आहो.! पोलिस दादा किमान एखाद्या गुन्ह्याचा तरी शोध लावा.! कुंभेफळात त्याने घरात येऊन पायजम्यातून पैसे चोरले.!

सार्वभौम (अकोले) :- 

                   अकोले तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण आजकाल फारच वाढले आहे. मात्र, वर राजुरचे आरोपी सापडतात, शेजारी संगमनेरात आरोपी सापडतात मात्र, मध्ये अकोल्यातच का एखादा चॅलेंजींग गुन्हा ओपन होत नाही? असा प्रश्न आता अकोले तालुक्यातील जनतेला पडला आहे. या पोलीस ठाण्यात पोलिस चोरट्यांना मदत करीत असल्याची धक्कादाक माहिती समोर आली होती. त्यात चौघांचे निलंबन देखील झाले. मात्र, ज्याचे निलंबन झाले त्याने कुरापती काढून बाकीच्यांना कामाला लावले. म्हणजे, माझीही रांडकी आणि तुझीही रांडकी अशा प्रकारची मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय येथे येतो. सध्या शहरात काही राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताने अवैध धंदे संगमनेर प्रमाणे दामदुपटीत सुरू आहे. मात्र, कारवाई? त्याचे नाव देखील काढायचे नाही. आहो.! किमान एखाद्या गुन्ह्याचा तरी तपास करा. अशा प्रकारची साद आता नागरिक करू लागले आहेत. कुंभेफळ सारख्या गावाने तर पोलिसांना हतबल होऊ एक निवेदन दिले आहे. की, गेल्या दोन वर्षात प्रचंड चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्याची सखोल चौकशी करुन चोरांच्या मुसक्या आवळाव्यात. मात्र, पोलिसांकडून गावाला कोण्याही प्रकारचा प्रतिसाद नाही.

तुम्हाला आठवत असेल की, याच कुंभेफळ येथे काही चोरट्यांनी तुंबारे कुटुंब कोरोना पॉझिटीव्ह असल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी लक्ष ठेऊन डाव साधत या शिक्षकाच्या घरावर डल्ला मारला होता. यात तब्बल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोने व पंन्नासहजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही घटना सोमवार दि. 31 ऑगस्ट ते शनिवार दि. 5 सप्टेंबर 2020 या दरम्यान घडली होती. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचे काय झाले? तो तपास आजुनही कायम तपासावर आहे. त्यानंतर देखील येथेच काही गुन्हे घडले झाले काय? शेवटी गावाला एक होऊन पहारा द्यावा लागला आणि पोलिसांनो.! किमान जे गुन्हे घडले त्याचा तरी शोध लावा अशी निवेदनानिशी मागणी करावी लागली. आता यापेक्षा काय दुरदैव म्हणावे लागेल.

आता याच परिसरात पुन्हा मुरलीधर गोडाजी पांडे (रा. कुंभेफळ, ता. अकोले) यांच्या घरात शेखर प्रकाश कोटकर या त्यांच्या शेजार्‍याने शनिवार दि. 6 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास टिव्ही चालु करण्याचा बहाणा करुन घरात प्रवेश केला. त्यावेळी पांडे कुटुंब हे जेवण करीत होते. त्या एकांताचा फायदा घेत कोटकर याना पांडे यांच्या पायजम्याच्या खिशात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 62 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून नेला. त्यानंतर पांडे यांचे जेवण झाले आणि कालांतराने त्यांनी पायजमा तपासला असता त्यात ठेवलेली रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून आले नाही. त्यावेळी त्यांनी घराच चौकशी केली. मात्र, घरातील कोणीही त्यांना संशयाच्या भोवर्‍यात सापडले नाही. त्यानंतर मात्र, हा प्रकार कोणत्या कालावधित झाला याची शहनिशा केली असता हा डल्ला शेखर यानेच मारला अशी त्यांची खात्री झाली आणि पांडे यांनी थेट पोलीस ठाणे गाठवून फिर्याद दाखल केली आहे.

आता कौटुंबिक गुन्हे आणि मारामार्‍या हे पोलीस ठाण्याच्या हाद्दीत होणे साहजिक आहे. मात्र, प्रोफेशनल गुन्हे आणि चोर्‍या दरोडे हे मात्र, पोलिसांचे अपयश आहे. जर असे प्रकार घडले तरी किमान त्यातील काही गुन्ह्यांचा तरी शोध लागणे अपेक्षित असते. मात्र, गुन्हे दाखल होतच आहे आणि कायम तपास सुरूच आहे. यावर मात्र तालुक्यातील जनता फार नाराज असल्याचे दिसून येते. राजुरमध्ये नितीन पाटील होते तेव्हा त्यांनी जाताजाता फार सर्वोत्तम कामगिरी केली. तर तत्कालीन पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे हे फार सरळ असल्यामुळे त्यांचे येथे कोणाशी सुत बसले नाही. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभय परमार यांची ऐन्ट्री झाली. मात्र, त्यांच्या काळात अद्याप कोणत्याही प्रकारची उत्तम कामगिरी दिसून आली नाही. उलट आता गावागावातून निवेदने येऊ लागले आहेत की, साहेब.! ज्या चोर्‍या होत आहेत. त्यांचा तपास तरी लावा. त्यामुळे, त्यांची कार्यपद्धती सरळ आणि साधी असली तरी त्यांच्या हाताखाली जे काही कर्मचारी आहेत. त्यांचे जे काही मलिदे जमा करण्याचे काम ते उत्तम पद्धतीने राबवत आहेत. तसे एखादी उत्तम कामगिरी देखील त्यांच्याकडून आता अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.