प्रियकराने प्रेयसिच्या भावी नवर्‍याला फोटे टाकून लग्न मोडले.! मग काय.! त्याची ना तुझी तीने आत्महत्या करीत आयुष्य संपून टाकले.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                    संगमनेर खुर्द येथे राहणार्‍या दोघा प्रियकराने त्याचा विकृतीचे दर्शन घडविले आहे. ते असे की, दोघांचे प्रेम संपल्यानंतर जेव्हा मुलीला पाहुणे पहायला येत होते तेव्हा या प्रेयकराने आपल्या प्रेयसिला जो मुलगा पहायला आला होता त्यालाच काही फोटो पाठवून लग्न मोडून टाकले. तेव्हा पहायला आलेल्या मुलाने लग्नास नकार दिला त्यानंतर मात्र मुलीने टोकाचे पाऊल उचलत थेट गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरूवार दि. 18 मार्च 2021 रोजी 10 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात श्रीराम राजा लोखंडे (रा. संगमनेर खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यास पोलिसांनी अटक देखील केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर खुर्द परिसरात राहणारा लोखंडे आणि त्याच परिसरात राहणार्‍या एका तरूणीचे प्रेम प्रकरण सुरू होते. या दरम्यान, या दोघांनी काही फोटो शुट केले होते. मात्र, हे फोटो काढताना येणार्‍या काळात अशा प्रकारे आपल्याला अडचणी येतील असा कोणताही लवलेश दोघांच्या मनात नव्हता. त्यानंतर काही काळ यांच्यातील प्रेम संबंध टिकून राहिले. मात्र, कालांतराने मुलीच्या घरच्यांनी तिचा विवाह करुन देण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात तिला काही स्थळ देखील आले. त्याचीच जुळवाजुळव सुरू असताना आपल्या प्रेयसिचा विवाह होणे हे लोखंडे यास मान्य नव्हते.

दरम्यान, मयत तरुणीला एक स्थळ आले होते. त्यांच्यात लग्नाची बोलणी सुरू होती. मात्र, जेव्हा हा प्रकार श्रीराम लोखंडे यास समजला तेव्हा मात्र त्याने आपल्या प्रेयसिचा जेथे विवाह ठरणार होता. त्या मुलाचा शोध घेतला आणि त्याने जेव्हा कधी हिच्यासोबत मोबाईलमध्ये फोटो काढले होते. ते थेट तिच्या होणार्‍या नवर्‍याला टाकून दिले. त्यानंतर संबंधित मुलाने मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार त्यांना कथन केला. त्यानंतर तिच्या घरच्यांची मनस्थिती प्रचंड हालाकीची झाली. हे पाहून मुलीला देखील प्रचंड दु:ख झाले.

दरम्यान, काही काळ गेल्यानंतर मुलीच्या मनात जे काही द्वंद्व सुरू होते. ते तिने मनातच ठेवले. ज्याच्यावर प्रेम केले त्याने अशा पद्धतीने आपला घात केला याचे शल्य तिच्या मनात कायम बोचत होते. त्यामुळे, मनात विचारांचे प्रचंड काहूर माजले आणि अवघ्या 20 वर्षाच्या तरुणीने स्वत:च्या जिवणाला पुर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गुरूवार दि. 18 मार्च रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या तरुणीने घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा हा प्रकार त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आला असता त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीनुसार श्रीराम लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जेव्हा एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तिचा पुरेपुर विचार केला पाहिजे. त्यापासून काय फायदा आहे आणि काय तोटा आहे. खरंतर प्रेमात मुले वहावत जातात, एकीकडे शारिरीक अ‍ॅट्रॅक्शन तर दुसरीकडे खर्‍या प्रेमाच्या नावाखाली विकृत प्रेम करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा मित्र होणे फार गरजेचे आहे. तर शिक्षकांनी देखील मुलांसोबत अगदी मित्रासारखे राहून त्याच्या प्रत्येक मनातील प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे. असे झाले तरच अल्पवयात होणारी गुन्हेगारी थांबू शकेल. तर या पलिकडे प्रेम म्हणजे जिवघेणा प्रकार नसून तो प्रेरणा देणारा व लढायला शिकविणारा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. अशा सकारात्मक संकल्पना मुलांना स्पष्ट होईल.  

तर दुसऱ्या घटनेत.!

तर संगमनेरात दुसऱ्या घटनेत लग्नाचे  आमिष दाखवून मालदाड येथील एका तरुणाने संगमनेर शहरात राहणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार 2014 ते 2021 पर्यंत वारंवार होत होता. मात्र, आपल्यावर अत्याचार आणि अन्याय झाला असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी प्रवीण गोरख नवले (रा. मालदाड, ता. संगमनेर) याच्यासह त्याच्या कुटुंबातील अन्य दोघांवर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रवीण नवले याची संगमनेर शहरातील गांधी नगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम संबंध जुळून आले. नवले याने एक पाऊल पुढे टाकत तिला लग्न करण्याची साद घातली. मात्र, या दरम्यान त्याने तिच्याशी लगट करून खबरवाडी ता. चाकण, जि.पुणे येथे एका ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केला. आपण लवकरच लग्न करू असे सांगून त्यांच्यात 2014 ते 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वारंवार शरीर संबंध होत राहीले. दरम्यान, पिडीत मुलीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने तिला बेदम मारहाण केली. तर अन्य दोघे जणांनी  पिडीत मुलीस शिवीगाळ करून मारहाण करीत दमदाटी केली. त्यानंतर हा प्रकार पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात कथन केला. त्यानंतर तिच्या फिर्यादीनुसार शहर पोलीसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्यानंतर पुढे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेतली आहे.