उधारी मिटवायला मेहुणा 50 हजार देईना म्हणून पतीने केला पत्नीचा खून.! संगमनेरातील धक्कादायक प्रकार, आरोपी अटक.!


संगमनेर (प्रतिनिधी) :-
               गावभर उघारी करुन ती डोईजड झाल्यानंतर ती मिटविण्यासाठी पत्नी करवी मेहुण्याकडे दाजीने ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, आपल्या भावाची परिस्थिती देखील जेमतेम असल्यामुळे त्या माऊलीने पैसे मागण्यास नकार दिला. त्यामुळे, या दगडाच्या काळजाच्या मानसाने त्याच्या पत्नीचा कोणत्यातरी धारधार शस्राने खून केला. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे शनिवार दि. २७ फेब्रुवारी रोजी भर दिवसा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. यात ज्योती सोमनाथ दिघे (वय ३३, रा. पानोडी, ता. संगमनेर) या महिलेचा मृत्यू झाल आहे. घटनेनंतर मयताच्या भावाने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार दाजीवर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सोमनाथ शंकर दिघे याला ताबडतोब बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने आरोपीस  सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे.
          याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी सोमनाथ व पत्नी ज्योती या दोघांचे गेल्या काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. त्यांचा संसार तसा जेमतेमच सुरु होता. या दरम्यान त्यांना दोन मुली व एक मुलगा असे तीन आपत्य झाले. यांचे कुटुंब साधरण असल्यामुळे, गेल्या दिड वर्षात कोरोनाने त्यांना चांगलाच फटका बसला होता. रोजगारातून पै-पै करुन घर चालवायचे मात्र कोरोनात ते पुरते खचून गेले होते. या दरम्यानच्या काळात दिघे याला बऱ्यापैकी देणे झाले होेते. त्यामुळे, त्याची फार चिडचिड होत होती. तरी देखील हे पतीपत्नी गेली अनेक दिवसांपासून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते.
       दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोमनाथ याला काही लोकांची उधारी द्यायची होती. मात्र, त्याच्याकडे पैसा नव्हता. म्हणून तो  पत्नीशी नेहमी वाद घालत होत. ही उधारी मिटवण्यासाठी तो पत्नीच्या भावाकडून ५० हजार रुपयांची मागणी करीत होता. मात्र,  त्याची पत्नी त्यास नकार देत होती. त्यामुळे हो, ना चा प्रकार हा  गेल्या दीड महिन्यापासून सुरु होता. एकतर भावाची परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे त्याच्याकडून पैसा मागणे हे ज्योतील पटत नव्हते. मात्र, घरात वारंवार वाद होत असल्याने त्या महिलेने धाडस करुन आपल्या भावाकडे हात पसरले.  मात्र, इतकी मोठी रक्कम एकवेळी देणे त्यास शक्य नव्हते. त्यामुळे त्याने ५० हजार रुपये देण्यास नकार दिला.
        दरम्यान, आरोपी सोमनाथ याला पैसे मिळले नाही म्हणन तो पत्नीसोबत वारंवार भाडू लागला. त्यांच्यात नेहमीचेच वादिवाद सुरू झाले आणि हा वाद शनिवारी दुपारी विकोपाला गेल्याने आरोपी सोमनाथने आपल्या पत्नीच्या डोक्यात टणक वस्तु मारुन आपल्या पत्नीचा खून केला. यात ज्योती दिघे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम (वय ४० रा. औरंगाबाद) यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी वरून आश्वी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सोमनाथ दिघे यास अटक केली आहे. यात दिघे यास ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याने हत्या कशाने केली, त्याची आणखी कारणे काय आहेत, त्याला कोणी मदत केली का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मांडवकर करीत आहे. 
       दरम्यान, उधाऱ्या आपण करायच्या आणि त्या फेडण्यासाठी नातेवाईकांकडे हात पसरायचे.  हे गणित कोठेतरी चुकते आहे. त्यामुळे, प्रत्येकांनी स्वत:चे अंथरुन पाहूनच पाय पसरले पाहिजे. सुखी कुटुंबासाठी समाधानी राहणे, गरजा लिमिटेड ठेवणे, काटकसर करणे, नातेवाईकांडून फारशा अपेक्षा न ठेवणे अशा प्रकारचे तत्व प्रत्येकाने अंगी बाळगले पाहिजे. आयुष्यात महत्वकांक्षी काहीतरी करायचे असेल तर त्यांची मदत नक्की घ्या. पण, अशा पद्धतीने बळजबरी करुन नको तर प्रेमाणे आणि सलोख्याने. मात्र, पैसे मिळाले नाही म्हणून खून करण्याची मानसिकता होणे हे सामंज्यस्याचे नव्हे तर विकृतीचे लक्षण असल्याचे दिसते. त्यामुळे, अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य कोणी करु नये अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.