भाजपचे राष्ट्रवादीला एकाच दिवशी दोन झटके.! तालुका अध्यक्षांच्या गावात भाजपच्या दोन-दोन शाखा.! डॉ. लहामटेंना मतदान करणारेही भाजपत दाखल.!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                          अकोले विधानसभेला जेव्हा आ. डॉक्टर किरण लहामटे हे एकटे होते. तेव्हा सगळी जनता त्यांच्यापाठी एकवटली होती. आता मात्र, तालुक्यात भलतेच चित्र पहायला मिळत आहे. जेथे भाजप नको म्हणणारे तरुण गाड्याच्या गाड्या भरुन वैभव पिचड यांना भेटण्यासाठी येऊ लागले आहेत. तर राष्ट्रवादी पक्षाला लाजवेल असा धडाकेबाज उपक्रम चक्क टाकळीच्या तरुणींनी राबविला आहे. तो असा की, थेट राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्यात गावात शेकडो तरुणांनी आणि गावकर्‍यांनी भाजपची पहिली शाखा टाकळी गावात उभारली आहे. हा उपक्रम येथेच थांबला नाही तर याच टाकळी गावात अगदी एका वांदरवाडीत देखील दुसर्‍या शाखेचा उद्धटन केले आहे. त्यामुळे, या गावात किती मोठी सुप्त लाट आहे. याचे दर्शन पिचड यांच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीतून पहायला मिळाली आहे. म्हणजे त्या गावात राष्ट्रवादीचे कोणी आहे की नाही? असा प्रश्न तालुक्यातील जनकारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, तालुका संभाळण्याची जबाबदारी असणार्‍या तिकांडे यांना गाव संभाळताना ग्रामपंचायतीत नाकीनव आला आणि जनता संभाळताना आज जे काही या गावात झाले हे पाहिल्यानंतर त्यांच्यापाठी असणारा जनाधार देखील सिद्ध होऊ लागला आहे.

खरंतर जनतेला 40 वर्षानंतर एकदा परिवर्तन हवे होते. ते आता झाले, जनता काही पुढार्‍यांवर नाराज होती, ती लोक देखील चालते झाले. आता उरले कोण? तर जनता आणि थेट नेता अर्थातच पिचड. त्यामुळे, ज्या तरूणांना राजकारणात इच्छा असून संधी नव्हती त्यांना आता खुले आभाळ झाले आहे. त्याचीच प्रचिती आज टाकळी गावात पहायला मिळाली आहे. खरंतर ग्रामपंचायतीला टाकळीत भानुदास तिकांडे यांचा पराभव झाला होता. मात्र, तरी देखील त्यांनी राजकीय गणिते वापरुन विरोधकांचा एक उमेदवार फोडला आणि टाकळीत सत्ता स्थापन केली. त्याचा परिणाम झाला काय? तर एकमेकांच्या डोक्यात खुर्च्या मारामारी झाली, काही काळ टाकळीत अराजकता पसरली आणि खुद्द पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी जाऊन त्यावर पडदा टाकला. तिकांडे यांनी कशी का होईना सत्ता राखली. मात्र, त्यांच्या या राजकीय डावपेचाने त्यांच्यावर तालुक्यातून फार मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले. कालांतराने या घटनेचा अधिक उद्रेख झाला आणि नंतर जो फुटला त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. हे कशाचे द्योतक आहे. हे आता तालुक्याला नव्याने सांगण्याची गरज नाही.

खरंतर, जशी तिकांडे यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, तसे त्यांना त्यांच्या पक्षातील लोकांनी कधी सुखाचे दिवस येऊ दिले नाही. मात्र, सुप्रिया ताईंच्या आशिर्वादाने लादलेला तालुकाध्यक्ष अशा प्रकारची टिका त्यांच्यावर वारंवार होत राहिली. इतकेच काय! राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अक्षरश: अजित दादा यांना पत्र पाठविले, त्यांची वेळ देखील मागितली. मात्र, मधल्या काळात काही व्यक्तींचे पुनर्वसन झाले आणि तो विषय मागे पडून गेला. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, गेल्या दोन महिन्यांपुर्वी तिकांडे यांना पदाहून काढावे यासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे एक शिष्ठमंडळ थेट मुंबईत स्वखर्चाने दाखल झाले. त्यांनी सुप्रिया ताईंच्या समोर आपले गार्‍हाणे मांडले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा काळ आणि जिल्हाबँक असे राजकीय बदल होत गेले. या व्यतिरिक्त डॉ. किरण लहामटे यांच्याकडे हाच विषय अगदी वारंवार उगळून-उगळून त्याचा चोथा झाला आहे. मात्र, ज्या सुप्रिया ताईंनी विधानसभेच्या वेळी तालुक्यात पाय देखील ठेवला नाही तरी साहेब म्हणून त्यांचा आदर राखीत त्यावर पांघरुन पडले. तर जयंत पाटील यांनी देखील अकोल्यात आल्यानंतर आढावा घेताना तालुकाध्यक्षांच्या अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या अंतर्गत गटबाजीच्या तक्रारी आजही वाढत्याच आहे.

आज तर तालुक्यात एक वेगळाच इतिहास घडून गेला. ज्या वैभव पिचड यांनी भाजपत आल्यानंतर एकही शाखेचे उद्घटन केले नव्हते, त्याच पिचडांनी खुद्द राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांच्या गावात त्यांनाच आव्हान दिले आहे. याच टाकळी गावात एक ना दोन चक्क वाडी वस्तीवर देखील भाजपची शाखा उघडली आहे. बरं तुम्हाला वाटेल की, यांच्यामागे आहे तरी कोण? तर जेव्हा त्या रॅलीला गर्दी पाहिली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या. हा खरंतर सुप्त लाटेचा प्रकार आहे. त्यामुळे, खरोखर पिचड यांना सहानुभूती मिळते आहे. याचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. त्याची सुरूवात टाकळीतून म्हणजे तालुकाध्यक्षांच्या गावातून झाल्याने आत तालुकाभर हा विषय चर्चेचा ठरला आहे. तर ये तो अभी झाँकी हैं.! पिक्चर अभी बाकी हैं, वैभव पिचड तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.! या आवाजाने आज टाकळी दुमदुमून गेली होती.

आता राहिला प्रश्न भरितकर यांचा. तर तो फोटो काल सोशल मीडियात फिरविण्यासाठी एक वेगळी यंत्रणा कार्यरत होती. कोणी म्हणत होते तो 16 मार्च 2021 चा आहे, तर कोणी म्हणत होते तो फोटो जुना आहे. खरंतर राष्ट्रवादीच्याच तरुणांनी हा फोटो सर्वाधिक शेअर केला. मात्र, त्यांनी याचे आत्मचिंतन केले नाही की, 16 तारखेला राष्ट्रवादीत आलेला ज्येष्ठ नेता 21 तारखेला पुन्हा भाजपत जातो. यात आपण कोठे कमी पडलो? म्हणजे स्वत:चे अपयश मान्य करण्यापेक्षा तो व्यक्ती पुन्हा गेला याचा त्यांनी फार बाऊ केल्याचे पहायला मिळते आहे. म्हणून तर असे म्हटले जाते की, राष्ट्रवादीत आता वैचारिक आणि आत्मचिंतन करणारी मंडळी कमी आणि उताविळ व वशीलेबाजी करून पदावर विराजमान झालेले नेते फार झाले आहेत. आता गायकर पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीला एक संयमी नेता लाभला आहे. तर डॉक्टर लहामटे व अशोक भांगरे हे देखील त्याचे काम जोमाने करीत आहेत. यात येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कोणाचे पारडे जड भरेल. हेच येणार्‍या विधानसभेचा निकाल सांगून जाईल. दरम्यान टाकळीत या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फोटोग्राफर संदिप दातखिळे, संतोष तिकांडे यांच्यासह अनेकांनी मोठी परिश्रम घेतले आहे.


पुढील आमदार भाजपचाच.!

वैभव पिचड यांना बीजेपीने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे, ते त्यास सार्थ ठरत आहे. गेल्या विधानसभेला वेगळा माहोल होता, आज मात्र, फार सकारात्मक वातावरण आहे. जे लोक गेले ते स्वार्थापोटी गेले. त्यांना जायचे होते ते आमदारकी होण्यापुर्वीच का गेले नाही. जर पिचड आमदार झाले असते तर हे लोक गेले असते का? किंवा भाजपचे सरकार आले असते तर गेले असते का? हेे जनतेला विशेषत: तरुणांना कळून चुकले आहे. त्यामुळे, पिचड यांना सहानुभूती मिळत आहे. कारण, गेल्या निवडणुकीत ज्यांनी आमदार लहामटे यांना मतदान केले तेच तरुण आता पिचड यांच्याकडे आले आहेत. तर जाणारे गेल्याने तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. येणार्‍या काळात तालुक्यात भाजपचा आमदार असेल यात तिळमात्र शंका नाही.

- जालिंदर वाकचौरे (भाजप गटनेते, झेडपी)