निळवंड रोडवर प्रवाशांच्या डोक्याला पिस्तूला लावून डोळ्यात मिर्चीची बुकटी टाकून हातापाय तोंड बांधून फेकूून दिले. यातील पाच दरोडेखोर दोन पिस्तूल व चाकु सुऱ्यांसह जेरबंद.!
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर-निळवंडे रस्ता ते मालढोण गावचे शिवारात शिर्डीहून दर्शन घेऊन जाणार्या प्रवासी दरोडेखोरांनीच वाहन चालकाच्या डोक्याला पिस्तुला लावला. वाहन चालकाने काही प्रतिकार करण्यापुर्वीच त्यांच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून त्यांचे तोड बांधले आणि रस्त्याच्या कडेला फेकून देत या दरोडेखोरांनी 10 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. ही घटना शनिवार दि. 6 फेब्रुवारी 2021 रोजी घडली होती. याप्रकरणी तक्रारदार तथा वाहन चालक अतुल नाथा मिंढे (रा. खेड, ता. पुणे) यांनी सिन्नर हाद्दीतील वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, तो शुन्य क्रमांकाने वर्ग होऊन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. आता यातील पाच आरोपींना संगमनेर तालुका पोलीस व जालना पोलिसांच्या मदतीने जालन्यात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 10 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल, 2 गावठी पिस्तूल व चाकू सह जेरबंद केले आहे. यात राजेंद्र बाबासाहेब राऊत (रा. परतपुर जि. जालना,वय 26), ओम बबन वैद्य (रा.जोगदंडमळा, जि. जालना, वय 24), मोहम्मद इरफान मलीक (रा. पडेगाव जि. औरंगाबाद, वय 24), विशाल संजय जोगदंड (रा. जोगदंडमळा, जि. जालना, वय 20), भागवत उर्फ संभ्या बालाजी राऊत (रा. जोगदंडमळा जि. जालना, वय 20) या पाच जणांना जालना पोलिसांच्या मदतीने संगमनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पुढील तपास चालु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कामगिरी नंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे यांनी संगमनेर तालुका पोलिसांचे कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अतुल नाथा मिंढे (रा. खेड, जि. पुणे) यांची एम.एच 104 जेएच 8207 ही प्रवासी वाहतूक गाडी आहे. त्यांना जसे भाडे येतात ते तशा पद्धतीने प्रवाशांकडून पैसे घेऊन भाडे मारतात. त्यांना 6 फेब्रुवारी 2021 रोजी एका भाडे आले होते. त्यात पाच व्यक्तींना घेऊन त्यांनी पुणे ते शिर्डी असा प्रवास केला होता. त्यानंतर ते नाशिककडे निघाले होते. त्यावेळी ते पुणे नाशिक फाटा ते कौठे कमळेश्वर निळवंडे रस्ता ते सिन्नर तालुक्यातील मालढोण शिवारात असताना रात्रीच्या दरम्यान त्यांना गाडीतच असणाऱ्या प्रवासी म्हणजेच दरोडेखोरांनी मिंढे यांच्या गाडीचा ब्रेक मारला त्यावेळी गाडी थांबविली आणि काही क्षणात या दरोडेखोरांनी गाडीत ताब्यात घेतली.
दरम्यान, यावेळी गाडी चालकाने एकच काहूर माजविला आणि दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट पिस्तूल काढला आणि संबंधित वाहन चालकाच्या मस्तकाला लावला, त्यानंतर त्याची सगळी चाळचुळ बंद झाली. मात्र, वाहन चालकाने अधिक काही हलचाली करण्याच्या आत या सराईत दरोडेखोरांनी वाहन चालच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकली आणि त्याला प्रतिकार करण्याच्या मनस्थितत ठेवले नाही. त्यानंतर त्यांनी गाडी मालकाकडे असणारे सर्व साहित्य काढून घेतले. त्यात 10 लाख रुपयांची गाडी आणि मोबाईल असा 10 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता.
खरंतर चालकास त्यांनी किरकोळ मारहाण केली खरी मात्र, त्यात जिवीत हानी झाली नाही हेच सुदैव. त्याचे, आर्थिक मोठे नुकसान झाले होते. लुटल्यानंतर या दरोडेखोरांनी या वाहन चालकाच्या तोंडला आणि हातापायाला चिकट टेपने गुंडाळून याचे तोंड बंद केले. त्याला बांधून रस्त्याच्या कडेला टाकून दिले व 10 लाख रुपये किमतीची गाडी आणि मोबाईल असा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. दरम्यान हा प्रकार रात्रीचा घडल्यामुळे हा जखमी चालक कोणाला दिसला नाही. त्यासाठी रात्र डोक्यावर घ्यावी लागली. कालांतराने त्याची काही नागरिकांनी मदत केली आणि हा चालक सुखरुप राहिला. त्यानंतर त्याने वावी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकीकत कथन केली आणि गुन्हा दाखल केला. मात्र, तो संगमनेर तालुक्यात घडल्यामुळे वावी पोलिसांनी तो संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुन्य क्रमांकाने वर्ग केला होता.
दरम्यान संबंधित गुन्हा दाखल होताच संगमनेरचा अतिरिक्त चार्ज असणारे श्रीरामपुरचे पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी तत्काळ संगमनेमध्ये घाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी देखील घटनास्थळाचा पंचनामा केला होता. अशा पद्धतीने प्रवाशांच्या लुटींचे प्रमाण आजकाल वाढत चालले आहे. त्यामुळे, घडलेल्या गुन्ह्यातील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पवार यांनी पथके पाचारण केली होती. त्यामुळे लवकरच या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असा आशावाद पोलिसांनी व्यक्त केला होता. तो शब्द तालुका पोलिसांनी सार्थ ठरविला आहे.
तर नागरिकांनी शक्यतो रात्रीचा आडवळणी प्रवास टाळला पाहिजे. आपल्याकडे जर मैल्यवान वस्तू असतील तर त्या प्रवासात नेणे टाळले पाहिजे, जर रात्री अपरात्री कोणी संशयास्पद आपल्या गाडीला हात करीत असेल तर त्याला मदत करताना प्रत्येकाना विचार केला पाहिजे. जर यदा कदाचित प्रवासी किंवा नागरिकांच्या बाबात काही अनुचित प्रकार घडला असेल किंवा घडत असेल तर त्याबाबत तत्काळ पोलिसांना कळविले पाहिजे. अशा प्रकारचे आवाहन पोलिसांनी केले आहे.