तुझ्या मामासारखी गाडी आणि चांगले फर्निचर आण म्हणत पत्नीचा छळ, अशक्य असल्याने तिने केली आत्महत्या.! संगमनेर अकोल्याच्या चौघांवर गुन्हे.!
सार्वभौम (अकोले) :-
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्यांनी मुलीच्या मामाकडे जशी अलिशान गाडी आहे. तशी माहेरहून घेऊन ये, तसेच चांगल्या प्रतिचे फर्निचर आण असे म्हणत नवरीकडे मागणी केली होती. मात्र, ते देणे शक्य नसल्यामुळे मुलीने थेट आत्महत्येचा निर्णय घेत आपली जिवणयात्रा संपविली आहे. हा प्रकार अडिच वर्षापासून ते सोमवार दि. 22 मार्च 2021 या दरम्यान घडली. या मागणीचा अतिरेख झाल्यामुळे मुलीने सोमवारी गळफास घेऊन आपल्या जिवणाला पुर्णविराम दिला आहे. यात नूरेन नबाब इनामदार (वय 23, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर अलमास सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकोले व संगमनेर येथे राहणार्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नूरेन या तरुणीचा विवाह सन 2018 साली विवाह झाला होता. तिला कोल्हेवाडी येथे इनामदार यांच्या घरात दिले होते. काही दिवस नूरेन यांचा संसार चांगला चालला होता. मात्र, काही दिवसानंतर तिच्या सासरच्यांच्या डोक्यात भलतेच खुळ भरले. यात आरोपी रियाज नबाब इनामदार व राशद नबाब इनामदार (दोघे रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) या दोघांनी मिळून तिला शारिरीक व मानसिक त्रास देणे सुरू केले. नूरेन हिच्या बाबत इनामदार यांचे मत होते की, तुझ्या घरच्यांनी जे काही फर्निचर दिले आहे. ते हलक्या प्रतिचे आहे. ते चांगल्या दर्जाचे घेऊन ये.
तसेच आरोपी यांचे मत होते की, नूरेन हिचा मामा अगदी अलिशान गाडीत फिरतो आहे. तु देखील तुझ्या माहेरहून एक कार घेऊन ये. ही मागणी आरोपी यांनी गेल्या दोन अडिच महिन्यात वारंवार करण्यात आली होती. मात्र, मामाकडे जरी गाडी असली तरी नूरेन हिच्या घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे, तिने माहेरच्यांना त्रास नको म्हणून वारंवार घडनारे प्रकार आपल्या पोटात दाबून ठेवले. मात्र, आई वडिल आणि नातेवाईकांना त्रास दिला नाही. मात्र, 2021 च्या काळात सासरचा छळ वाढत गेला आणि तिच्या मनात थेट आत्महत्येचे विचार येऊ लागले.
दरम्यान, हा सर्व प्रकार घडत असताना आरोपी मुमताज पठाण (रा. समशेरपुर, ता. अकोले) व इब्राहिम उर्फ बालम शेख (रा. मालदड रोड, ता. संगमनेर) यांनी आरोपी रियाज नबाब इनामदार व राशद नबाब इनामदार (दोघे रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) या दोघांना नूरेन हिच्या माहेरकडून गाडी आणि फर्निचर आणण्यासाठी या दोघांना वारंवर प्रेरीत केले म्हणून हे तिच्याकडे या वस्तू मागत राहिले. हा प्रकार 22 मार्च 2021 रोजी होईजड झाल्यामुळे नूरेन इनामदार यांनी त्याच्या राहत्या घरात कोल्हेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार काही काळात उघड झाला असता तिला खाली उतरवून दवाखाण्यात आणले गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह अन्य अधिकार्यांनी घडनास्थळी धाव घेतली. यावेळी, मुलीचे नातेवाईक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी मुलीच्या सासरच्यांवर काही धक्कादायक आरोप केले होते. जोवर त्यांच्यावर कारवाई होत नाही तोवर मुलीवर अंत्यसंस्कार होणार नाही अशा प्रकारची भूमीका घेण्यात आली होती. मात्र, नंतर पीएम रिपोर्ट आल्यानंतर कायदेशीर दृष्ट्या हा गळफास असल्याचे सिद्ध झाले आणि त्यानंतर सायंकाळी नूरेन यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकोले व संगमनेरच्या चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.