कोणत्या गावाला कोण आहे सरपंच व उपसरपंच.! कोणाच्या ताब्यात गेल्या ग्रामपंचायती.!

सार्वभौमचे वाचन करताना ना. थोरात साहेब.!
- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- अकोले तालुक्यातील 51 ग्रामपंचायती व संगमनेर तालुक्यातील 94 अशा 145 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात प्रत्येक गावात आरक्षण जाहिर झाले. त्यानंतर आता सरपंच पदांच्या निवडीसाठी आज प्रशासनाने कार्यक्रम जाहिर केला होता. त्यात संगमनेर तालुक्यातील 48 ग्रामपंचायती व अकोले तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडी जाहिर करण्यात आलेल्या आहेत. यात काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण असे निघाले आहे. जेथे त्या प्रवर्गाचा उमेदवारच नाही. त्यामुळे, तेथे केवळ उपसरपंच पदाची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे, निवडणुक विभागाच्या या भोंगळ कारभाराचा काही गावांमध्ये निषेध नोंदविला गेल्याचे पहायला मिळाले आहे. या सर्व रणधुमाळीत अनेक ठिकाणी काट्याची टक्कर पहायला मिळाली तर काही ठिकाणी हमरीतुमरी आणि हाणामार्‍या देखील झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे, एकंदर लोकशाहीचा उत्सव म्हणजे दोन देशांतील युद्धच आहे की काय.! असे प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला होता.

यात संगमनेर तालुक्याबाबत सविस्तर माहिती अशी की, 94 पैकी 48 ग्रामपंचायतींवर सरपंच राज सुरू झाल्याचे पहायला मिळाले. त्यात  ओझर बु येथे सरपंच म्हणून स्वाती खेमनर, उपसरपंच संदिप नागरे, रायतेवाडीत सरपंच सतिष तनपुरे तर उपसरपंच हारिभाऊ मंडलिक, कौठे धांदरफळ येथे सरपंच विकास घुले तर उपसरपंच आशा क्षिरसागर, डिग्रस सरपंच रखमा खेमनर व उपसरपंच रंगनाथ बिडगर, कुरण येथे सरपंच सय्यद मुद्दतसर उपसरपंच शेख नदीम, खरशिंदे सरपंच सविता वाडेकर तर उपसरपंच अशोक बर्डे, नांदुर खंदरमाळ येथे सरपंच जयवंत सुपेकर तर उपसरपंच दिलीप दुधवडे, जवळे बाळेश्वर येथे सरपंच रामकृष्ण पांडे, उपसरपंच अतुल कौटे, कर्‍हेत सरपंच खंडू सानप तर उपसरपंच गुळवेताई, पिंपळगाव माथा येथे सरपंच सविता पांडे, उपसरपंच नारायण भांगरे, कौठे बु येथे सरपंच आशिष वाकळे तर उपसरपंच किरण वाकळे, खांडगाव येथे भरत गुंजाळ तर उपसरपंच लक्ष्मीबाई गुंजाळ, कुरकुंडीत सरपंच शाहिन चौगुले तर उपसरपंच वनिता वायाळ, चनेगाव येथे अशोक खेमनर तर उपसरपंच गितांजली आसावा, माळेगाव पठार येथे सरपंच ज्ञानेश्वर पांडे तर उपसरपंच सुभाष गोडे, झरेकाठीत सरपंच अशोक वाणी तर उपसरपंच सुरज म्हंकाळे, भोजदरीत सरपंच शिल्पा पोखरकर व उपसरपंच विनायक शिंदे, प्रतापपूर येथे सरपंच दत्तात्रय अंधळे तर उपसरपंच संगिता आव्हाड, शिरसगाव धुपे येथे सरपंच गोडे रामनाथ तर उपसरपंच दिघे प्रविण, रायते येथे सरपंच रुपाली रोहम, तर उपसरपंच सुरज पानसरे, देवगाव येथे सरपंच अर्चना लामखेडे तर उपसरपंच सुनिल शिंदे, वडगाव पान येथे सरपंच श्रीनाथ थोरात तर उपसरपंच सोमनाथ गायकवाड, लोहारेत सरपंच ताराबाई सोनवणे तर उपसरपंच राहुल पोकळे, देवकौठे येथे सरपंच ज्योती मोकळ व उपसरपंच ज्योती कहांडळ, चंदनापुरीत सरपंच रहाणे शंकर व उप सरपंच राहणे भाऊसाहेब, खळीत जागा रिक्त आहेत तर उपसरपंच राजेंद चकोर आहेत.

नांदुरी दुमाला येथे सरपंच शेळके अर्चना तर उपसरपंच पथवे सोनबा, मंगळापूर येथे सरपंच शुभांगी पवार व उपसरपंच लक्ष्मणराव भोकनळ, मिरपूर येथे सरपंच रिक्त तर उपसरपंच कमलबाई कापकर, औरंगपूर येथे सरपंच लक्ष्मी वाकचौरे व उपसरपंच इंद्रभान तांबे, पिंपळे येथे सरपंच मिना ढोणे तर उपसरपंच तुकाराम चकोर, कोंची मांची सरपंच अमृता भास्कर व उपसरपंच सोमनाथ जोंधळे, खांबे येथे सरपंच रविंद्र दातीर, उपसरपंच भारत मुठे, कौठे खु येथे सरपंच विलास मेंगाळ व उपसरपंच गोरक्षनाथ ढोकरे, हिवरगाव पठार येथे सरपंच सुप्रिया मिसाळ व उपसरपंच दत्तात्रय वलवे, म्हसवंडीत सरपंच सुरेखा इथापे व उपसरपंच बोडके मंगेश. चिखलीत सरपंच जागा रिक्त आहे. तर उपसरपंच रत्नमाला हासे, माळेगाव हवेलीत सरपंच संदिप गायकवाड तर उपसरपंच गंगुबाई जुंबूकर, सावरगाव घुलेत सरपंच रिक्त तर उपसरपंच नामदेव घुले, निमगाव खु येथे सरपंच संदिप गोपाळे व उपसरपंच राहुल चंद्रमोरे, सुकेवाडीत सरपंच योगिता कुटे तर उपसरपंच सुभाष कुटे, शिंदोडीत सरपंच रिक्त तर उपसरपंच पोपट कुदनर, जवळे कडलग येथे सरपंच रिक्त व उपसरपंच निलेश कडलग, शिबलापूर येथे सरपंच सचिन गायकवाड तर उपसरपंच दिलीप मुनतोडे, सांगवीत सरपंच विमल कातोरे व उपसरपंच नवनाथ कातोरे, सोनोशी येथे सरपंच सुदाम गिते व उपसरपंच राजेंद्र सानप, खंदरमाळवाडीत सरपंच फणसे शिवाजी व उपसरपंच शुभांगी शिरोळे, खांजापूर येथे सरपंच तुषार सातपुते व उपसरपंच गोविंद शिंदे अशा 48 ग्रामपंचायतींवर सरपंच राज सुरू झाला आहे. यात जवळजवळ बहुतांशी ग्रामपंचायतींवर ना. बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे.

तर अकोले तालुक्यात बेलापूर येथे सरपंच ज्योती जगताप तर उपसरपंच राजाराम फापाळे, नवलेवाडी येथे सरपंच विकास नवले तर उपसरपंच मिनाक्षी वाकचौरे, मेहेंदुरी येथे अमित येवले तर उपसरपंच मंजेरी आरोटे, विरगाव येथे सरपंच प्रगती वाकचौरे तर उपसरपंच जयवंत थोरात, कुंभेफळ रिक्त व उपसरपंच प्रिया पवार, वाशेरे रिक्त व उपसरपंच अनिता गजे, हिवरगाव येथे सरपंच शांताबाई मेंगाळ तर उपसरपंच संग्राम आंबरे, पिंपळगाव खांड रिक्त व उपसरपंच अलका शेटे, पांगरीत सरपंच रामदास खंडवे व उपसरपंच संदिप डोंगरे, टाकळीत सरपंच शितल तिकांडे व उपसरपंच दत्तु गरुड, कोतुळ येथे भास्कर लोहकरे सरपंच व संजय देशमुख उपसरपंच, म्हळदेवीत सरपंच मेंगाळ मारुती व उपसरपंच कविता प्रदिप हासे, सरपंच निब्रळ उल्हास पथवे व उपसरपंच उज्वला पथवे, मन्याळ येथे सरपंच अमित कुर्‍हाडे व उपसरपंच अशोक डोके, इंदोरी येथे रिक्त व उपसरपंच वैभव नवले, घोडसरवाडी येथे दोन्ही जागा रिक्त. ढोकरी येथे सरपंच बेबी शेटे व उपसरपंच शेटे किसन, लिंगदेव येथे सरपंच घोमल अमित व उपसरपंच राजूबाई फापाळे, धुमाळवाडीत रविंद्र गोर्डे व उपसरपंच आशा धुमाळ, गणोरे येथे सरपंच संतोष आंबरे व उपसरपंच प्रदिप भालेराव, कळस खुर्द येथे सरपंच सुलोचना झोडगे व उपसरपंच रावसाहेब मेंगाळ, देवठाण सरपंच येथे बोडके केशव व उपसरपंच गिर्‍हे आनंदा आशा 22 ठिकाणांच्या निवडी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर या व्यतिरिक्त काही सरपंच निवडी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याची माहिती प्रशासन रात्री उशिरापर्यंत संकलित करीत होते. त्यामुळे त्यांची माहिती त्यांच्याकडून मिळू शकली नाही.

दरम्यान, अकोले तालुक्यात 9 ठिकाणी आरक्षणाचा घोळ पहायला मिळाला. तर काही ठिकाणी एका गटाकडे बहुमत असून देखील आरक्षणामुळे त्यांना तोंडघाशी पडावे लागले आहे तर दुबळ्या गटातला सरपंचपद गेल्यामुळे अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचे पहायला मिळाले. या व्यतीरिक्त जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा भाजप आणि महाविकास आघाडीत मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. आमच्या इतक्या ग्रामपंचायती आल्या आमच्या तितक्या ग्रामपंचायती आल्या. आता सरपंच निवडीनंतर प्रत्येकजण किती पाण्यात होता. हे लवकरच समोर येणार आहे. तर बाकी ज्या काही ग्रामपंचायतीत सरपंच पदाच्या निवडी बाकी होणार आहेत. त्यात आज 10 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. 

- शंकर संगारे