साकुरमध्ये दोन मुलींची छेडछाड.! हातपाय तोडून पोत्यात घालुन घरी नेईन, भावाला धमकी.! दोघांवर गुन्हा.!
संगमनेर तालुक्यातील साकुर येथे एका मंदिराच्या परिसरात तसेच जांबुत रोडने पायी जाणार्या दोन विद्यार्थीनींचा दोघांनी पाटलाग करुन त्यांची छेडछाड काढल्याची धक्कादाक घटना मंगळवार दि. 9 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11:45 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे आरोपी यांनी पीडित तरुणीच्या भावास फार जबरदस्त धमकी दिली असून ती काळजात धडकी भरविणार आहे. जेव्हा छेडछाड करणार्यांना तो तरुण समजावून सांगण्यास गेला असता ते म्हणाले की, तु जास्त शाहणा झाला का? तुझे हातपाय तोडून पोत्यात घालुन घरी घेऊन जाईन असे म्हणत ते तेथून चालते झाले. त्यानंतर पीडित मुलीने थेट पोलीस ठाणे गाठत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष शिवाजी बर्डे (रा. मांडवे बु, ता. संगमनेर) व आदिक किसन कुदनर (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) अशा दोघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझी मैत्रीण घरी जाण्यासाठी जांबुत रोडने पायी निघालो होतो. त्यावेळी आरोपी बर्डे व कुदनर हे दोघे एका प्लॅटीना गाडीवर आले. त्यावेळी त्यांनी शिट्टी वाजवत आमच्या भोवती गिरट्या मारायला सुरूवात केली. त्यावेळी आरोपी यांनी पीडित मुलीस तू आमच्या सोबत चल असे म्हणत लज्ज उत्पन्न होईल असे वक्तव्य केले. त्यानंतर पीडित तरुणीने त्या दोघांना तेथून चालते व्हा असे सुनविले. मात्र, ते गेले नाही. तुम्ही जास्त शहाणे झाले का? असे म्हणाले असता त्यांनी अधिक धिटाई सुरू केली.
दरम्यान, यावेळी पीडित तरुणीचा भाऊ तेथे आला असता त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि त्याने बहिनीस विचारले. तेव्ही तीने सांगितले की, हे आमची छेडछाड काढीत आहे. त्यावेळी तो भाऊ आरोपी यांना म्हणाला की, तुम्ही असे का करीत आहेत? तेव्हा या दोघांनी पीडित तरुणीच्या भावास शिविगाळ, दमदाटी व धमकी देणे सुरू केली. हे दोघे त्यास म्हणाले की, तु जास्त शाहणा झाला का? तुझे हातपाय तोडून पोत्यात घालुन घरी घेऊन जाईन असे म्हणत ते तेथून चालते झाले. हा प्रकार नंतर पीडित तरुणीने घरी कथन केला असता त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले व घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक या घटनेची सखोल चौकशी करीत आहे.
खरंतर कोपर्डी प्रकरण घडल्यानंतर अनेकांना शहाणपणे येणे अपेक्षित होते. कारण, अशा प्रकारे एखाद्या तरुणीचा पाटलाग करणे, तिची छेडछाड काढणे, तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे असे प्रकार थांबले पाहिजे होते. मात्र, कोपर्डी आणि लोणी मावळासारख्या प्रकरणात सहा जणांना फाशी होऊन देखील या गुन्ह्यांवर पायबंध बसला नाही. तरी देखील तरूणांकडून छेडछाडीचे कृत्य होऊ लागले होते. एकीकडे सोनई हत्याकांडात एका प्रेम प्रकरणातून तिघांच्या खांडोळ्या-खांडोळ्या करण्यात आल्या होत्या.
तर अशाच प्रकारे जवखेडा हत्याकांडात देखील तिघांच्या खांडोळ्या करुन फेकून देण्यात आले होते. म्हणजे, आजकाल तरुण मुले जे काही सिनेमे पहातात, क्राईम सारख्या मालिका पाहतात, पेपरमध्ये बातम्या वाचतात हे त्यांना अगदी सहज करावे किंवा बोलावेसे वाटते. मात्र, त्याचे वैयक्तीक व कौटुंबिक परिनाम काय होतीत याची जरा देखील चिंता त्यांना नसते. त्यामुळे, हीच घटना म्हणून नव्हे तर प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यासोबत बोलले पाहिजे, नकळत त्यांच्या मनावर अशा प्रकारचे संस्कार होत असतील तर त्यांचे मन व मत परिवर्तन केले पाहिजे. असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे.