीय पुरुष, शेकेईवाडी येथे 27 वर्षीय तरुणी, अकोले शहरात 19 वर्षीय तरुणी, ढोकरी येथे 14 वर्षीय बालक, अकोले शहरात 24 वर्षीय तरुण, मेहेंदुरी 46 वर्षीय पुरुष, पिंपळगाव येथे 51 वर्षींय पुरुष, आंबड येथे 65 वर्षीय महिला, बहिरवाडी येथे 43 वर्षीय महिला, विरगाव येथे 68 वर्षीय पुरुष, कळस येथे 29 वर्षीय पुरुष, अकोले शहर येथे 72 वर्षीय पुरुष, रेडे येथे 66 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 30, 35 वर्षीय पुरुष, अकोले शहर येथे 19 वर्षीय तरुणी, उंचखडक बु येथे 54 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथे 45 वर्षीय महिला,

  धुमाळवाडी येथे 17 व 26 वर्षीय तरुण, 48 वर्षीय महिला,  कळस येथे 58 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुण, खाणापूर येथे 32 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, कुंभेफळ येथे 45 वर्षीय तरुण, नवलेवाडी येथे 65 वर्षीय महिला, अकोले येथे 54, 62 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुण, 42 वर्षीय महिला, कळस येथे 54 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 18 वर्षीय तरुण, पिंपळगाव येथे 31 वर्षीय तरुण, सुगाव येथे 70 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 53 वर्षीय पुरुष, शेकेईवाडी येथे 38 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय पुरूष, आंबड येथे 28 वषीय तरुण, कुंभेफळ येथे 40 वर्षीय पुरुष, राजूर येथे 37 वर्षीय पुरुष, अकोले शहालगत येथे 54 वर्षीय पुरुष, कळस बु येथे 58 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, टाहाकारी येथे 25 वर्षीय तरुण, समशेरपूर येथे 36 वर्षीय महिला कोरोनाने बाधित झाल्या आहेत.

 आज कोरोनाची साखळी दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर व ऑक्सिजनचा अभाव आहे. यातच अकोले तालुक्यातील आढळा परिसर हा खूप महत्त्वाचा विभाग आहे. ह्या परिसरात एकही कोविड सेंटर नाही तसेच ऑक्सिजन बेडची उपलब्धता नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून ही भयानक परिस्थिती पाहून अकोले तालुक्याचे मा.आमदार वैभवराव पिचड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आनंदगड शैक्षणिक संकुल वीरगावचे संस्थापक तसेच अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन मा.रावसाहेब वाकचौरे यांनी तातडीने समशेरपुर परिसरात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत समशेरपूर येथे दहा ऑक्सिजन बेड व रुग्णांच्या सेवेसाठी कोविड सेंटर (विलगिकरण कक्ष) तात्काळ उभे करण्याची व्यवस्था केली व कामास तातडीने सुरुवातही झाली.

एकीकडे लोक कोरोना बचावापासून हात धुवा असे सांगत आहे. तर दुसरीकडे काही समाजकंठक वेगळ्याच पद्धतीने हात धुताना दिसत आहे. पुर्वी आपण पाहिले होते की, शेतमालाच्या नावाखाली काही लोक गोमांसची वाहतूक करीत होते. तर वेगवेळ्या अत्यावश्यक सेवा वाहनांतून गोवा, गुटखा, तांबाखू तर काही ठिकाणी गांजा देखील वाहण्याचा प्रयत्न झाला. असाच आणखी एक निंदनिय प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहेे. संगमनेर शहरातील बस स्थानक परिसरात शुक्रवार दि. 23 रोजी 10:30 वाजण्याच्या सुमारास एका रुग्णवाहीकेतून चक्क रुग्णांच्या ऐवजी दारुचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी विजय खंडू फड (रा. साई दर्शन कॉलनी, मालदड रोड, संगमनेर), कैलास छबुराव नागरे (रा. शेंडगाव, ता. संगमनेर) तर गाडी चालक अक्षय अशा तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 23 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले आहेत.