संगमनेरात फॅमिली डॉक्टरचा पेशन्टशी चावटाळपणा.! घरासमोरून मारतो चकरा आणि करतो नखरा, अजब प्रेमवेडा.! गुन्हा दाखल.!
संगमनेरात बागवानपुरा परिसरात राहणार्या एका फॅमिली डॉक्टरने त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा संबंधित महिलेने डॉॅक्टरला समजून सांगत घर गाठले तेव्हा मात्र या महाशयाने थेट पाटलाग करुन रुग्णाच्या घराभोवती घिरट्या घालण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार पीडित महिलेच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद झाला तेव्हा या डॉक्टरने तो कॉमेरा दगडाने फोडला. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, चक्क डॉक्टरने बुरखा घालुन घरासमोर येणे-जाणे कामय ठेवले. तरी देखील त्याचे मन समाधान झाले नाही. अखेर त्याने दि. 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेचा हात धरीत त्याच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. मात्र, झाले काही वेगळेच. घरंदाच महिलेने कोणत्याही प्रकारची भिडभाड न ठेवता थेट घडला प्रकार आपल्या पतीस सांगितला आणि नंतर डॉ. इरफान अली शब्बीर असी शेख याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इरफान याचा डॉक्टरी पेशा असून तो पीडित व्यक्तीच्या सासुवर गेल्या काही दिवस उपचार करीत होता. कालांतराने पीडित व्यक्तीला देखील पोटाचा आजार झाल्यामुळे एक कौटुंबिक डॉक्टर म्हणून त्या देखील इरफानकडे उपचार घेऊ लागल्या. डॉ. इरफान याला घरचा व्यक्ती म्हणून त्याच्यावर अनेकांनी विश्वास टाकला होता. त्याला दवाखाना चालु करण्यासाठी एक जागा देखील यांनी दिली होती. मात्र, याने संबंधित महिलेला मुंबईच्या एका डॉक्टरचे नाव सांगत त्यांना खर्चात पडले. त्यामुळे, हा व्यक्ती मुद्दाम काहीतरी प्रकार करीत असल्याचे संबंधित कुटुंबाच्या लक्षात आले होते.
दरम्यान , पीडित महिला उपचार घेण्यासाठी डॉ. इरफान याच्याकडे जात असताना तो तपासताना त्याच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे लक्षात येत होते. त्यामुळे, संबंधित महिलेने त्याच्याकडे उपचार घेणे बंद केले. त्यामुळे, हा महाशय रोज पीडित व्यक्तीच्या घराकडे जात होता. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे त्याला समज देण्यात आली होती. मात्र, या बहाद्दराने थेट सीसीटीव्ही कॅमेरेच दगड मारुन फोडून टाकले. याप्रकरणी सन 2017 साली डॉ. इरफान याच्यावर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती मात्र, त्याने नंतर माफी मागितली आणि त्या प्रकरणावर पडदा पडला होता. तरी देखील त्याचे चाळे थांबले नाही. त्यामुळे, या व्यक्तीचे काय करावे असा प्रश्न पीडित महिलेला पडला होता. मात्र, एकतर्फी जीव तडफडणार्या या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी आजवर संयमची भुमिका घेतली होती.
दरम्यान, त्यानंतर पीडित महिला बाजार आणण्यासाठी घराबाहेर पडली असता डॉ. इरफान याने वाईट हेतूने तिचा पाटलाग सुरू केला. मात्र, पुढे अधिक प्रश्न वाढू नये यासाठी संबंधित महिलेने घडल्या प्रकारावर पांघरून टाकले. मात्र, त्यानंतर देखील त्याने घराभोवती चकरा मारणे सुरूच ठेवले. पीडित महिला ही त्यास रिस्पॉन्स देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने बुधवार दि. 24 रोजी त्याच्या मर्यादा आणि मान सन्मान सर्व धुळीस मिळवत थेट पीडित महिलेचा हात धरला. त्यांनी त्याचा हात झटकावून घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीस कथन केला. त्यानंतर देखील हा व्यक्ती थांबला नाही तर याने पीडित व्यक्तीच्या फोनवर फोन करुन त्यांना धमकाविण्याचे वारंवार प्रयत्न केले. तर नको तसे मॅसेज टाकत महिलेस मानसिक त्रास दिला. डॉ. इरफानच्या या प्रकाराबाबत त्याच्यावर काय कायवाई कारायची याबाबत घरात विचार सुरू असताना दुसर्या दिवशी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
यावेळी डॉ. इरफान याने पीडित महिलेच्या मोबाईलवर फोन करुन तिच्यावर सेक्सयुवर हरेेशमेंटची तक्कार केल्याचे सांगत पोलीस ठाण्यात बोलविले. मात्र, हा आवाज दुसरा-तिसरा कोणाचा नसून तो डॉ. इरफानच होता हे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर मेसेज देखील केला की, कब तक बचोंगे, तेरा ठिकाणी सिर्फ कबर हो.! असे म्हणत रात्री 2 वाजता हा व्यक्ती बुरखा घालुप पिडित व्यक्तीच्या घराकडे गेला. त्यांच्या घरावर दोनचार दगडे फेकून पळून गेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला आहे. त्यानंतर या डॅक्टरने पीडित महिलेच्या भावास शिवीगाळ दमदाटी देखील केली असे तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत.