पतीच्या संमतीने सासर्‍याने केला सुनेवर अत्याचार.! दोघांवर गुन्हा दाखल.! ठार मारण्याची धमकी.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 पतीच्या संमतीने पित्याने आपल्या सुनेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरात घडली आहे. या घटनेने नात्यागोत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार दि. 26 डिसेंबर 2020 ते 6 फेब्रुवारी 2021 रोजी या दरम्यान घडला असून याप्रकरणी सुनेने दिलेल्या फिर्यादीनुसार सासरा व पती अशा दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेनंतर संगमनेर तालुक्यात लाजिरवाणी चर्चा सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील ढोलेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपुर्वी एका तरुणाचा विवाह झाला होता. त्यानंतर या घरात संबंधित तरुणीला योग्यती वागणूक दिली जात नव्हती. मात्र, तरी देखील या 27 वर्षाय तरुणीने गप्प राहण्याची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात या तरुणीशी तिच्या सासर्‍याने वारंवार लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत तिने कोठे वाच्चता केली नाही. आपला संसार मोडला जाऊ नये यासाठी तिने प्रयत्न केले. मात्र, नात्यांनी नैतिकतेची परिसिमा ओलांडल्यामुळे ती हतबल झाली आणि त्याचाच फायदा तिच्या सासरच्यांनी घेतला.

त्याचे झाले असे की, पीडित तरुणीच्या सासर्‍याने ती एकटे असल्याचे फायदा घेत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्यास प्रतिकार केला असता तो म्हणाला की, तु मला फार आवडतेस असे म्हणून तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घडलेला प्रकार जर तू कोणाला सांगशिल तर तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून त्याने तिला धमकी दिली. त्यानंतर ती त्यावेळी शांत राहिली. मात्र, जेव्हा तिचे पती घरी आले तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार त्यांच्यासमोर मांडला. मात्र, त्यानंतर त्याने जास्त काही मनावर घेतले नाही.

दरम्यान, तीने सासर्‍याचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला असता पीडित महिलेचा पती उलटपक्षी तिला म्हणाला की, माझे वडिल सांगतील तसे तुला करावे लागेल. त्यानंतर मात्र, पीडित महिलेला धक्का बसला. त्यानंतर तिने सांगितले की, माझे जर कोणी एकत नसेल तर मी पोलीस ठाण्यात सासर्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. त्यानंतर तो म्हणाला की, तु जर माझ्या वडीलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर मी मुलगा साई यास जिवंत सोडणार नाही. त्यामुळे पीडित महिला हतबल झाली.

दरम्यान, हा सर्व प्रकार झाल्यानंतर आरोपी सासरा व पती यांनी पीडित महिलेस लाकडी दांडोक्याने मारहाण केली. तिला शिवीगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, आपल्यावर अत्याचार झाला आहे. आपण पोलीस ठाण्यात जाऊन न्याय मागणार असे म्हणत सर्व प्रकार संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात कथक केला आहे. त्यानंतर पोलिसांनी सासरा व पती अशा दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.