अखेर मा.आ. वैभव पिचड यांची जिल्हाबँकेतून माघार.! अमित भांगरे बिनविरोध.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अहमदनगर) :- 

                    जिल्हाबँकेच्या निवडणुकीत पिचड कुुटुंबाने एक महत्वपर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तसेच महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नाही. त्यामुळे, एक सामंजस्य भूमिका घेत भविष्याचा विचार करता मा. आ. वैभवराव पिचड यांनी आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवार दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी मागे घेतला आहे. त्यामुळे, भांगरे कुटुंबातील अमित भांगरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उद्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आज वैभव पिचड यांनी जो निर्णय घेतला. तो योग्यच असल्याचे बोलले जात आहे. कारण, विपक्ष परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वाघ देखील एक पाऊल मागे टाकत असतो. अशा प्रकारचे स्टेटस आणि सोशल मीडियातून पोष्ट व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे, कोणाच्यातरी सांगण्याहून भाजपत जाणे व पुन्हा कोणाच्यातरी सांगण्याहून निवडणुकीत भविष्य आजमाविणे हे त्यांच्यासाठी घातकच होते. त्यामुळे, डर के आगे जित है.! या शब्दावर न जाता संयमाने यश संपादित करता येते. यावर विश्वास ठेऊन जिल्हा बँकेवर डिपेंड न राहता आमदारकीच्या दृष्टीने त्यांनी योग्य निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय गोटातून सुरु आहे.

अकोले तालुक्याच्या विधानसभा निकालाचे पडसाद आजवर वेगवेगळ्या नेत्यांवर उमटताना दिसत आहे. त्याचा सर्वात मोठा तोटा कोणाला झाला असेल तर तो पिचड यांनाच झाला आहे. केवळ पवार यांना त्याचा पक्षबदल जो काही जिव्हारी लागला आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. यात एक मात्र झाले की, डॉ. किरण लहामटे यांना लॅटरी लागून गेली आणि त्यांच्यानंतर आता  गेली 35 वर्षे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या विरोधात काम करणारे भांगरे यांना जिल्हा बँकेवर संधी मिळाली आहे. त्यामुळे, आमदारकीच्या पराभवाला पचवत असताना पुन्हा जिल्हा बँकेत तेच पाढे पंच्चावन्न व्हायला नको. त्यामुळे, अथक प्रयत्नांच्या पराकष्टानंतर पिचड यांना अजित पवार आणि ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे, त्यांना एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज जिल्ह्या बँकेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख होती. त्यात सर्व तालुक्याचे लक्ष अमित भांगरे व वैभव पिचड यांच्या अर्जाकडे लागले होते. जर सिताराम पाटील गायकर यांच्यासाठी अजित दादा मध्यस्ती करु शकतात तर येणार्‍या काळात अंतीम क्षणापर्यंत काय होऊ शकते याची राजकारणात तरी शास्वती नव्हती. त्यामुळे, अनेकांच्या मनात धाकधुक सुरू होती. खरंतर वैभव पिचड यांच्यासाठी विखे गटाकडून शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना देखील यश आले नाही. तर दुसरीकडे गेली वर्षानुवर्षे विखे व भांगरे यांचे बंधूप्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळे, विखे यांनी देखील भांगरे यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्यात काही वावघे नसते. तर दुसरीकडे खुद्द जेथे विखे व पवार कुटुंब यांच्यात अस्मितेच्या लढाया होतात अशा कर्जत जामखेड ठिकाणी राळेभात यांच्यासारखे व्यक्तीमत्व विखे गटाचे बिनविरोध येतात. ही राजकीय तडजोड नाही तर काय आहे? या व्यतिरिक्त राजळे यांनी देखील पिचड यांना कितीपत साथ दिली असती? या सर्व परिस्थितीची गोळाबेरीज केली. तर, पिचड यांनी अर्ज मागे घेणे. हेच त्यांचे राजकीय शहाणपण म्हणावे लागले.

खरंतर, जिल्हा बँक यापेक्षा येणारी आमदारकी त्यांच्यासाठी फार मोलाची आहे. त्यांचे जिल्ह्यात फारसे वलय नसले तरी तालुक्यात मात्र आजही त्यांच्यामागे वाढता जनाधार आहे. त्यामुळे, जिल्हा बँकेत त्यांच्या ठिकाणी गायकर यांच्यासारखे बलाढ्य व्यक्तीमत्व असल्यामुळे, त्यांनी नम्रता घेणे हेच सुखद मानने तुर्तास योग्य आहे. मात्र, जर जिल्हा बँकेत त्यांचा पराभव झाला असता तर त्यांना त्यातून सावरणे आणि मानसिक खच्चीकरण याला तोंड देताना लोकांच्या मनात देखील नकळत काही संकल्पना क्लेअर झाल्या असत्या. त्यामुळे, एकंदर प्रवाहाचा रोख हा यावेळी त्यांच्या विरोधात होता. याची चाहुल घेत त्यांनी जो काही निर्णय घेतला तो योग्य असल्याचे बोलले जात आहे. आता जिल्हा बँकेचे चित्र अगदी स्पष्ट झाले आहे. ही सर्व प्रक्रिया बिनविरोध होणार असून विखे आणि थोरात यांच्यात सामंजस्याने हा निकाल होणार आहे. त्यात अमित भांगरे यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याची खात्रीलायक माहिती रोखठोक सार्वभौमच्या हाती आली आहे. त्याच बरोबर श्रीगोंद्यातून राहुल जगताप, जामखेड मधून अमोल राळेभात, अकोल्यातून सिताराम पाटील गायकर, माधवराव कानवडे, शंकरराव गडाख, अशितोष काळे अशा काही आणखी काही नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.