जाव आणि चुलत सासुने सुन जाळली

सार्वभौम (संगमनेर) :- 

                          संगमनेर तालुक्यातील मनोली येथे सरपन तोडण्याच्या किरकोळ कारणाहून महिला-महिलांचे वाद झाले होते. हे सरपन नक्की कोणाचे याहून हा वाद विकोप्याला गेला आणि  चुलत सासू व जाव यांनी मिळून त्यांच्याच नात्यातील महिलेच्या अंगावर डिझेल आतून तिला पेटवून देत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरूवार दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मनोली येथील खंडोबा मंदिराच्याजवळ घडला. याप्रकरणी शिविगाळ करणारा शंकर शिंदे व पेटवून देणार्‍या आकांक्षा शंकर शिंदे आणि हरणबाई नाना शिंदे अशा तिघांना अर्चना सदाशिव उर्फ दत्तु शिंदे (वय 24, रा. मनोली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी करण्यात आले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, अर्चना शिंदे या मनोली येथील रहिवासी आहेत. तर आरोपी आकांक्षा शिंदे ही जखमी अर्चना यांची जाव आहे, तसेच हरणबाई शिंदे ही अर्चनाची चुलत सासू आहे आणि शंकर शिंदे हा भाया आहे. अर्चना ही महिला 11 फेब्रुवारी 2012 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असणार्‍या खंडोबा मंदिराच्याजवळ सरपन आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जाव आकांक्ष हिने तिला सांगितले की, हे सरपन आपचे आहे, त्यामुळे ते तू घेऊन जाऊ नको आणि तोडूही नको. मात्र, त्यांच्यात अधिक वाद झाले आणि आकांक्षा हिने शंकर शिंदे यास फोन लावला आणि म्हणाली की, अर्चना ही आपले सरपन तोडत आहे.

दरम्यान, आरोपी शंकर शिंदे हा कामानिमित्त परभणीला असल्यामुळे तो तिकडूनच फोनहून म्हणला की, तू आमचे सरपन तोडायचे नाहीस. तुला जर ते हवे असेल तर मला त्याचे पैसे दे आणि घेऊन जा. मात्र, फुकट त्याला हात लावू नको. अन्यथा मी तेथे येऊन तुझ्या सगळ्या खानदानाकडे पाहिल. त्यावेळी मोबाईलचा स्पिकर चालु असल्यामुळे अर्चना यांनी उत्तर दिले की, हे सरपन आमचे आहे, ते मी तोडणार आहे. फिर्यादीच्या अशा बोलण्याचा राग आला असता आकांक्षा हिने फोन कट केला आणि घरासमोर पडलेली कुर्‍हाड आणली व आर्चनाच्या पाठीत दांड्याने मारहाण करत शिविगाळ दमदाटी केली. दोघींमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली.

दरम्यान, आकांक्षा अर्चनाला मारहाण करीत असल्याचा हा प्रकार फिर्यादीची चुलत सासू हरणबाई शिंदे हिने पाहिला आणि ती या दोघींकडे धावत-धावत येत म्हणाली, हिची कायमची कटकट सुरू असते. हिला एकदाचे संपून टाक असे म्हणत हरणबार्ईने अर्चनाचे हात धरले व आकांक्षाने घरात जाऊन डिझेलचा डब्बा व काडेची पेटी आणली. रागाच्या भरात हा डब्बा अर्चनाच्या अंगावर ओतून तिला ठार मारण्याच्या उद्देशाने अर्चनाला पेटवून दिले. त्यानंतर अंगावरील कपड्यांनी तत्काळ पेट घेतला आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यानंतर अर्चनला काही लोकांना विझविले आणि तत्काळ लोणी रुग्णालयात दाखल केले आहे. यात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी भाजलेल्या व्यक्तीचे जबाब नोंदविले असून अर्चना शिंदे यांच्या जबाहून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.