अजब प्रेम की गजब कहाणी, रिलेशनला नकार दिला म्हणून त्याने प्रेयसिची नग्न व्हिडिओ व्हायरल करत अश्लिल फोटो गावात टाकली.! अकोल्यातील प्रकार.!

 सार्वभौम (अकोले) :-

                   अजब प्रेम की गजब कहाणी या रणबीर कपुरच्या चित्रपटापेक्षाही भयानक कहाणी अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे पहायला मिळाले आहे. आपल्या प्रियकरानेच प्रेयसिचे अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल केली. तर काही नग्न फोटो सार्वजानिक ठिकाणी तसेच मंदिर परिसरात नग्न अवस्थेतील फोटो  टाकून दिले. यामागे आपली प्रेयसी बदनाम कशी होईल, तिची समाजात आब्रु कशी जाईल अशी धारणा ठेऊन हा माणुसकीला लाजवेल असा प्रकार करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित आदिवासी तरुणीने अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यात चंद्रशेखर आनंदा कोटकर (रा. कुंभेफळ, ता. अकोले) यास पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रशेखर कोटकर याने एका तरुणीवर प्रेमाचे नाटक केले होते. याचा अशा प्रकारच्या निर्लज्ज हरकती आणि विकृत वागणे यामुळे त्याच्या प्रेयसिना त्याच्याशी रिलेशन ठेवण्यास नकार दिला होता. यात दोघांची जात विभिन्न असून त्यास समाजमान्यता नाही. त्यामुळे, आरोपी याच्याकडून नेहमी चुकीचे वागणे बोलणे होत होते. हा प्रकार पीडित मुलीच्या घरच्यांना देखील माहित झाला होता. त्यामुळे, पीडित मुलीसह तीच्या घरच्यांना बदनाम करण्यासाठी कोटकर याने एक विकृत जालीम उपाय शोधला.

आरोपी कोटकर व पीडित तरुणी यांच्यात प्रेम संबंध होते. या दरम्यान संबंधित तरुणीने तिच्याच मोबाईलमध्ये काही अश्लिल फोटे काढले होते. तर काही व्हिडिओ देखील होते. हे आरोपी तथा तिचा प्रियकर यास माहित होते. त्याने तिच्या अपरोक्त तिचा मोबाईल घेतला आणि त्यातील कार्ड काढून घेत ते फोटो व व्हिडिओ स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. हा विकृत व्यक्ती येथेच थांबला नाही तर त्याने आपल्या प्रेयसिच्या मोबाईलमध्ये जे काही तिच्या मित्र, मैत्रीण व नातेवाईक यांचे मोबाईल नंबर होते, त्यांच्या मोबाईलवर ते सेंड केले आणि तिचा मोबाईल देऊन टाकला.

दरम्यान, दि. 16 एप्रिल 2021 रोजी रात्री 8:30 वाजता व दि. 21 एप्रिल 2021 रोजी सकाळी 6 वाजता गारवाडी गावात आरोपी याने सार्वजानिक ठिकाणी तसेच मंदिर परिसरात आपल्या प्रेयसिचे डेव्हलप केलेले नग्न आवस्थेतील फोटो टाकून तिची बदनामी केली आहे. हा प्रकार सकाळी पीडितेच्या कुटुंबातील लोकांना समजला असता त्यांनी घडला प्रकार थेट पोलीस ठाण्यात येऊन कथन केला आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभय परमार व पोलीस उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांनी गुन्हा दाखल होताच आरोपी चंद्रशेखर आनंदा कोटकर याला अटक केली आहे. या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी लागल्यामुळे संबंधित गुन्हा हा पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्याकडे वर्ग झाला आहे.

दरम्यान, अशा प्रकारची विकृत कृती लक्षात घेता प्रेम करणार्‍या आणि आपला साथीदार चॉईस करणार्‍या व्यक्तींना त्याचे भान ठेवले पाहिजे. जे आयुष्य उध्वस्त करते, जे बदनामी करते, जे प्रेमाचा आदर करु शकत नाही, चुकीच्या कृतीनंतर परिणामांचा विचार करु शकत नाही तो व्यक्ती तुम्ही साथिदार म्हणून निवडला तर काय होते. याची प्रचिती आपल्या समोर आहे. यात प्रियकराला बेड्या ठोकल्या आणि प्रियसिचे आयुष्य उध्वस्त झाले, दोन्ही कुटुंब अस्वस्थ आणि अस्थिर झाले मग याला प्रेम तरी कसे म्हणता येईल? असा प्रश्न समुपदेशक यांनी उपस्थित केला आहे.