पिचडांसोबत भाजपत जाऊन आमची चुक झाली, आम्हाला राष्ट्रवादीच्या पदरात घ्या- गायकर
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
राष्ट्रवादी काँग्रेसने अकोले तालुक्याचा जो काही कायापालट केला आहे. तो मधुकर पिचड म्हणून केलेला नाही. कारण, शरद पवार यांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली. मात्र, तो एक पक्षाचा अजेंडा होता. आठरा पगड जातींना नेतृत्वाची संधी दिली जात होती. अकोले तालुका एक डोंगराळ भाग होता. तेथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे तसेच पिंपळगाव खांड अशी धरणे झाली. येथे प्रत्येक शेतकर्याला पाणी मिळालं पाहिजे अशी भुमीका होती. त्याचे कारण, म्हणजे तेथे राष्ट्रवादीची सत्ता होती आणि येथील जनता शरद पवार साहेबांना मानत होती म्हणून हा तालुका पाणीदार झाला.
खरंतर जेव्हा वैभव पिचड यांनी जेव्हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्ही मी त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या डोक्यात काय शिरलं होतं काय माहित. नंतर आम्ही राज्यात चांगले काम केले आणि ठरवलं ग्रामीण भागात काट्याने काटा काढायचा. मग प्लॅनिंग केला आणि अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेकांना एकत्र घेत तेथे राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणला. खरंतर दादांनी शब्दांचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी गायकर पाटील यांचे धोतर फेडण्याचे वक्तव्य केले होते. ते रागाच्या आणि रोषाच्या भरात आम्ही बोललो होतो. त्यामुळे, ते फार काही लावून घेणे योग्य नाही. कारण, संस्था चालविताना काही अनुभवी लोक देखील कामे करण्यासाठी सोबत असावे लागतात. अकोल्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे अकोल्याला दोन चमचा वाढी जास्त मिळणार आहे. गेल्या काही दिससांपुर्वी जसे आपण गायकर साहेब यांना बिनविरोध केले तसेच अकोल्याचे तरुण व्यक्तीमत्व अमित भांगरे यांना देखील संधी दिली आहे. पुढे दादा म्हणाले की, मधल्या काळात जिवाभावाची अनेक माणसे सोडून गेले होते त्यामुळे अजिबात करमत नव्हते. आता काही परत आल्यामुळे आता करमू लागले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, आपल्या भागात जो कोणी नेतृत्व करतो त्याने जर एखादा निर्णय घेतला तर त्यांच्यासोबत कार्यकर्त्याने जाणे साहजिक आहे. त्यामुळे, कार्यकर्ते हे पिचड साहेबांसोबत गेले यात काही गैर नाही. त्यांच्या जाण्याने मला फार प्रश्न पडले होते की, अकोल्याचे कसे होईल. त्यावेळी दादांनी मला सांगितले की, जयवंतराव तुम्ही अकोल्याची काही काळजी करु नका. तेथे डॉ. किरण लहामटे हे हमखास निवडून येतील. या दरम्यान मला आजवर एका प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही की, पिचड साहेबांनी पक्ष का सोडला. आता त्यांच्या पश्चात तेथे डॉ. लहामटे यांनी फार चांगले काम सुरू केले आहे. त्यानंतर गायकर यांनी आता तालुक्यातच लक्ष न घालता जिल्ह्यात लक्ष घातले पाहिजे. त्यांचा दांगडा जनसंपर्क आहे तो पक्ष वाढीसाठी कामी लागला पाहिजे.
यावेळी सिताराम पाटील गायकर म्हणाले की, राष्ट्रवादीची स्थापना करताना पिचड साहेब हे तेथे उपस्थित नव्हते, त्यांची वाट न पाहता आम्ही अकोले तालुक्यात राष्ट्रवादीची स्थापना केली होती. त्यानंतर गेली कित्तेक वर्ष राष्ट्रवादीचे काम करीत आम्ही जनतेची सेवा केली. मात्र, गेल्या विधानसभेत आमच्याकडून काही चुका झाल्या. आमच्यावर काही बंधने होती. मात्र, गेली वर्षभर ती सल आम्हाला जाणवत होती. मला माझ्या जिवणातील सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा वाटला की, गेल्या सहा वर्षे राहिलेला जिल्हा बँकेचा चेअरमन बिनविरोध झाला पाहिजे यासाठी दादांनी प्रयत्न केला. हे माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्याबद्दल माफ करा आणि उदार अंत:करणाने आम्हाला पदरात घ्या. आज आम्ही दोनशे ते तीनशे लोक आले आहेत. यापेक्षा आणखी लोक फार इच्छूक आहेत. त्यामुळे, येणार्या काळात अकोले तालुक्यात एक भव्य प्रवेश सोहळा ठेवण्यात येणार आहे.
यावेळी अकोले तालुक्याचे आमदार म्हणाले की, मी तसा मी पिचड विरोधक आहे. या जगात माझा कोण विरोधक असेल तर तो पिचड आहे. त्यामुळे, बाकीच्यांचा मी विरोध करण्याचा प्रश्नच उरत नाही. आता अपेक्षा आहे की, राष्ट्रवादीच्या ऋणातून मुक्त होण्याची हीच वेळ आहे. गेल्या निवडणुकीत पिचडांना 55 हजार मते पडली आहेत. ती आज जे लोक प्रवेश करीत आहेत त्यांच्यामुळेच गेली आहेत. त्यामुळे येणार्या निवडणुकीत ही 55 हजार मते पुन्हा राष्ट्रवादीत आली पाहिजे आणि पिचडांचे डिपॉझिट जप्त होताना मला पहायचे आहे. आपल्याला जनतेसाठी काम करायचे आहे. कारखान्यावर साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज आहे त्यातून तो बाहेर काढायचा आहे. अकोल्यात आपण गोळ्यामेळ्याने काम करायचे आहे.
तर यावेळी अशोकराव भांगरे म्हणाले की, विधानसभेत आपण चांगली बॅटींग केली आहे. मात्र, पुढे देखील कारखाना, नगरपंचायत यांच्यासाठी सिताराम पाटील गायकर यांची मदत लागणार आहे. आज जे काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत ते पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीच आहेत. त्यांच्यात फक्त रिनीव्हेशन करायचे आहे. आम्ही सर्वजण एकोप्याने काम करून शुक्राचार्याला रस्त्यावर आणू अशी मी आपणास ग्वाही देतो.